Skip to main content

संतापाचा रीटेक

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 17/02/2017 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
अडखळत अडखळत चालताना फार पारा चढतो असं वाटतं जो तो येऊन माझ्याच पुढ्यात अडतो ट्रॅफिकमधे गाडी स्कूटर, गर्दीमधे माणसं हॉर्न वाजवून, ओरडून बिरडून बदलत नाही फारसं वाटतं एकेकाला कुदवावं, किंवा सरळ साला उडवावं काय म्हणजे मला चायला ज्याने त्याने अडवावं? पण कुदवताही येत नाही, उडवताही येत नाही मनाला जे हवं ते घडवताही येत नाही आता आम्ही सलमान खान नाही, की कुणी लोकल डॉन नाही आणि बघताच जगाने बाजू व्हावं, अशी आमची शान नाही बरं उडत बिडत जाऊ शकू तर आम्ही ब्याट म्यान नाही मग आहेच आपली चरफड, शिव्या-शाप नि खळखळ यंत्रवत गर्दीमधे आम्हीच होतोय अडगळ मग कुणीतरी म्हणून जातं, इथे असंच असतं जखमेवरती मीठ टाकावं, तसं हे व
काव्यरस

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - क्वार्टरफायनल - भारत विरुद्ध पाकिस्तान

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 17/02/2017 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
१९९६ चा वर्ल्डकप हा १९८७ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय उपखंडात झालेला दुसरा वर्ल्डकप होता. भारत आणि पाकिस्तान यांच्या जोडीला श्रीलंकेलाही स्पर्धेचं संयुक्तं यजमानपद बहाल करण्यात आलं होतं. श्रीलंकेतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजने श्रीलंकेत मॅचेस खेळण्यास नकार दिल्यावर या दोन्ही संघांची खात्री पटावी म्हणून श्रीलंका विरुद्ध भारत-पाकिस्तान अशी मॅच खेळवण्यात आली होती. या मॅचमध्ये वासिम अक्रमच्या बॉलवर सचिन तेंडुलकरने रोमेश कालुवितरणाचा कॅच घेतल्याची नोंद झाली!

मोबियस प्रकरणे भाग -२ प्रकरणे १३-१४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 17/02/2017 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
ते त्याने केलेही असते सहन. पण तेवढ्यात त्या विवराच्या कडेने निळसर प्रकाश आत घरंगळत आला आणि सगळे चित्र बदलले. जसा एखादा स्पंज पाणी शोषून घेतो त्याप्रमाणे झोप त्याला आकर्षित करु लागली आणि तो झोप येऊ नये म्हणून झोपेशी झगडू लागला. हे चक्र कुठेतरी भेदायलाच हवे होते.

प्रश्नत्रयी

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 16/02/2017 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण-विवराच्या गर्भीच्या कल्लोळा वेध का लागती दिक्काल-मुक्तीचे ? स्थूलास व्यापून सूक्ष्मात सांडता कैवल्य ओलांडी उंबरे कशाचे ? तुझ्या नि माझ्या निर्लेप नात्याला पाश हे कशाला जीवन मृत्यूचे ?
काव्यरस

होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा,

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 16/02/2017 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा, व्होटर होता सभापती मधोमध उभा. व्होटर म्हणाला, व्होटर म्हणाला, "मित्रांनो, देवाघरची लूट..
काव्यरस

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - सेमीफायनल - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 16/02/2017 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
२२ मार्च १९९२ एससीजी, सिडनी न्यू साऊथ वेल्समधल्या सिडनीच्या ऐतिहासिक मैदानात गेल्या वर्ल्डकपमधले उपविजेते इंग्लंड आणि अपार्थाईड व्यवस्था मोडीत निघाल्यावर वर्षाभरापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेली दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल रंगणार होती. या मॅचमधील विजेत्या संघाची मेलबोर्नच्या मैदानावर फायनलमध्ये गाठ पडणार होती पाकिस्तानशी! ग्रॅहॅम गूचच्या इंग्लिश संघात स्वतः गूच, अनुभवी अ‍ॅलन लॅम्ब, ग्रॅहॅम हिक, नील फेअरब्रदर, अ‍ॅलेक स्ट्युअर्ट असे बॅट्समन होते. इंग्लंडच्या बॉलिंगचा भार मुख्यतः अनुभवी फिलिप डिफ्रीटार, ग्लॅडस्टन स्मॉल, रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर होता.

!!! ....सभा "Social Networking " ची.... !!!

लेखक बटाटा चिवडा यांनी बुधवार, 15/02/2017 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा.. चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा.. Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची.. Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King' सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " .. Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike.. या सर्व गदारोळात.. Myspace, PerfSpot, BigAdda ओरडत होते 'आम्ही पण आह

धोडपचे धाडस - सोलो ट्रेक

लेखक भटक्या चिनु यांनी बुधवार, 15/02/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून काही जण गोंधळतील तर काहींचा विश्वास बसणार नाही. पण जे अनुभवलयं तेच इथे लिहीत आहे. सतरा वर्षांच्या ट्रेकींग प्रवासातील मी एकट्याने केलेला पहिलाच ट्रेक. एक वेडेपणाच.             नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात माझी पंढरीची वारी (परीक्षा) आटोपली होती. त्यानंतर आँफिसला रूजू होण्याची घाई नसल्याने खूप निवांत झालो होतो. आजच्या काळात नशिबाने मिळालेल्या अशा मोकळ्या वेळात वाचन पुन्हा सुरू केलं. पण यंदा चटक लागली ती e-sahityवरच्या 'भूतकथा, रहस्य, गूढकथा, तंत्र-मंत्र' ह्यांची. दिवसरात्र ती पुस्तक वाचवून संपवत होतो.

भाषेचे मूळ : चिंता आणि चिंतन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/02/2017 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जानेवारी-फेब्रुवारी (२००३) महिन्यात भाषेविषयीच्या राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रासाठी ‘अहिराणी भाषेचा प्रतिनिधी’ या नात्याने निमंत्रित म्हणून म्हैसूर येथील केंद्रीय भाषा संशोधन संस्थेत गेलो होतो. दिवसभर परिसंवादातील चर्चा आणि रात्री विविध नाटके पाहायला मिळत होती. नाटकांना जाताना भाषेची निवड हा भाग दुय्यम महत्त्वाचा होता.