Skip to main content

डुलकी

लेखक भटकीभिंगरी यांनी बुधवार, 21/09/2016 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
तो २००८ सालातील ११ मी हा दिवस होता. मी केसरी टुर्स सोबत ओस्ट्रेलिया टूरवर गेले होते. त्या दिवशी आम्ही सिडनीहून सकाळी ८ वाजत कॅनबेरा या कॅपिटल सिटीमध्ये गेलो. जाताना बसमधून बाहेर निसर्गाने उधळलेल्या सौदर्याचा आस्वादघेत गेलो. पूर्वीची राजधानी सिडने होती. पण सिडने समुद्र किनार्यावर आहे. आणी राजधानी समुद्रकिनार्यावर असणे सुरक्षेच्या दृष्टीने ठीक नाही म्हणून नंतर ती कॅनबेराला आणली. DSCN2065 आमचा ड्रायव्हर ... पुर्वि हा प्रदेश ओसाड होता. पण व्यवस्थित प्लानिंग करून हे शहर वसवले आहे. त्यामुळे ते अतिषय सुबक आहे. जाताना १२ वाजता आम्ही जेवलो.

Now she does not bite…!

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 21/09/2016 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेख अनाहितामधे पूर्वप्रकाशित आहे आणि तिथले काही उल्लेखनीय उत्तम साहित्य ज्यात कोणतेही वैयक्तिक संदर्भ नसतील असे यापुढे नियमितपणे लेखिकांच्या परवानगीने मिपावर सर्वांसाठी खुले करू. - अनाहिता) ------------------------------------ (आमची प्रेरणा) मागच्या महिन्यात आमच्या घरी मोठाच फंडा झाला.. नाही हो, माझा अन माझ्या नवऱ्याचा नव्हे, तिचा अन तिच्या पिल्लांचा ! सगळा घोळ माझ्या झाडांच्या हौशीमुळे झाला असं नवऱ्याचं म्हणणं.

पॉईंट झीरो

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 21/09/2016 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
झीरो ................ "चला राजं, नवं साह्याब आलंत रेस्ट हाऊसला. पीआय साह्यबानं सांगीतलय. जाऊन येऊ." रेस्ट हाऊसला सगळा थाटच, लाल दिवा मिरवत बाहेर थांबलेली अ‍ॅम्बॅसेडर, दोन जीपा, चार पाच सफारीवालं, दोन इन्शर्टात गॉगल मिरवणारं. एक जण फाईल घिवून भईर आला की मोरेदाजीनी वर्दी दिली. रव्याला घीवून आत घुसले तसा साह्यब फिरुन बघितला. खालमानेच्या रव्याकडे डोसक्यापासून पायापर्यंत पहात मोरेदाजीवर कडाडला. "काय मोरे, युनिफॉर्म बदलला का नियम बदलले परस्पर? आँ" "न्हाई सोनकांबळे साहेब, मी आहे की. ह्ये कॉन्स्टेबल न्हाई, झीरो आहे, गावचाच आहे आपल्या.

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग ४

लेखक पद्मावति यांनी बुधवार, 21/09/2016 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
मला ना लहानपणी काही विशिष्ठ गावे आणि जागा या निव्वळ दंतकथा वाटायच्या. उदाहरणार्थ - टिमबकटू , झुमरीतलैय्या किंवा केप ऑफ गुड होप. मला ही ठिकाणं म्हणजे अनुक्रमे- वाक्प्रचार म्हणून वापरायला, फिल्मी गाण्यांच्या फर्माईशी पाठवायला आणि वास्को डी गामाला शॉर्ट कट मारुन हिंदुस्तानात येता यावे म्हणून निर्माण केलेल्या काल्पनिक गोष्टी वाटायच्या……. पुढे वयोमानपरत्वे समजले की या जागा दंतकथेतल्या नसून खरोखरीच अस्तिवात आहेत. त्यापैकी केप ऑफ गुड होपला तर आज प्रत्यक्ष जाण्याचा आमचा बेत ठरला होता. सहाजीकच तीथे जाण्यासाठी आम्ही कमालीचे उत्सुक होतो. ब्रेकफास्ट नंतर आम्हाला घ्यायला आमची टूर गाइड आली होती.

श्रद्धांजली

लेखक निनाव यांनी बुधवार, 21/09/2016 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धांजली लागावी कशी झोप आम्हा आत्ता कळले जेंव्हा - सरहद्दी वर वाहिले रक्त ते , आमुच्या शांत झोपे साठी होते! हसावे आम्ही कसे आत्ता, झालात तुम्ही हसत हसत हुतात्मा दोषी वाटते आम्हा आज गाफ़ील चारित्र्य आमुचे होते ! उठू आम्ही सर्व आत्ता लढू आम्ही वैरास बांधू आम्ही हा देश ऐसा पाहिले स्वप्न जैसे तुम्ही होते !
काव्यरस

श्वास...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 21/09/2016 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास... जीर्ण झाली सारी पाने आता हवा एक देठ नवा तिच फुले अन तेच वारे आता हवा गंध नवा सावल्यांनी घेरले आहे आता हवा एक सूर्य नवा ओशटलेली सारी नाती आता हवा एक बंध नवा जुने झाले श्वास सारे आता हवा एक श्वास नवा राजेंद्र देवी

फीडबॅक हवा आहे !

लेखक साहना यांनी बुधवार, 21/09/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दोन वर्षां पासून काही मित्र आणि मी केवळ सामाजिक दृष्टिकोनातून हे app मेंटेन करत आहोत. ह्यांत नवीन सुविधा द्याव्या, जास्त कन्टेन्ट यावा ह्या साठी वाचनप्रेमी लोकांचा फीडबॅक पाहिजे आहे. कुणाला बीटा युसर व्हायचे असेल तर आपला इमेल व्यक्तिगत संदेश मध्ये पाठवा. ह्या अँप मध्ये छोटी पुस्तके, कादंबरी, बातम्या आणि इतर दर्जेदार कन्टेन्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे. भयकथा, पौराणिक आणि विज्ञानकथा वर विशेष भर आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.upasanhar.marathi.kad…

झीरो

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 20/09/2016 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
"मम्मे, बुटं कुटं फेकलीसा?" इनशर्ट करत करत रव्या बोंबलला "न्हाय माय, म्या कशापायी टाकू. ते दावेदारानं नेलं का उचलून बघ माय" "तिज्यायला न्हेऊन्शानी, कायतर सोड म्हण" एक सापडला बाहेरच्या खाटंखाली, दुसरा न्हाणीच्या चुलीमागं. तिथलंच फडकं मारल बसून तोपर्यंत फवं न च्या आला. एक घास फव्याचा न एक घोट चाचा करणार्‍या लेकाला न्हाहाळत बसली माय. काळं का असना पण रव्या नाकीडोळी देखना. नाकाडोळ्यापेक्षा नजरंत भरायचा बेगुमानपणा. बारीक मशीन मारलेल्या आर्मीकटला उचलून धरायची दणक्या छाती. खांदं कधी पुढं आलं नाहीत.

Please, Look After Mom!

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 20/09/2016 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
Please, Look After Mom ही Kyung-sook Shin या कोरियन लेखिकेची कादंबरी नुकतीच वाचनात आली. कादंबरीच्या नावातच तिचा कथा विषय, आई, ठळकपणे सूचित होतो. खरंतर आई या विषयावर विपुल लेखन झालेले आहे.

पाकिस्तानचे हल्ले आणि मोदी पर्रीकर

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 20/09/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि आपले काही सैनिक मारले. सगळा देश यामुळे संतप्त आहे. पण याला जरासे वेगळे वळण लागलेले दिसत आहे. काही लोक आज मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांना शिकवायला निघाले आहेत. मोदी संघाच्या मूशीतून घडलेले संन्यस्त वृत्तीचे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. मनोहर पर्रीकर हेही संघाच्याच संस्कारात घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि आय आय टी चे विद्यार्थी आहेत. तसेच संरक्षण मंत्री झाल्यावर अनेक दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतले.