Skip to main content

शांत अता या गाजा होणे नाही ..

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 08/02/2017 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
रंक कधीही राजा होणे नाही (त्याचा गाजावाजा होणे नाही) तू राणी आहेस चार भिंतीतच खुला अता दरवाजा होणे नाही तू तेथे मीही येथे आहे पण मला तुझा अंदाजा होणे नाही मी सारे विसरुन चाललो आहे घाव नव्याने ताजा होणे नाही मी नेकी दर्यात टाकली आहे (शांत अता या गाजा होणे नाही) डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

बोल नुपूरांचे

लेखक चांदणशेला यांनी बुधवार, 08/02/2017 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन समयी नित्य येई त्या लहरींतूनी मंजूळ ध्वनी तरंगे किनारी फुले सुगंधी अंतरंगी भावपिसारा पसरूनी रेशमी हिंदोळ्याच्या शुभ्र तटी मनोहर निर्झराची मुक्त वाणी फुलून आल्या दिशा दाही चोहीकडे हसे वसुंधरा कामिनी हिरव्या दलांत बोल नुपूरांचे निळ्या अंबरी चुकली धरणी
काव्यरस

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 08/02/2017 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
१९८३ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकल्यावर वर्ल्डकपचे यजमान म्हणून इंग्लंडची मक्तेदारी संपुष्टात आली. १९८७ च्या वर्ल्डकपचं यजमानपद भारत आणि पाकिस्तानला संयुक्तपणे बहाल करण्यात आलं त्यामागे १९८३ मधल्या भारतीय विजयाचा फार मोठा हातभार होता. या वर्ल्डकपमधला आणखीन एक महत्वाचा बदल म्हणजे पूर्वीच्या तीनही वर्ल्डकपप्रमाणे एका इनिंग्जच्या ओव्हर्स ६० वरुन ५० वर आल्या. तसंच इनिंग्जच्या मध्ये लंच आणि टी-टाईमला फाटा देण्यात आला. ९ ऑक्टोबर १९८७ चेपॉक, मद्रास मद्रासच्या चेपॉक मैदानावर (आत्ताचं एम ए चिदंबरम स्टेडीयम) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ग्रूप ए मधली मॅच रंगणार होती.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: धनुष्कोडी आणि मनकवडा

लेखक पलाश यांनी बुधवार, 08/02/2017 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
aa धनुष्कोडीचा नयनमनोहर समुद्रसंंगम आणि रामसेतूचंं दर्शन फार प्रसिद्ध. ते अनुभवण्यासाठी दोघेजण उत्साहात रामेश्वरला बसमध्ये बसले. बस थांंबली. समोर समुद्र आणि अफाट वाळू. त्या वाळूतून शेवटपर्यंंत नेण्यासाठी खास गाड्या उभ्या होत्या. अवाजवी भाव व अडवणूक खटकल्यानं त्या गाड्यांंनी जायला अजिबात मन होईना. दुसर्या बाजूला इथेपर्यंंत येऊनही धनुष्कोडी पहाण्याचंं नीलसुंंदर स्वप्न अपुरंं रहाणंं पण रुचेना.!! तिच्या बोलक्या चेहेर्यावर सगळंंसगळंं लिहिलेलंं होतंं.

शतशब्दकथा स्पर्धा: पाऊलखुणा

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 08/02/2017 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
aa तुझ्या पाऊलखुणा पुसू नयेत म्हणून त्या दिवशी त्याने भरती रोखून धरली होती म्हणाला. वाळू तुडवत मी तुझ्या मागे येईन आणि थांबवेन तुला, उद्या तू माझ्यावरचा राग विसरशील अन पुन्हा कातरवेळी आपण त्याला अशीच आजच्यासारखी सोबत द्यायला येऊन बसूत, या आशेने त्याने बराच वेळ वाट पहिली म्हणाला. एकदा तुझ्या पाऊलखुणांबरोबर चालत गेलेल्या माझ्या पाऊलखुणा पाहिल्या की मी निर्धास्तपणे पाटी पुन्हा कोरी करायला मोकळा असेही म्हणाला.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नोटबंदीचा एक अर्थ असाही

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 08/02/2017 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa घरात तीन हजाराच्या आसपास कॅश असेल,खरेदीसाठी राजेश, तेजसकडे उधारी करता येईल. माझ्याकडे आणि हिच्याकडे कार्डस तर आहेतच, त्यावरचे पॉईंटस बघून घ्यायला हवेत. माझ्या मनातली आर्थिक गणिते अव्याहतपणे चालूच होती. "डॅडा" माझ्या छकूलीच्या आवाजाने मी एकदम भानावर आलो. "या नोटा कॅन्सल झाल्याने किती छान झालयं ना ? " नोटबंदीचा या छोट्याश्या मुलीवर कसा काय परिणाम झाला असेल?

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो !

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 08/02/2017 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप औलीया आहे याची साक्ष देणारी ही एक सुरेख कविता ! स्वच्छंद जगण्याची आदीम उर्मी प्रत्येकाच्या अंतरी आहे पण रोजच्या जगण्यात ती हरवून गेलीये.

मोबियस...प्रकरणे १-३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 07/02/2017 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
बघावी तिकडे वाळू! त्याच्या मनात विचार आला, ‘छे! ही वाहणारी वाळू काही जीवनासाठी आवश्यक आहे असे वाटत नाही. पण स्थिरता ही आयुष्यासाठी आवश्यकच आहे असेही नाही. जर सगळेच वाहत्या वाळूसारखे वाहत्या जीवनात सामिल झाले तर या जगात स्पर्धाच उरणार नाही.

मिपावर नवीन कादंबरी - मोबियस

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 07/02/2017 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
मोबियस : मोबियस नावाचा एक पट्टा मोबियस नावाच्या शास्त्रज्ञाने जगासमोर आणला. याचे वैशिष्ट्य याच्या पृष्ठभागाला एकच बाजू किंवा एकच सीमा असते. आपण एखादी मोबियस स्ट्रिप सहज बनवू शकतो एक कागदाची पट्टी घ्यायची व त्याला मधे पीळ पाडून तिची टोके चिकटवून टाकायची. आता यावरुन जर एखादी मुंगी एकाच दिशेने प्रवास करु लागली तर ती परत त्याच बिंदूपाशी येऊन थांबते. या प्रवासात ती एकदाही कागदाची कड ओलांडत नाही पण कागदाच्या दोन्ही बाजूने प्रवास करते. दिसायला हे सोपे आहे पण गणितात यावर बराच अभ्यास झालेला आहे, जो मी येथे लिहू शकत नाही व मला एखाद्या गणीततज्ञासारखे लिहिताही येणार नाही.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - फायनल - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 07/02/2017 05:16 या दिवशी प्रकाशित केले.
२५ जून १९८३ लॉर्ड्स, लंडन लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानातच पहिल्या दोन वर्ल्डकपप्रमाणे तिसर्‍या वर्ल्डकपचीही फायनल रंगणार होती. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना फायनलमध्ये येऊन धडकलेल्या भारतीय संघाचा सामना होता तो क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीजशी. पहिल्या दोन वर्ल्डकपप्रमाणेच तिसरा वर्ल्डकप जिंकून हॅटट्रीक करण्याचा लॉईडचा निर्धार होता. त्यातच भारत फायनलला आल्यावर तर फायनलची मॅच ही केवळ एक औपचारिकता आहे आणि वेस्ट इंडीजने वर्ल्डकप जिंकल्यातच जमा आहे असं जवळपास प्रत्येकाचं मत होतं! अर्थात वेस्ट इंडीजचा संघही तसाच होता.