Skip to main content

गावाकडच्या बोरी

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 21/10/2016 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडे दरवर्षी पिकतात बोरी हिरवी पिवळी केशरी लाल बोरं मण्यांसारखी रत्नांसारखी फांद्यांवर झुलतात खाली मातीत, गवतकाट्यात, पाचोळ्यात पडून वाळतात काही बारकी काही माध्यम काही मोठी काही आंबट काही गोड पोरं बाया माणसं वेचून खातात घरी नेऊन वाळू घालतात पाखरं, प्राणी खातात लहानपणी मीही खूप खाल्ली ढुंगणावर फाटलेल्या चड्ड्या घातलेल्या गावातल्या मित्रांसोबत याच्यात्याच्या शेताततून हिंडून झाडाची तोडून, गवत-काट्यातून शोधून, वेचून कच्ची पिकली वाळलेली नुसती बोरेच खाल्ली नाही तर त्यांच्या बी मधलं इवलं इवलं मगजपण खाल्लं ती दगडाने फोडून !

चंदबरदाई

लेखक हृषीकेश पालोदकर यांनी शुक्रवार, 21/10/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
चंदबरदाई हे नाव तुम्हाला माहिती आहे का ? ch स्वामीनिष्ठेचं आणि मैत्रीचं असं उदाहरण मानव इतिहासात फक्त छत्रपती संभाजी आणि कवी कलश यांच्या व्यतिरिक्त कुठेच पाहायला नाही. उत्तर भारतात ही कथा खूप प्रसिद्ध आहे पण आपल्याकडे खूप कमी लोकांना याची माहिती आहे. त्यासाठीच ही माहितीपर कथा आपल्यासाठी देत आहे.

वादळ

लेखक Bhagyashri satish vasane यांनी शुक्रवार, 21/10/2016 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाच्या वाटेवर बरीच होती स्वप्न ह्रदयाच्याच्या जवळची बरीच होती मानसं आयुष्याच्या सायंकाळी सगळं कसं दाटून आलं मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...!

मराठ्यांचा आदर्श.. छत्रपती शिवाजी महाराज...

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 21/10/2016 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
शिवचरित्रावर आधारित रचलेली कविता.. नाही आम्हा भिती कोणा मुघल और निजामाची.. फक्त आहे भूक तळपती मर्द मराठी प्रेमाची.. आले बहु गेले बहु उध्वस्त करण्या धरती.. सर्वांवरती भारी पडला एकला तो छत्रपती.. रक्त मराठी श्वास मराठी मराठी तो बाणा.. शिवनेरीवर बाळ जन्मला स्वराज्याचा राणा.. जिजाऊंचे मार्गदर्शन अन् कोंडदेवांचे शिक्षण.. उभा राहीला बाल मराठा करण्या शत्रूंचे भक्षण.. मित्रांसवे त्या शंभूमंदिरी घेतली शपथ स्वराज्याची.. हिंदूत्वाच्या वीर लढ्याची अन् प्रेमळ सुंदर सुराज्याची.. जिंकूनी प्रथम तोरणागड जगद्जाहीर केली वीरता.. सतराव्या वर्षीच पराक्रम दाविला वार्याने पसरली वार्ता.. आदिलशहाने होऊनी अस्वस्थ ने

वारसा महाराष्ट्राचा

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 21/10/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र.. आपली माय मराठी धर्ती.. आणि या धर्तीवर शिवकाळापासून अस्खलित बोल्ली जाणारी आपली मराठी मायबोली.. याच बोलीने वर्षानुवर्षे जतन केलेला महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि आधुनिक वारसा मी या कवितेतून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेच नाव आहे वारसा महाराष्ट्राचा... वारसा महाराष्ट्राचा हिंदोस्ताँ वंदितो तयाला अशी ही अपुली किर्ती.. निसर्गाचे ऐक्य सांगते माय मराठी धर्ती..

वेळ ही निराळी (भाग दोन)

लेखक कऊ यांनी शुक्रवार, 21/10/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ ही निराळी भाग दोन ती एक रात्र. त्या एका रात्रीत सर्व काही चेंज झालं.. सर्व काही.. ती वेळ अशी होती की तेव्हा नाती बदलली.. ती वेळ निराळी होती.. पुजा गोरे.. ती मुलगी जी कधीतरी केवल वर जीव ओवाळून टाकायची,तीच पुजा अजय सोबत होती आज.दुपारचं जेवण सुमोने बाहेरून मागवून घेतल.जेवून झाल्यावर पुन्हा आमच्या गप्पा सुरु झाल्या.

जगलो आहे

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 21/10/2016 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
जगलो आहे मनसोक्त डुंबावेसे वाटले पण काठावरतीच जगलो आहे आख्खी भाकर तर सोडाच चतकोर वाट्यातच जगलो आहे नुसतेच पाहणे, वास कसला घेतो गुलाबाच्या काट्यातच जगलो आहे गुरू त्यांचे प्रबळ होते राहू केतूच्या कचाट्यात जगलो आहे सुख एवढेच निखारे नव्हते गरम फुफाट्यात जगलो आहे राजेंद्र देवी

कामाची टाळाटाळ, उत्पादकता, व्यवस्थापन आणि कानबान

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 21/10/2016 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, डिस्क्लेमरः या लेखात बरेच मुद्दे आहेत ज्यावर एक एक कादंबरी होईल, पण थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा. प्रतिसादांमधे चर्चा/प्रश्न उत्तरे यातून आणखी उपयुक्त होईल अशी आशा. धन्यवाद. जशी आपण उत्तरोत्तर प्रगती करतो तसा कामांचा व्यापही वाढत जातो. वेळ आणि शरीरक्रियांवर आपला फारसा ताबा नसतो. मग या सर्वातून काही लोक कसे यशस्वी होतात किंवा ही तारेवरची कसरत फार त्रास न होता कशी संभाळतात?