Skip to main content

काय करावे!!! तिच्याशी नाते जोडावे की नको???

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी रविवार, 05/02/2017 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी या आधीच माझं वय व माझी पार्श्वभुमी आंतरजालावर सांगुन झालेली आहे.मी अविवाहीत आहे.सध्या एका to be or not to be प्रकरणात अडकलो आहे. जास्त फाटे न फोडता विषयाला हात घालतो.माझ्या घराजवळ एक विवाहीत तरुणी राहते.तिचे व माझे कुटुंब एकमेकांना ओळखते.ति साधारणतः माझ्या पुढे तीन चार वर्ष मोठी असेल .आधी कधी तिने माझ्याशी संपर्क ठेवला न्हवता.माझ्याकडे बघतही नसायची.पण अचानक गेल्या काही महीण्यात तिचा नूर बदलला व ति माझ्याकडे हेतुतः बघायला लागली.तशी ती दिसायला खूप सुंदर आहे.

(३) डेटा लॉस - ऑपरेटिंग सिस्टम ने हार्ड डिस्क डिटेक्टच केली नाही तर

लेखक केंट यांनी रविवार, 05/02/2017 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
"आता ऑपरेटिंग सिस्टम ने हार्ड डिस्क डिटेक्टच केली नाही तर ? " या पूर्वीच्या सॉफ्टवेअर प्रोसेस आपण घरच्या घरी करू शकतो. आता या पुढील प्रोसेस , महत्वाचा डेटा असलेल्या हार्डडिस्क वर करू नये. काही प्रश्न असल्यास इथे विचारावेत. ऑपरेटिंग सिस्टम ने हार्डडिस्क डिटेक्टच केली नाही तर सॉफ्टवेअर प्रोसेस निरूपयोगी आहे.अश्या वेळेस हार्ड डिस्क खालील सिंप्टम्स दाखवते का ते नोंद करावे 1. हार्ड डिस्क मधे आत प्लॅटर फिरत असल्याचा आवाज येत आहे का ? 2. हा आवाज काही वेळेत बंद होऊन डिस्क फिरण्याची बंद होते आहे का ? 3. फिरण्याच्या वेळेत क्लिकिंग चा आवाज येतो का ? 4.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - भारत विरुद्ध झिंबाब्वे

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 05/02/2017 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
१८ जून १९८३ नेव्हील ग्राऊंड, टनब्रिज वेल्स केंट काऊंटीतल्या टनब्रिज वेल्सच्या ग्राऊंडवर भारत आणि झिंबाब्वे यांच्यातली दुसर्‍या राऊंडची मॅच रंगणार होती. ग्रूपमधल्या पहिल्या राऊंडच्या मॅचेसमध्ये डंकन फ्लेचरच्या अननुभवी झिंबाब्वेने किम ह्यूजच्या ऑस्ट्रेलियाला चकवलं होतं! कपिल देवच्या भारतीय संघाने तर पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडीजला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला होता! १९७५ पासून वर्ल्डकपमधली एकही मॅच न गमावणार्‍या वेस्ट इंडीजचा हा पहिलाच पराभव होता! पहिल्या राऊंडमध्ये भारताने झिंबाब्वेचा आरामात पराभव केला असला तरी ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली होती.

!!...'मानवी भूकंप'...!!

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 05/02/2017 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत
काव्यरस

आताशा.. असे हे.. मला काय होते

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 05/02/2017 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
संदीपची कविता रसग्रहणापलिकडे आहे कारण त्याला जे सांगायचंय ते सहज, सोपं आणि समोर आहे. प्रत्येक शब्द बोलका आणि प्रत्यकारी आहे. शब्द वाचताक्षणी आपण त्या अनुभवाशी एकरुप होतो, मग अजून रसग्रहण काय करणार ? तरीही त्याच्या या कवितेला एक दाद म्हणून हा रसास्वाद सादर केल्याशिवाय राहावत नाही. संदीप म्हणतो की त्याची कविता गाणं होऊनच प्रकटते. म्हणजे अनुभव व्यक्त होण्यापूर्वीच त्याचा मनात अनुरुप सांगितिक माहौल तयार झालेला असतो. ही गोष्ट केवळ दुर्लभ आहे. कारण त्याला शब्दांची जुळवाजुळव करायला लागत नाही. त्याचा संवेदनाशिल अनुभव प्रवाही होऊन प्रत्ययकारी शब्दांन्वये कविता होतो.

(२) डेटा लॉस - अर्थात् हार्ड डिस्क फेल होणे

लेखक केंट यांनी शनिवार, 04/02/2017 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम माझा उत्साह वाढवल्या बद्दल धन्यवाद् . समस्या क्र 1. हार्डडिस्क वर्किंग आहे पण डेटा डिलीट झाला आहे. किंवा हार्ड ड्राइव फॉरमॅट झाली आहे.. इंटरनेट वर उपलब्ध अनेक सॉफ्टवेअर जसे की r-studio , recover my data , EaseUS Data Recovery, इत्यादी वापरुन डेटा रिकवर करता येऊ शकतो.. आता डेटा रिकवरी सॉफ्टवेअर आणि आपल्या हार्ड ड्राइव ह्यांच्या मधे संगणकाची ऑपरेटिंग सिस्टम आहे.. याचा अर्थ संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टम ने सर्व प्रथम हार्ड ड्राइव डिटेक्ट केली पाहिजे.. मग डेटा रिकवरी सॉफ्टवेर आपले काम करू शकतो..

माणूस

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 04/02/2017 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
(हि गझल मला पूर्वी डिसेंबरच्या महिन्यात इथे टाकल्यासारखी वाटतेय. पण आता कुठेच सापडत नाहीये मिपावर त्यामुळे गोंधळलोय. पुनरावृत्ती होत असल्यास कृपया कुठली तरी एकच प्रत ठेवावी ही संपादक मंडळाला विनंती.) माणसांना बदलण्याला वेळ कोठे लागतो ? बदलण्याने काळ ही माणूस कोठे बदलतो? नित्य येथे हातघाई अन लढाई प्राक्तनी हारण्याचे लाख रस्ते, रोज आता शोधतो भाकरीचे शोधताना चंद्र रस्ता हरवला वाटमारी जीवनाची कोण येथे टाळतो ? पोर कोणाची गुलाबी स्वप्न विकते हासुनी नजर चुकवुन रोज मी ही काच का हो चढवतो? पाठ थोपटते कुणीसे, लाज मग धिक्कारते ओढुनी पडदे मनाचे मी स्वतःला शोधतो ! विशाल कुलकर्णी ...
काव्यरस

नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने !

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 04/02/2017 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने नोकरीशी जुंपणेही फिरुनी ते, नव्या दमाने । राहीले मनात गाणे, वर बॉसचे जोडे नव्याने, काय पडलो मी भरीला, बिल्डरांच्या सुक्या दमाने । कोणत्या शैय्येवरी असते मजा सांगा गड्यांनो, छळे इएमाय वेळी-अवेळी, रोजचा नव्या बळाने । भूक तगडी पण रोमान्सही, का जमेना रोज आता ? रेंटातूनी हप्ता वळविणे माथी का, पुन्हा नव्याने । तू मला कुरवाळणेही सोडले आहे अताशा, टेक-होम झाला कमी का?

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 04/02/2017 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
१९८३ चा वर्ल्डकप हा पूर्वीच्या दोन्ही वर्ल्डकपच्या तुलनेत अनेक दृष्टींनी वैविध्यपूर्ण होता. १९७९ च्या वर्ल्डकपप्रमाणेच ८ टीम्सना दोन ग्रूपमध्ये विभागण्यात आलं होतं, परंतु यावेळी प्रत्येक टीमच्या ग्रूपमधल्या दुसर्‍या टीमशी २ मॅचेस होत्या. इंग्लंडच्या लहरी हवामानाचा फटका बसल्यामुळे एखाद्या टीमला वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळण्याची वेळ येऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. वाईड्स आणि बंपर्सच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्याच्या अंपायर्सना सूचना देण्यात आल्या होत्याच, परंतु या वर्ल्डकपमधली सर्वात नाविन्यपूर्ण बाब म्हणजे या वर्ल्डकपपासून ३० यार्डचं सर्कल अस्तित्वात आलं.