Skip to main content

शुभ दसरा

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 11/10/2016 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
विजयादशमीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा =)) शुभशकुनांच्या पावलांनी किरण सोनेरी येती घरा अवगुण अंतरीचे मिटवूनी करू सत्याचा विजय साजरा दारी सजवू मांगल्याचे तोरण दुःखक्लेशास न मिळो थारा विवेकबुद्धीने करून आचरण लाभो शक्ती दुष्टमतीच्या संहारा नवविचारांचे जमवूनी सखेसोबती पेटवुया जुनाट रीतींच्या अंधारा जन्मू दे नवी उमा दुर्गा सरस्वती स्वप्न यशाचे तरच येईल आकारा

हिलरी "दुर्गा" आहे अशी डॉनाल्ड ट्रम्पचीच कबुली.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 11/10/2016 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
"काल दुसरं डिबेट झालं.हिलरी चवदा पॉइन्ट्सने दुस‍र्‍यांदा जिंकली. २००५ मधे खासगीत ट्रम्प जे व्हिडीयोवर स्त्रींयाबद्दल(हलकट,चावट) बोलला होता, तो व्हिडीयो डिबेटच्यापूर्वी ऐनवेळी सर्व देशात टिव्हीवर उघडपणे दाखवला गेला. डिबेटमधे त्याबद्दल त्याला प्रथम माफी मागावी लागली.हिलरीने त्याला डिबेटमधल्या तिच्या भाषणात शाल-जोडीतले जोडे योग्य प्रकारे दिले म्हणा. आणि ट्रम्पच शेवटी हिलरीबद्दल बोलला, "She doesn’t quit. She doesn’t give up. I respect that. I tell it like it is.

जप

लेखक निनाद यांनी मंगळवार, 11/10/2016 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा: सदर लेख धार्मिक लिखाण या प्रकारात येऊ शकतो. ज्यांना या लिखाणाची अ‍ॅलर्जी असेल त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. तसेच या लेखात प्राचीन भारतीय विचारांची भलामणही आहे. ज्यांना याचा त्रास होतो त्यांनीही त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. या लेखातील दावे काही जणांना वैज्ञानिक स्वरूपाचे वगैरे वाटू शकतील. तर ते दावे तसे नसतीलच अथवा असतीलच असेही नाही. इशारा संपला! --- हा लेख येथे का? पैसा ताईंनी प्राचीन भारतीय वेद पुराणे विज्ञान हा कायप्पा समुह काढताना सांगितले होते की तेथे काही चांगली चर्चा झाली तर ती येथे ही यावी.

अब तक छप्पन !

लेखक चिनार यांनी सोमवार, 10/10/2016 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय लष्कराने नुकतीच दहशतवाद्यांविरोधात यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केली. त्यासाठी संपूर्ण देशवासीयांनी लष्कराचे मनापासून अभिनंदन केले. सैनिक हो !! आम्हाला तुमचा अभिमान आहे !! आता गंमत बघा. इकडे सरकार समर्थकांची छाती छप्पन इंचाने भरून आली असताना त्यावर लगेच जुन्या-जाणत्या नेत्याचे उत्तर आले. "अरे असल्या छप्पन स्ट्राईक्स केलत्या आम्ही सत्तेत असताना, पण आम्ही कधी हिशोब नाही ठेवला." बरोबरच आहे म्हणा, नाहीतरी कुठल्या गोष्टींचा हिशोब ठेवलाय यांनी आजपर्यंत?? खोटं का बोलावं..कश्शाकश्शाचा म्हणून हिशोब नाही. आता तुम्हाला वाटेल, कमीतकमी स्वतःच्या वयाचा आणि अनुभवाचा तरी हिशोब ठेवावा.

आकर्षणाचे नियम

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 10/10/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
Law of attraction अर्थात आकर्षणाचा नियम याविषयावरचा whatsapp समुह सुरु करत आहोत. आकर्षणाचा नियम याबद्दल बर्याच जणांनी वाचलं असेल,"सिक्रेट" हे पुस्तक तसेच याच विषयावरचा चित्रपटही पाहिला असेल. तुम्ही सतत जो विचार कराल तसेच परिणाम तुम्हाला मिळतील.ही या नियमाची सुरुवात;पण फक्त सकारात्मक विचार करुन हवं तसं घडेल का? मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करता येईल? ते सकारात्मक विचार फलद्रुप होण्यासाठी आणखी काय काय करावं लागतं? त्यासंबंधी चर्चा ,माहितीची देवाणघेवाण यासाठीच आहे हा समुह. हा आकर्षणाचा नियम आहे तरी काय? तो कसा वापरायचा? वापरताना होणार्या चुका कोणत्या?

मैत्रीण ....... !!!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 10/10/2016 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीण ....... !!!! माझ्याकडे दिवस डोक्यावर असताना तु चांदणे पाहत असतेस कदाचित , तुझ्या नि माझ्या देशातले ऋतूही सारखेच आहेत म्हणे .... ऋतूंबरोबर मैत्री बदलत नाही .... ती तिचा ओलावा कायम ठेवते, हे किती बरंय नाही ? कुठलातरी ढग कधीतरी गच्च भरलेला इथे माझ्या अंगणात येऊन बरसतो रापलेल्या इथल्या तृणांमधून तो, वाट काढत काढत दिशाहीन वाहत राहतो ....... 'तो 'ढग तुझा होता; ते मला कळत नाही, हे किती बरंय नाही ?

मोल...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 10/10/2016 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
मोल... या दुनियेत कोणी कोणाचा नाही जो तो पैशात तोलुनी पाही नव्हता मजकडे पैसा जो आजपण नाही म्हणून तर आजपण कोणी मला ओळखत नाही सारी नाती गोती बेताची ठेवून अंतरे वितांची गळाभेट तर नाहीच नाही साधी विचारपूस पण नाही या दुनियेत कोणी कोणाचा नाही मी पैशाचा वा पैसा माझा नाही राहतील फक्त शब्द माझे त्याला काही मोल नाही राजेंद्र देवी

मक्केतील उठाव ३

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 10/10/2016 05:28 या दिवशी प्रकाशित केले.
मक्केतील उठाव १ मक्केतील उठाव २ २० नोव्हेंबरला मक्केचा ताबा अतिरेक्यांनी घेतला. पण सौदी सरकारने फार काही प्रतिकार केला नाही. त्यांचे सगळे उच्चपदस्थ राजपुत्र ट्युनिशिया, मोरक्को अशा जागी कुठल्याशा बैठकांकरता वा सुट्टीकरता गेलेले होते. सौदी राजा म्हातारा होता. काही ना काही तब्येतीच्या तक्रारीमुळे त्रासलेला होता. हळूहळू एक दोन दिवसांनी गृहमंत्री, सुरक्षामंत्री अशी पदे संभाळणारे लोक एकदाचे सौदी अरेबियात दाखल झाले.