मेरे मरदको काम पे है जाना आणि काडीचा सरडा
काडीचा सरडा
ही कविता वाचल्यानंतर खालील दोन छायाचित्रे पाहिल्यास कवितेची परिणामकारकता वाढते.
होती शुष्क एक काडी झाडावरती
तुटूनी पडली खाली धरणीवरती
जणू ओढावले तिचे मरणचकी
वय होवोनी मातीत मिळाली
वेगळी झाली मग तिचे व्हावे काय?
धुळ मातीत मिळोनी कुजूनी जाय
प्राण जावोनी वृक्षापासोनी झाले शरीर वेगळे
पण धरेवरी पुनर्जन्म झाला मिळाले रूप निराळे
डोके छोटे वरती बघे मान उंचावूनी
पुढील पाय लांब केले खाली रेटूनी
लांब शेपटी आदळली खाली जमिनीवरती
उडीचा पवित्रा केला मागील पाय आखडूनी
निसर्गाचा चमत्कार हा पहा या छायाचित्रात
काडी मोडोनी वृ्क्षाची रुप बदलले सरड्यात

काव्यरस
निळा प्रवासी
अजाण पक्षी सुजाण वारा
उन्मुक्तावर स्वच्छन्द पहारा
चुकवून अव्यक्तांच्या नजरा
उनाड पाऊस, अवखळ गारा
काळ्या डोही कातळपाणी
हिरवे असुनी रान अधाशी
वेशीवरती उभा थबकुनी
अवकाशीचा निळा प्रवासी
गंध मातीचा, धरा बहरली
पानोपानी ओजही सजले
डोळ्यांत कुणाच्या नीर निळे
हिरव्या तेजाने डोळे निवले
ये रे, ये रे ... अनंत याचना
जलदांचे अवगुंठन सरले
कोसळू लागल्या रेशिमधारा
धरतीचे मग मी पण सुटले !
© विशाल विजय कुलकर्णी
काव्यरस
गूढ भाग ५ (शेवटचा)
तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर मी उरलेली संपूर्ण कथा या भागात टाकते आहे.
गूढ भाग १: http://www.misalpav.com/node/40024
गूढ भाग २: http://www.misalpav.com/node/40034
गूढ भाग ३: http://www.misalpav.com/node/40049
गूढ भाग ४: http://www.misalpav.com/node/40056
भाग ५
चंद्रभान म्हादुच्या घराच्या दिशेने चालतच निघाला. गाडी त्याने देवळाजवळच ठेवली. गाव इतके लहान होते की तिथे रस्ते देखील नव्हते.
हिंदी सिनेमा वाल्यांचे आवडते वाद्य कोणते?
डिस्क्लेमर :
१. खालील लेखातील मते ही माझ्या हिंदी सिमातील तुटपुंज्या ज्ञावर आधारीत आहेत.हा वैचारीक लेख नसल्याने (तसे आमचे कुठलेही लेख जास्त विचार करण्यासारखे नसतात, हा भाग वेगळा) खूप विचार करणार्या व्यक्तींनी ह्या लेखाकडे कानाडोळा केलात तरी चालेल.
२. दुसरी गोष्ट म्हणजे मला वाद्यांमधले अजिबात काही समजत नाही.
पिपाण्या : म्हनजे फुंकायची वाद्ये ह्यात बासरी पासून सनई पर्यंत सगळी वाद्ये.
खाजवायची वाद्ये : सतार, तंबोरा. व्हायोलिन.
बडवायची वाद्ये : तबला-डग्गा, ढोल, नगारा इत्यादी.
सांजाव
आज 'सांजाव' चा उत्सव गोव्यात साजरा होतोय. एक वेगळाच खास गोवन ख्रिस्ती उत्सव. 'सेंट जॉन' चा अपभ्रंश सांजाव. घरोघर सांजाव सांजाव ओरडत पैसे/दारू मागायची, डोक्यावर पावसाळी वनस्पतींचे मुकुट घालून माडाचे 'पिराडे' (झावळीला माडाशी जोडणारा भाग) ठोकत फिरायचं, आणि शेवटी विहिरीत, तळ्यात नाहीतर चिखलात उड्या घेऊन मनसोक्त भिजून/बरबटून. घ्यायचं. असा हा पावसाळी उत्सव.
आमच्या घरी एकदाच एक माणूस सांजाव ओरडत आला होता. खास गोवन काळी तुकतुकीत त्वचा, डोक्यावर चक्क काटेरी शतावरी गुंडाळलेली, असं ते ध्यान आलं. मुळात तर्र होऊन आला होता.
कथुकल्या १३
१. गोष्ट
“पप्पा सांगा न लवकर गोष्ट.”
“ कुठली सांगू बरं… न्यूट्रोफायटा आणि लेडी अॅस्ट्रोनटची ?”
“नको ती बोअर आहे.”
“मग गुरुवरच्या चेटकीणीची ?”
“ती सांगितलीये तुम्ही चारपाच वेळा.”
“बोलकी निळी झाडं, जादुई रोबो, टेट्रोग्लॅमसचं सोनेरी अंडं ?”
“सगळ्या सांगितल्यात ओ पप्पा. एखादी नवीन सांगा न.”
नेफीसने थोडावेळ डोकं खाजवलं.
“ठिकेय एक नवीन गोष्ट सांगतो. पृथ्वीवरच्या माणसांची.”
“चालेल.”
शेनॉय गोष्ट ऐकायला सावरून बसला.
“खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ðζ सूर्यमालेत पृथ्वी नावाचा एक ग्रह होता.
'हमेशा तुमको चहा'
'हमेशा तुमको चहा'
रविवार दुपार. जेवण करून वामकुक्षी साठी आदर्श वेळ. अचानक आपल्या पत्रिकेतील ग्रह फिरतात आणि ओळखीच्या कोणाचं तरी पुढच्या आठवड्यात 'कार्य निघतं'. 'आहेर म्हणून आपण पाकिटात पैसे घालून देऊ' असं ओठांवर आलेलं वाक्य पूर्वानुभवामुळे गिळावं लागतं. "फक्त मित्रांबरोबर बाहेर हिंडायला आवडतं, देण्याघेण्याचे व्यवहार अजिबात कळत नाहीत" वगैरे वाक्यं आपलीच वाट बघत असतात. लक्ष्मी रोड वर दुपारी (त्यातल्या त्यात) गर्दी कमी म्हणून दुपारी २ ला आपण अर्धांगिनी बरोबर 'आहेर म्हणून बाहेर' पडतो.
पहिल्या २-३ दुकानात काहीच पसंत पडत नाही.
...असे आजोबा!
काल उघडले कपाट तेव्हा
पुन्हा भेटले मला आजोबा |
असण्याहूनही नसण्यामध्ये
नवे वाटले मला आजोबा ||१||
शुभ्र साजि-या वस्त्रांमधूनी
होते लपले असे आजोबा |
इंचघडीतून अलगद ज्यांनी
आम्हा जपले असे आजोबा ||२||
पुस्तकातल्या श्लोकांमधला
सुस्पष्ट असा तो ध्वनी आजोबा |
पत्ररुपाने अक्षर होऊन
अन् भिडणारे मनी आजोबा ||३||
कधी हास्याची झुळूक आणि
कधी गोष्टींची लाट आजोबा |
आकार आम्हाला देताना
शिस्तीचा परिपाठ आजोबा ||४||
कधी दुपारी बहरुन यावा
तो संवादिनीचा सूर आजोबा |
पण सायंकाळी सात वाजता
चिंतेचे काहूर आजोबा ||५||
कपाट केले बंद तरीही
आठवणींचे ठसे आजोबा |
विचार करता काव्य स्फुरावे
होते आमचे असे आजोबा ||६||
जपून
काव्यरस
अनवट किल्ले १२ : स्वराज्याची कोयरी, रांगणा उर्फ प्रसिध्दगड ( Rangana, Prasidhhgad)
कोल्हापुर जिल्ह्यातून अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरतात, पैकी एतिहासिक हणमंत्या घाटावर नजर ठेवून आहे, एक प्रचंड पसरलेला कुंकवाच्या कोयरीच्या आकाराचा एक किल्ला, "रांगणा". जणु स्वराज्याच्या कुंकवाचा हा रक्षकच. तळ कोकण, अर्थात सध्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन रक्षक आहेत. सिंधुसागराची सीमा सांभाळायचे काम शिवाजी महाराजांची निर्मिती असलेला सिंधुदुर्ग ईमाने ईतबारे करतो आहे तर सह्याद्रीच्या मुख्य रांगेत खडा होउन रांगणा कणकवलीपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत नजर ठेवून आहे. ई.स.
मिसळपाव