Skip to main content

कावळे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 21/08/2016 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्वताचा मुलगा अमेरिकेत वेल सेटल्ड असताना...शेजाराच्याना "राहुल ला लागली का नोकरी? नाहि बरेच दिवस घरीच दिसतो म्हणुन विचारले..... . स्वताची मुलगी सुस्थळी पडल्यावर.." यमी च जमतय की नाहि? बघा हो..वय उलटुन गेले कि अवघड होते... . स्वताच्या मांडीवर नातवंड खेळवत बाजुच्या जोशी काका च्या सुनेला काहि कोम्पिकेशन्स आहेत हे माहित असताना..."काय रामभाऊ? पेेढे कधी देणार..३ वर्ष झालीत तुमच्या राहुल च्या लग्नाला........... . अश्या चोचा मारणारे कावळे आपल्याला समाजात..नात्यात नेहमी पहायला मिळतात...चोचा मारण्या साठी हे कावळे जखमा शोधत असतात..दिसली जखम मार चोच..कर घायाळ.... संवेदना हीन लोक्स

YZ (परिक्षण दुरुस्ती)

लेखक तर्राट जोकर यांनी रविवार, 21/08/2016 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
(समीर_happy go lucky हे मिपावर नेहमी चित्रपट परिक्षण लिहित असतात. दर्जाच्या बाबतीत थोडंफार हुकत असले तरी त्यांची चिकाटी व आवड पाहून मला फार छान वाटले. त्यांच्या नुकत्याच आलेल्या http://misalpav.com/node/37050 ह्या वायझेड मराठी चित्रपटाच्या परिक्षणामधे बरेच काही खटकले. एक उत्तम चित्रपट परिक्षक होण्याची योग्यता असलेल्या लेखकास केवळ हुर्यो उडवून पळवुन लावावे हे मला योग्य वाटले नाही. त्यापेक्षा त्यांच्या परिक्षणातल्या खटकलेल्या बाजू वगळून, शब्दरचना सुधारून तेच परिक्षण संपादित केले तर कसे वाटेल अशी कल्पना मनात आली.

YZ (मराठी चित्रपट)

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 20/08/2016 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
YZ असे विचित्र टायटल का असा प्रश्न टायटल बघून रसिकांना पडू शकतो आणि ते योग्यही आहे कारण YZ हे दोन लेटर्स एका मराठी शिवीचा अपभ्रंश आहेत ज्याचा एक अर्थ साध्या शब्दांत होतो "बावळट". कल्पक लेखक क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांचे हि जगावेगळी हिंमत दाखवल्याबद्दल अभिनंदन आणि नंतर या टायटलचे समर्पक एक्सप्लेनेशन कथेत दिल्याबद्दल कौतुक. कधी कधी जाणवणारी एक मानसिक सणक जेंव्हा "किक" या नावाने हिंदीत येते आणि आमचेच मराठी लोक उचलून धरतात तेंव्हा आम्ही मराठी जनांनी असा प्रयत्न करायला काय हरकत आहे? असाच काहीसा विचार या जोडीने केला असेल आणि जन्माला आला YZ.

एका चिमण्याची गोष्ट

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 20/08/2016 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
(काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसात एक झाड जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. सहज निरखून पहिले, एक चिमणा हि जमिनीवर पडलेला दिसला. मनात विचार आला, कसे गेले असेल त्याचे आयुष्य .... वासंतिक वार्यात एका अनामिक गंधाने बैचैन होऊन चिमण्याणे घरट्यातून उड्डाण भरली. आकाशात विहरताना त्याला त्याची चिवताई भेटली. दोघांनी एका दुसर्याकडे पहिले. चिमण्याला पाहून चिवताई गालात हसली. जणू जादूच झाली. क्षणभरातच ते जगाला विसरले. एका दुसर्याच्या पंखात पंख घालून आकाशात विहार करू लागले. आकाशात विहरताना त्यांना एक वडाचे झाड दिसले. वडाच्या झाडने हि पाने हलवीत त्यांचे स्वागत केले.

मनाचा एकांत - ब्लड

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 20/08/2016 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!' मऊ शीर, तीक्ष्ण सुई लक्क काळीज, डोळ्यात पाणी थंड एसी, मंद दिवे पांढऱ्या भिंती, एकट रात्री! तासाला थेंबभर या गतीने ठि ब क ते रक्त रात्रभर.... जखडलेल्या शरीराने श्रमलेल्या डोळ्यांनी हुं कि चू न करता बघत राहतो आपण रक्ताची journey........ . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -- शिवकन्या

फक्त तू खचु नकोस...

लेखक कुणाल धस यांनी शनिवार, 20/08/2016 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
*|| फक्त तू खचू नकोस ||* एक डाव हरला तरी त्यात काय एवढं ..? कुणीतरी जिंकलंच की हे ही नसे थोड ... संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसु नकोस, आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त तू खचु नकोस... सूर्य रोजच उगवतो, त्याच नव्या तेजाने ... रोज मावळतीला जातो रोजच्याच् नेमाने ... येणे जाणे रितच् इथली, हे तू विसरु नकोस ... आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त तू खचु नकोस... प्रेम तुझ्यावर करणारे , कितीतरी लोक आहेत ... तुझ्यासाठी जोडणारे , खुप सारे हात आहेत ... अरे अशाच आपल्यांसाठी , तू ही थोड हसुन बघ ... आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त तू खचु नकोस... वाट तुझी बघत असतं, रोजच कुणीतरी ... तुझ्यासाठी जगत असतं , आस लावून प्रत्येक क्ष
काव्यरस

पाऊस

लेखक निलम बुचडे यांनी शनिवार, 20/08/2016 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
     कोपर्डी - आणखी एक 'निर्भया'... टीव्हीवरील बातमी बघून सगळं सुन्न झालं.. त्या ह्रदयद्रावक घटनेने माझ्यातल्या 'स्त्रीत्वावर' जो आघात झाला त्याचे पडसाद मनात उमटले.. त्यातूनच "ती" माझ्या मनातून लेखणीत झिरपत गेली..पण हे झालं गद्य...  हे लिहिताना माझ्यातली कवयित्री मला स्वस्थ बसू देईना...  अशा रितीने अवतरलेली ही तिची कविता...........   ----  पाऊस ---- असा वेडा हा पाऊस, करी उगाच वर्षाव.. मन गेलं हे सुकून, होतो खळखळाट फार... त्याच्या ढगांची ती शर्थ, येती दाटूनीया फार.. त्याला नव्हते माहित, येथे वारा नाही फार.. मन कुजूनी जाईल, तुझ्या अतिवृष्टीने...
काव्यरस

ओमरान दानीश

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 20/08/2016 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
dan dan फोटोत असलेला हा 5 वर्षाचा छोकरा, ओमरान दानीश बुधवारी सिरीयन आर्मी किंवा रशियन एयरफोर्स ने अलेप्पो शहरात एका इमारती वर केलेल्या हवाई हल्ल्यात हा सापडला होता. याला जेव्हा ऍम्ब्युलन्स मध्ये आणण्यात आलं तेव्हा याच्या चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता आणि अंग धुळीने भरलेले होते.

गावाकडची गोष्ट (भाग २ )

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 20/08/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडची गोष्ट (भाग 1): http://www.misalpav.com/node/37022 मी बीड जिल्ह्यातल्या एका आड गावात नोकरीला होतो. मी काही फारसा शिकलेलो नाही. त्यामुळे मी कधीच मोठ्या शहराची, मोठ्या कंपनीतल्या मोठ्या पगाराची स्वप्न बघितली नाहीत. वडील लहानपणीच गेले होते. त्यामुळे आई बरोबर कष्ट करून जितकं शिकता आल तितक शिकलो आणि ती गेल्यावर गाव सोडून जिथे नोकरी मिळेल तिथे रहायचं अस ठरवून निघालो. बीडमध्ये नोकरी शोधताना मला कळल की जवळच्या एका गावात एक छोटासा लाकडाचा कारखाना आहे आणि तिथे मला नोकरी मिळू शकते.