Skip to main content

वणवा

लेखक पद्म यांनी मंगळवार, 18/04/2017 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्वाळा या वणव्याच्या, स्पर्शिती रान सारे बापाविना जन्मला हा, कोण त्यास आवरे.... भासती भ्रमितांना, मुखवटे हिरवळीचे धीरास जाण आहे, हे खेळ दिखाव्याचे.... बागडे पैलतीरी, पाहून आक्रोश बीज आहे तेथेही, आंधळा सत्यास.... उडुनी जावे दूर, मार्ग एक आहे हृदयग्रंथी जपून, निवाराच अंत पाहे.... अंधकार ज्ञानाचा, मी मात्र उरेन भस्मसात जाहले ते, तरी एकटा जगेन.... मेघ येती घेऊन, आशा नव्या युगाची मंदभाग्य ते थोर, ज्यांना जाच स्वातीची.... करुणा थोर आहे, फिकीर त्या जीवांची कल्पातही दुर्मिळ, प्रतीक्षा 'त्या' घनाची...

देव्हारा...६

लेखक विनिता००२ यांनी मंगळवार, 18/04/2017 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
"ठीक आहोत, आपण आराम करा. आम्ही बाहेर जाऊन येतो. मग आपण बोलुयात!" "ठीक आहे." तनू उत्तरली. तिची रहायची व्यवस्था कुलभुषणने आपल्या बंगल्यावर केली होती. ती रुममधे जाऊन फ्रेश झाली. 'कुलभुषणशी काय आणि कसे बोलायचे.' याचा ती विचार करत होती. देव्हारा...६ रात्रीचे जेवण तिने कुलभुषणच्या फॅमिलीबरोबर घेतले. राजलक्ष्मीशी तिची तिथेच ओळख झाली. "उद्या आपण फॅक्टरीत जाऊया." म्हणुन कुलभुषणने विषय संपवला. सकाळी ती तयार होऊन हॉलमधे आली, तेव्हा कुलभुषणबरोबर अजुन दोन व्यक्ती तेथे हजर होत्या. "मॅडम, तुमची ओळख करुन देतो. हे अभिराम आणि हे रघुराज!

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |२|

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 18/04/2017 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
या जगात फक्त दोनच नशा आहेत, एक इश्क आणि दुसरी शराब. या ग़जलची खासियत अशी की शायर नशेतही आहे आणि तिच्या प्रेमातही आहे..... आणि कहर म्हणजे ती समोर आहे ! त्याला आता समजत नाहीये की आपल्याला चढलेला कैफ इश्काचाये की दारूचा. प्रेयसी नाराज होईल म्हणून तो तिला म्हणतो, की ही जी नशा आहे ती कालच्या दारूची आहे..... पण खरी नशा जी आहे ती तुझ्या प्रेमाची आहे ! त्याला दारूशी प्रतारणा करता येत नाही आणि प्रेयसीलाही समजावयाचं आहे कारण त्याची नशा दुहेरी आहे. दारुचा अंमल तर बेहोश करुन गेलायं पण तिच्या सहवासाची खुमारी त्याहून कमाल आहे. तर अशा या जबरदस्त काव्यविषयावर ही ग़जल इतकी बेफाम उतरलीये की बोलता सोय नाही.

(एक ग्लास त्याचा....)

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 17/04/2017 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा बसण्याचा हिशोब साचा एक ग्लास त्याचा, एक माझा! दिसायला दोन्ही एकच ब्रँडही सारखाच फक्त चखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा! माझा आधी संपेल, त्याचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार...

निसर्गरम्य खेड

लेखक भटकीभिंगरी यांनी सोमवार, 17/04/2017 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
" निसर्गरम्य खेड " चौदाला खेडला जाण्याचे नक्की केले..१४,१५,१६ अशि लागुन सुट्टी आल्यामुळे मुलीने आई कुठेतरी जाउया एकत्र असा प्रस्ताव ठेवला . मग इकडे तीकडे करता करता खेडला जायचे नक्की केले ... कुठे खास फिरण्याचा इरादा नव्हता .. कारण भयंकर उन्हाळा सुरु असल्याने उन्हातान्हात फिरणे त्रासदायकच ठरले असते . बस्स !!सकाळ संध्याकाळ आसपास नद्या, शेते, टेकड्या, मंदीरे असे फिरायचे, दुपारी आराम करायचा असा विचार होता ... चौदाला ठाण्याहुन सकाळी सव्वापाचला सुटणाऱ्या एसटीचे रिझर्वेशन केले होते त्याप्रमाणे गाडी ठिक सवापाचला ठाण्याहुन निघाली .. लवकर निघालो तर लवकर पोचु.

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 17/04/2017 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
फैझ अहमद फैजची ही रचना विजय सिंंगनं गायली आहे. विजय सिंग केवळ या एका गाण्यामुळे अजरामर झालायं आणि शराबींसाठी हा कलाम म्हणजे जगातल्या कोणत्याही काव्यापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरावा असा आहे. जे (किंवा ज्या) पीत नाहीत त्यांच्यासाठी हा लेख काही कामचा नाही, त्यांनी उगीच रंगाचा बेरंग करु नये.

हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण

लेखक Dr prajakta joshi यांनी सोमवार, 17/04/2017 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
"हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण" "रोगी चिरप्रवासी परान्न .भोजी परावसथशायी। यज्जिवती तन्मरणं यन्मरणं सो स्य विश्राम:।" अर्थ - आजारी व्यक्ती,नेहमी हिंडणारा ,बाहेरचे खाणारा,दुसर्याच्या आश्रयाने राहणारा यांचे जीवन मृत्युसमान असते.(आरोग्यास हानिकारक) आजच्या काळात मात्र फिरतीवर असणे व बाहेरचे खाणे ही जीवनशैली बनली असून ती अनिवार्य आहे. हाॅटेल मधील जेवण,फास्ट फुड,शीतपेय हे सारं नकळत तुमच्या -माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होवून गेले आहेत. हाॅटेलमधील जेवण हे आजकाल बहुतांशवेळा स्वच्छतेच्या दृष्टीने काटेकोर असते. पण टिकाऊपणासाठी वापरलेली रसायने, आकर्षकतेसाठी शरीरास अहितकर गोष्टीदेखील वापरल्या जातात.

एक मुक्तक

लेखक रामदास यांनी सोमवार, 17/04/2017 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी घाईघाईत बुटाच्या लेसा बांधताना, खण्णकन आवाज करत तो चौकोनी बिल्ला पोराच्या खिशातून लादीवर सांडला तेव्हा... गजराचं घड्याळ वाजल्या सारखा मी दचाकलो. पुन्हा एकदा तो लखलखीत तुकडा खिशात ठेवत पोरगा समंजस हसला... म्हणाला , तुमचाच आहे , काल तुमच्या जुन्या शर्टाच्या खिशात सापडला आईला , बोहारणीला कपडे देताना. "फेकून दे "म्हणाली "अवलक्षणी आकाशाचा तुकडा ", तोच दाखवून तुम्ही म्हणे तिला भूलवणीला लावलंत वगैरे वगैरे... आणि तुम्ही तरी कुठे बघता आजकाल उद्याचा दिवस या तुकड्यात , सारखे हातावर हात चोळता आणि तळहातावरच्या रेषा वाचता , असू दया आता ते माझ्याकडे, I am old enough .... वगैरे वगैरे ....
काव्यरस

टेंडर कोकोनट आईस्क्रीम

लेखक नूतन सावंत यांनी सोमवार, 17/04/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
टेंडर कोकोनट आईस्क्रीम . उन्हाळा सुरु झाला,की,निरनिराळ्या थंड वस्तूंचा मारा शरीरावर होऊ लागतो.त्यात काय नसतं?सब्जाचे बी,ठेचलेल्या धने+जिऱ्याचे पाणी कोकम-लिंबू-बेलफळ यांची सरबतं,पन्हं,ताक,लस्सी,दुधी-पालक-काकडी यांचा पुदिना,कोथिंबीर घालून काढलेला रस,निरनिराळ्या स्वादाची मिल्कशेस्,शहाळ्याचे पाणी, निरनिराळ्या स्वादाची आईस्क्रीम्स. यादी संपतच नाहीये. तर सांगायची गोष्ट अशी की,भर उन्हाळ्यात नागीण झालेला पेशंट घरात असल्याने भेटायला येणारे पाहुणे भेटीदाखल शहाळी घेऊन येऊ लागले.
Taxonomy upgrade extras