हायकू – एक काव्य प्रकार
अचानक पावसाची सर यावी आणि चिब भिजवून जावी तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालंय. वाचनात अचानक एक हायकू आली आणि मला त्यात ओढून घेऊन गेली. हायकू पूर्वी ऐकली/वाचली तेव्हा साहित्य, काव्य ह्यात जेमतेम रस होता. त्यामुळे तेव्हा दुर्लक्षित राहिलेली हायकू आज मात्र वेड लावून गेली.
तीन ओळींचे हे मुळचे जपानी काव्य निसर्गाशी जवळीक साधणारं, मनाला भिडणारं, समजायला खूप सोप्प असं आहे. ते क्लिष्ट नाहीये हाच मला आवडलेला त्याचा गुण म्हणेन मी. गुगल राजाला विविध प्रकारे आळवणी केल्यावर खूप माहिती वाचायला मिळाली.
हायकूचे नियम कळले. 'हायकू' ही तीन ओळींची कविता. पूर्वार्धात एक विधान केलेले असते. उत्तरार्धात कलाटणी असते.
मिसळपाव