Skip to main content

तळ्याकाठी

लेखक aanandinee यांनी सोमवार, 03/07/2017 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
तळ्याकाठी “तू तर नेहेमी त्याचीच बाजू घेणार. तुला सांगण्याचाही काय उपयोग ! तरी तुला बजावतोय मी, माझ्या करीअरमधे तो ढवळाढवळ करतो तेवढी पुरे, पण आता माझ्या पर्सनल लाईफमध्ये जर त्याने नाक खुपसलं तर मोठा भाऊबिऊ सगळं मी विसरून जाईन.” त्याने आईला निक्षून सांगितलं. “अरे पण चिंटू,” आई समजावणीच्या स्वरात सांगू लागली. “चिंटू म्हणू नको मला, हजारदा सांगितलाय, राजस म्हण. ओजसला कसं बरोबर ओजस म्हणतेस. मी काय आयुष्यभर चिंटूच रहायचं का?” राजसने चवताळून विचारलं. “बरं, बरं, चुकलंच माझं! पण राजस, दादा नव्हता गेला त्यांच्याकडे. तुझ्या मैत्रिणीचे वडीलच येऊन बोलले त्याच्याशी, तुझ्याबद्दल.

किस्से गोवा ट्रिपचे- भाग १

लेखक पी. के. यांनी सोमवार, 03/07/2017 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजचे दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील असा सुवर्ण काळ असतो कि कितीही काळ निगुन गेला तरी एकादी पुसटशी आठवण देखील आपल्या चेहेरयावर स्मित आणते. आज इतक्या वर्षा नंतर देखील कॉलेज च्या दिवसात मित्रानं बरोबर घालवलेला क्षण अन क्षण जसाच्या तसा आठवतोय आणी आठवतंय ती गोव्याला केलेली भन्नाट ट्रिप. तर प्लॅन असा होता कि कुणीही घरी गोव्याला जातोय म्हणून सांगायचे नाही (कारण परवानगी मिळालीच नसती) त्या ऐवजी दोन दिवस भैरवगडला ट्रेकिंगला जातोय म्हणून परवानगी घ्यायची. आम्या, पप्प्या, नाना, दिप्या, मह्या, पी. जे. आन्या आणि मी ( पी.के.) आशा आठ जणांना आपापल्या घरून ट्रेकिंगला जायची परवानगी मिळाली.

पीएमटी आणि तुकाराम मुंढे साहेब

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 03/07/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
बी जे मेडिकल कॉलेजला प्रोफेसर होता तेव्हापासून आम्ही श्रीकरला पाहतो आहोत. त्याच्या त्या लाल एम ५० वरून तो येजा करीत असे. पुढे तो आयएएस झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तो आयुक्त होता तेव्हा नियमावर बोट ठेऊन काम करणारा अधिकारी म्हणून त्याची महाराष्ट्रभर ख्याती होती. नियमाबाहेर जाऊन कोणी काम करत असेल तर त्यावर श्रीकरची कारवाई ठरलेली. यामुळे त्यांना निनावी पत्रे आणि धमक्या यायला सुरुवात झाली.

II बळीराज किंकर अख्नंडीत माझे II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी सोमवार, 03/07/2017 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
छन्दीष्ट्य वातावरणी जर्जर धारा हि सारी जरब कायम असे दिनकराची दुर्भिक्ष्य ते जान्हवीचे पाणी II यति नग सारे काष्ठ मांडी हाट सारा त्रागा मरुत वाही रिक्त अंबार सारे II कंगाळ बळीराज करी मख घेउनि नांगर हाती अर्ध्वयु अवतरती स्वअभ्युदयासि II अक्षर आरोहण अर्ध्वयु ते साधे अनृत अनुज मानुनी बलीराजासी उध्रुत उधम इंद्रजाल सारे बळीराज किंकर अख्नंडीत माझे II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

भेटी लागी जीवा . .

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 03/07/2017 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
परब्रम्ह उभे ठाकले समोर साक्षात कैसे मी मग सावरावे आता देहभान दाटलेला कंठ,डोळा पाणी आर्त हरपली केव्हाच अवघी भूक तहान मागणे भौतिक सुखे हे मूर्खलक्षण अशाश्वत गोष्टींचे काय करु कळेना तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन तरीही का तुझा परीसस्पर्श होईना सद्य परिस्थिती देवा तुझिया समोरी काय तुला मी वेगळे असे आळवावे दाता आहेस तू, एवढेच द्यावे मला तुझ्या चरणाची मी फक्त धूळ व्हावे !

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ३

लेखक जुइ यांनी सोमवार, 03/07/2017 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ४ ओल्ड पोस्ट ऑफिस पाहून झाल्यावर वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेनं चालू लागलो. खरेतर युनियन मेट्रो स्टेशनच्या समोरून सुटणार्‍या बसेस नॅशनल मॉलचा भाग फिरवून आणतात. इथेच सर्व मॉन्युमेंट्स आहेत. तसेच हॉप ऑन हॉप ऑफ टूर्सचा लाभ घेतला जाऊ शकतो. आम्ही मात्र ऐनवेळेवर काहीतरी घोळ घालून या सुविधा वापरल्या नाही आणि खूप पायपीट केली :-( .

रावेरखेडी २

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 03/07/2017 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
इंदौर बायपास ला एका छोट्या हाँटेलवर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. तिथे चहा , कचोरी व पोहे घेतले. व पुढे निघालो. इंदौर शहरात प्रवेश न करता बाय पास हुन गाडी डावीकडे ओंकारेश्वर रस्त्याला वळली. हा रस्ता पूर्ण ओमकारेश्वर पर्यंत व्यवस्थित आहे. इंदौर हुन ओमकारेश्वर चे अंतर ८० की.मी. पुढे १० की.मी जाताच टोलनाका लागला. त्या ठिकाणी २० रु. टोल देऊन पुढे निघालो. पुढे सीमरोल जवळ रस्त्याच्या कडेला भलीमोठी पाईपलाईन दिसली. तीच्यावर नर्मदा~क्षिप्रा योजना असे लिहीले होते. व बाजूलाच म. प्र.

धावणाऱ्यांची मुंबई

लेखक आशुतोष-म्हैसेकर यांनी सोमवार, 03/07/2017 00:46 या दिवशी प्रकाशित केले.

धावणाऱ्यांची मुंबई

मुंबई, तसं ह्या विषयावर नेहमीच लिहिलं जातं, विविधांगी आणि विविध पद्धतीने मुंबई बद्दलची माहिती रोजच कुठून येतच असते त्यात मी त्या विषयावर चार ओळी लिहिणं म्हणजे समुद्रात खडेमिठाचे तुकडे फेकून मीच तो खारट केला म्हणण्यासारखं आहे. अनेकांसाठी चाऊन चोथा असला तरी माझ्यासाठी हा नाविन्याचा विषय,सगळ्यांच्या मनात असेल तसं स्वप्नांचं शहर मुंबई माझ्यासाठी सुद्धा. लहानपणापासून औरंगाबाद सारख्या ठिकाणी राहून मुंबई बद्दल फक्त ऐकून होतो, इथे मोठमोठ्या इमारती असतात.

अन् फुलांचे देह ओले पेटवावे तू!

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 03/07/2017 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
बागडावे वाटले की बागडावे तू... मी फुलांना पाहिले की आठवावे तू! मी पिसे पिंजून माझी बांधले घरटे पाखरा,अलवार या घरट्यात यावे तू!