Skip to main content

प्रेम म्हणजे काय

लेखक सोहम कामत यांनी रविवार, 23/10/2016 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम प्रेम म्हणता तुम्ही प्रेम म्हणजे काय?? साखरेचा गोडवा की दुधावरली साय?? प्रेमाला ना कसले बंधन म्हणता तुम्ही कसे.. जाती गोती विणूनी माणूस कुंडलीच अभ्यासे.. कुंडलीतले शनी नि मंगळ पैदा करती दोष.. ३६ गुण जुळता तुम्हा मिळतो तो संतोष.. गोंधळात या विसरून जाता मुलांचा तो अभिप्राय.. प्रेम प्रेम करता तुम्ही अहो प्रेम म्हणजे काय?? साखरेचा गोडवा की दुधावरली साय?? प्रेम असते सुंदर निर्मळ म्हणता तुम्ही कसे.. आकर्षणाच्या व्यसनामध्ये शिक्षण मुलांचे फसे.. घरातली ती लक्ष्मी फक्त सांभाळे चुल नि मुल.. नवरा घरचा कर्ता धर्ता बनवी विचित्र रुल.. संसारात प्रेमाची त्या बनते गरीब गाय.. प्रेम प्रेम म्हणता तुम्ही प

"स्व"....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 22/10/2016 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ .... कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ.... व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच..... जगात काय तो एकटा शहाणा मीच ! एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान..... आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !? आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ? का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ? जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार..... स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..! सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो "स्व" मध्येच अडकलात तर....प

वेग...

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 22/10/2016 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
वेग मरण एवढे सोपे झाले जगणे अवघड झाले आहे आता यम एकटा नाही जागोजागी त्याचे चेले आहे म्हातारे कोतारे मरती तरुण मरती रस्त्यावरती मृत्यू म्हणजे काय ज्यांना न कळते लहानपणीच आयुष्य संपले आहे सारे ओढवून धेतलेस तू मानवा वेगाने तुला भारले आहे आपल्याच भाऊबंदास तू स्वतः मारले आहे राजेंद्र देवी

तीन्ही डिबेटमधे जिंकून, अमेरिकन दुर्गेची- हिलरीची, ८ नव्हेंबरकडे आगेकूच

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 22/10/2016 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
"हिलरीने ट्रम्पला तिसर्‍या डिबेटमधे सफशेल पाडलं हे खरं आहे का रे भाऊ?" "नक्कीच.

जो अभ्यास करेल तो पास होईल

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 21/10/2016 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
विजय कोणाचा आमच्या देशावर अनेक परकीय आक्रमकांनी आक्रमण केले. त्यामधे बाबर होता, अहमदशहा अब्दाली होता. हे सगळे आक्रमक मुस्लिम होते म्हणून आम्ही याचे वर्णन ईस्लामिक आक्रमण असे करतो. आता प्रश्न असा आहे की या आक्रमणांमागे ईस्लामची प्रेरणा होती का आणि विजय मिळाला असेल तर तो ईस्लामच्या तत्त्वज्ञानाचा विजय मानायचा का म्हणजे मग ईस्लाम विरुद्ध हिंदू तत्त्वज्ञान असा सामना झाला का . . ईस्लामला मानणारे जे देश आहेत उदा बांगलादेश, पाकिस्तान.

भारतीय सैनिक

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 21/10/2016 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय सैनिक राष्ट्र रक्षितो वीर होवूनी बलाढ्य खमका परवत.. नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत... शूरवीर तो धर्मवीर तो कर्तव्यदक्ष पुत्र.. भूमीरक्ष तो शत्रूभक्ष तो हिंदूस्वराज्य मित्र.. स्वाभिमानी तो प्राणदानी तो देशप्रेमी तो राणा.. तप्तसूर्य तो प्रांतधैर्य तो हिंदोस्तानी बाणा.. युद्ध खेळतो श्वास वेचूनी मनी स्थापितो भारत.. नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत... जीव हरवतो गर्व मिरवतो देशभक्त तो हिंदू.. नभी गरजतो फक्त समजतो शिवस्वराज्य शिवसिंधू.. विश्व विसरतो जगी पसरतो स्वतंत्र हिंदवी जीत.. रयत सुखवितो भाग्य पिकवितो स्मरितो राष्ट्रगीत.. ग्रिष्म शिशिर वर्षा तो भोगतो भगवे रक्त सांडत.. नयन द

हिमाचली पदार्थ - भटुरे (कणकीचे भटुरे)

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 21/10/2016 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
भटुरे नाव ऐकल्यावर मैद्याचे छोले भटुरे आठवतील. पण हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात सक्रेणादेवीच्या मंदिराजवळ असलेल्या गावात भटुरे बनविण्यासाठी मैद्याच्या जागी कणकीचा वापर होतो. बहुतेक सकाळी नाश्त्यासाठी हे भटुरे केले जातात. या भटुरर्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे भटुरे तळून किंवा तव्यावर भाजून केले जातात. (भटुरे बनवितानाचे फोटो खाली दिलेले आहे, कुणाचा चेहरा दाखविणार नाही या अटीवर फोटो काढले होते). मैद्याच्या भटुरर्या सारखे हे भटुरे पण फुलतात. आपल्या मराठमोळ्या पोळी एवढे मोठे पण दुप्पट जाड नक्कीच असतात. आपण आपल्या पद्धतीने भटुर्यांचा आकार निश्चित करू शकतो.

शेतकरी राया..

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 21/10/2016 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी राया... अपुला शेतकरी राया, शेती प्रेमाची करतो.. अवघ्या भुकेल्या जनांची, ओंजळ प्रितीने भरतो.. अपुला शेतकरी राया, नांगर ओढतो जोमानं.. पिक हलते डुलते, शेती खुलते प्रेमानं.. अपुला शेतकरी राया, धनधान्य खुलवितो.. सार्या जगाचा तो बाप, जगी प्रेम फुलवितो.. अपुला शेतकरी राया, कर्जाखालीच राबतो.. पर्जन्याच्या वाटेवर, तोच एकला थांबतो.. अपुला शेतकरी राया, रोज जगतो मरतो.. जगा धान्य पुरवूनी, पोटी भाकरी भरतो.. अपुला शेतकरी राया, संसाराचे सोने करतो.. जगा सुखी करवूनी, स्वत: गरिबीमधे झुरतो.. अपुला शेतकरी राया, शेवटी आत्महत्या करी.. जगा फुलवूनी सार्या, दैवत्वाचा रस्ता धरी.. प्रिय शेतकरी राया, आत्महत

Remake of title song of रात्रीस खेळ चाले...

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 21/10/2016 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार्या त्या रातीमधूनी शांत भयाण घरट्यामधले पक्ष्यांचे ते किलबिल गाणे मौन अचानक झाले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. सुन्या सुन्या त्या वाटेवरूनी एकांताला साद घालता नयनी विचित्र भुताटकीचे दाहक चित्र ते दिसले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. पाचोळा तो सैरावैरा वारा हा पिसाट वाहे भयभीत उभे ते झाड पान स्तब्ध ते झाले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. सावल्या त्या मुक्याने हलती भोवताली त्या विणती माया डोहाच्या या खोल तळ्याशी सावट गुढ पसरले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. नि:शब्द तरंग हे उठले अंधार सारे चांदण झाले आकाश रहस्यमय धुक्याला आले विरून गेले रात