Skip to main content

रिक्त प्याल्याच्या तळाशी...

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 05/04/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते! ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते! तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते! तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते! केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते! नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते! —सत्यजित
काव्यरस

डाव - २ [खो कथा]

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 05/04/2017 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
डाव १ -------------------------------------------- डाव - २ मास्तर : “तुमची झेडपी पैका गियका पुरवत नाय का?” सरपंच जगन पाटलानं तक्याला रेलत विचारलं. जोरकस वजन पडल्यानं तो हवा भरलेल्या उशीवानी पिचकला. “सहा महीने झाले अहवाल पाठवलाय पण आजून मदत मिळाली न्हाय. सरकारी कामं कशी असतात तुम्हाला तर माहीतच आहे.” “चांगलंच माहिते.” “शाळेची दयनीय अवस्था झालीये. चार वर्गांमधले टीनं फुटले, उन पाऊस डायरेक्ट झिरपतो, बसायला पट्ट्य्या नाहीत, ऑफिसचा दरवाजा तुटलाय.

तुम्ही आहात का सुपरटेस्टर????????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 05/04/2017 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
माणुस हा असा प्राणी आहे जो फक्त पोट भरण्यासाठी खात नाही,जे खातो त्याची चव कशी आहे याचा सखोल विचार करणारा माणुस हा एकमेव प्राणी असावा.पण प्रत्येक माणसाला एखाद्या पदार्थाची चव सारखीच लागते असा आपला समज आहे.पण तो खरा नाही.याचा शोध म्हणावा असा प्रकार १९३१साली लागला.

पुणे ते वाडा... भाग 1

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 05/04/2017 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रवासाचा पूर्वार्ध म्हणून हा धागा वाचावा. आता सायकलची शोधाशोध सुरु झाली, मिपावर सायकल संदर्भातला एक लेखही वाचनात आला. सुरुवातीला एखादी कमी किमतीची जुनी सायकल घेऊन आपण किती सातत्याने चालवतोय हे स्वत:च बघावं नंतर एखादी चांगली सायकल घ्यावी असे ठरवले. लगेच ओ एल एक्स आणि क्विकर सारखे पर्याय वापरून शोधाशोध केली पण त्यात सायकलचे व्यवस्थित डिटेल्स मिळत नव्हते. आणि मलाही या क्षेत्रातील काही विशेष माहिती नव्हती. आजूबाजूला कोणीही नव्हतं मार्गदर्शन करायला. मग मोदकशी संपर्क साधला.

अंडरटेकर: End of an Era

लेखक दाह यांनी बुधवार, 05/04/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंडरटेकर हा जगप्रसिद्ध WWE कुस्तीपटू परवा निवृत्त झाला आणि एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. त्याने त्याच्या वाढत्या वयामुळे निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असेल पण यामुळे आपलंही वय बरच वाढलंय की असं वाटून गेलं. अख्ख लहानपण झपाटलेलं या माणसाने. अंडरटेकर हे पात्रच असं होतं की त्याभोवती अफवांचं वलय निर्माण होणं साहजिक होतं. Dead man walking अशी बिरुदावली उगाचच नव्हती मिळवली त्याने. त्याची एंट्री होण्याआधी सर्वत्र अंधार व्हायचा, एक निळा प्रकाश पसरायचा आणि मग अचानक वाजू लागलेल्या घंटा ऐकल्या की धडकी भरायची. त्याच एका लयीत चालणं,भुतासारखे लांब केस, ओव्हरकोट आणि डोक्यावर हॅट.

कॅरॉट

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 05/04/2017 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
मॉलमधील टॉप फ्लोअरला तो बसला आहे ती बसली आहे संगीत आहे ब्लॅकफॉरेस्ट आहे एसीची चिलिंग शांतता आहे त्याच्या हातात एक पेन आहे मंद हसत तो म्हणाला. "हाऊ अबाउट अ सेल्फी, डाईंग टू टेक इट विथ यू?" तिच्या ओठांचा आपोआपच चंबू झाला कोपराला छातीचा ओझरता स्पर्श... आणि क्लिक! --- डिलक्स अपार्टमेंट. फिफ्थ फ्लोअर. टू बीएचके. हळूहळू लिफ्ट वर येत आहे. आतमध्ये खुर्ची टाकून बसलेला पोरगा पेपरमध्ये काहिबाही वाचत आहे. त्याला बहुतेक तिची चाहूल नसावी. "झाला का इंटरव्ह्यू?" "यप" "लागली का नोकरी?" हाऊ डिसगस्टींग. नोकरी फोकरी काही नाही. इट्स ए जॉब मॅन. इट्स ए जॉब! ---- झंडू फार्मासिटीकल्स. न्यू जॉईनिंग. वेलकम.

फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 05/04/2017 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
मग्रूर काजव्यांचा संचार होत आहे पणती जपून ठेवा अंधार होत आहे! वाटेत सावल्यांचे थांबे नकोत मजला माझ्याच सावलीचा मज भार होत आहे! झाली नवीन ओळख,माझी मला अशी की ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे! सुरवंट वेदनेचा कोषांत वाढताना फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे! हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण? एकेक पाकळीचा गुलजार होत आहे! —सत्यजित
काव्यरस

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग ६

लेखक पद्मावति यांनी बुधवार, 05/04/2017 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ साधारणपणे केपटाऊन पासून पूर्वेला पोर्ट एलिझाबेथ पर्यंतच्या आठशे किलोमीटरच्या पट्ट्याला गार्डन राउट असे नाव आहे. निळाशार समुद्र आणि त्याला बिलगुन वळणावळणाने पुढे जाणारा हा गार्डन रूट.

मोसाद - भाग १४

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 05/04/2017 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
मोसाद - भाग १३ मोसाद भाग १४ १९८० चं दशक हे जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात मोठी उलथापालथ घडवणारं होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तरीच्या दशकातले राजकीय नेते या दशकाच्या सुरुवातीला अंतर्धान पावले. १९७९ मध्ये इराणमध्ये घडून आलेल्या इस्लामिक क्रांतीमुळे आणि ज्या पद्धतीने अमेरिकन सरकारने ते संपूर्ण प्रकरण हाताळलं त्यामुळे जिमी कार्टर यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाबद्दल अमेरिकेत असंतोष होता. तो जनतेने रोनाल्ड रीगन यांना निवडून देऊन दाखवून दिला. ब्रिटनमध्येही सततचे संप आणि हरताळ यांच्यामुळे लोकांमध्ये असंतोष खदखदत होता.

असावीस पास ....

लेखक अद्द्या यांनी मंगळवार, 04/04/2017 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
असावीस पास , जसा स्वप्न भास जिवॆ कासावीस झाल्याविना . संदीप खरेंच्या अनेक डोक्याला त्रास देणाऱ्या कवितांपैकी हि एक .आणि किती काही वाटलं तरी प्लेलिस्ट मधून जात नाही हि . रात्री हे गाणं ऐकत पडलो होतो . सुंदर गाणं . तशीच झोप लागली होती सकाळी ५.३० वाजता फोन वाजला . unknown number . इतक्या पहाटे कोण हा XXXX म्हणत फोन उचलून जवळपास ओरडलो. "वेळ काळ काही आहे कि नाही. ९ नंतर फोन कर. माणसं झोपेत असतात या वेळी .. " समोरून आवाज आला . थोडा घाबरलेला. तरी हि खुदखुदत " ए बाबा , तुझी चिडचिड कधी कमी होणारे रे. किती तापटपणा तो . बीपी वाढून फुटशील एक दिवस .