मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टवाळी

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
 टवाळी -- राजीव उपाध्ये (पूर्वप्रसिद्धी - फेसबुक) १९९३-९४ च्या सुमारास भटकरांनी माझे रखडवलेले प्रमोशन करायचेच असा विडा एका सहकारी-हितचिंतकाने उचलला. माझी बढती रखडवण्याची जी कारणे होती त्यातले एक ठळक कारण म्हणजे भटकरांनी पाळलेले एक मांजर मी त्याच्या हाताखाली पी०एच०डी० करावी म्हणून माझ्या मागे हात धुवून लागले होते.

ऑपरेशन अबॉर्शन

सोत्रि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दहा-अकरा वर्षांपूर्वी ऑफिसच्या कामानिमित्त माझी आमच्या मलेशियातील ऑफिसमध्ये इंटर्नल ट्रान्स्फर झाली. त्या वेळी मलेशियाला ट्रान्स्फर घेण्यामागची अनेक कारणं होती; त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मलेशियातलं अफाट फूड वैविध्य. लोकल मलेशियन, चायनीज, थाय, व्हिएटनामी, फिलिपिन्ससारख्या साऊथ-ईस्ट एशियन देशांच्या नानाविध रुचकर डिशेस, शिवाय इतरही अनेक युरोपियन, मिडल-इस्टर्न देशांच्या खाद्यसंस्कृती, कौलालंपुर ह्या मलेशियाच्या राजधानीतल्या प्रत्येक कोपऱ्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये सहज उपलब्ध आहेत. मलेशियात आलो तेव्हा तब्येतीने मी किंचितसा स्थूल होतो.

मी कोण? - एक प्रयोग

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
 मी कोण? - एक प्रयोग ============ -राजीव उपाध्ये मला ए०आय० बरोबर वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे, हे आता जगजाहिर आहे. विचारमंथनाबरोबर वेगवेगळ्या शक्यता/बाजूंचा अंदाज घेण्यासाठी ए०आय०चा उपयोग होऊ शकतो. मला हा उपयोग अ त्यंत महत्त्वाचा वाटतो. आता कुणाला या जिलब्या वाटतील तर कुणाला पिपाणी वाटेल, पण ज्यांना कल्पकतेचं अप्रुप वाटते त्यांना हा प्रयोग आवडेल. म्हणूनच करून बघावा. इथे मि०पा०वर डावे-उजवे इ० लेबले लावण्यचा उद्योग जोरात चालतो. त्यात धर्म मला मुक्तीच्या मार्गातला अडसर वाटतो!

क्लीन बोल्ड

बाजीगर ·
लेखनविषय:
क्लीन बोल्ड महाराष्ट्र क्रिकेट संघटना, सर्वोच्च कोर्टात ली घटना || MCA निवडणूक प्रकरण, सदस्यवाढ हे कारण || सरन्यायाधीश संतापले, MCA प्रमुख असावा माजी खेळाडू, इथे घराणेशाही नका काढू. MCA चे सदस्य १६४, काकांच्या नातू नं , गुपचुप पक्ष धार्जिणे ४०० सदस्य वाढविले आतून || ही कृती बेकायदेशीर, मी डीसमिस करू का, का करताय उशीर?? जर सदस्यसंख्या वाढवायची, तर माजी खेळाडूंसाठी राखीव काढवायची || ज्यांना धरता येत नाही बॅट , त्यांची का सदस्य म्हणून करतात बात?! न्यायाधीशांचा यॉर्कर होता अफलातून, क्लीन बोल्ड झाले काका,नातू मनातून || काकांचा चाललाय बॅड पॅच , सारखे विरोधक घेतायत कॅच ||

गोल्डमेडल

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
 "गोल्डमेडल" ======================== - राजीव उपाध्ये (पूर्वप्रसिद्धी ऑक्टोबर २०१३) ही गोष्ट आहे मी कॉलेजात असतानाची... तेव्हा शुद्ध गणितात चमकणार्‍या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांबद्दल माझ्या मनात एक असूया निर्माण झाली होती. या माझ्या मनातल्या असूयेने मी त्यावेळेला गणितात गोडी वाढविण्यासाठी काहीसे दिशाहीन प्रयत्न करत होतो. ते बघुन माझा एक मित्र मला म्हणाला, "तुला प्युअर मॅथ्समध्ये interest असेल तर माझ्या बरोबर प्रा. श्रीराम अभ्यंकरांकडे चल.

वि 'लीन' करण

बाजीगर ·
लेखनविषय:
एप्रिल मध्ये काकांची, संपतीय मुदत, मग बदलावीच, लागणार आदत || राज्यसभेत नाही प्रवेश, म्हणून हा नाट्यप्रवेश || नुसती भावनिक पाजा वाईन, पाळीव पत्रकार देती हेडलाइन || अपुरी संख्याबळे मग बोला बळेबळे || देऊन आवळा (१० आमदार) पाहिजे कोहळा (४१ आमदार) || प्रत्येक चाली ला, काटशह देऊन, नानांनी केलंय दीन-लीनकरण || लोक राहिले नाहीत पूर्वीसारखे अडाणी, आता काय उपयोग भेटायला येऊन अदानी || रीटायर चा ढोंगीपणा, वर्षापूर्वी नसता केला, ६० वर्षाचा सन्मान असहाय्य नसता गेला ||

ब्रेक के बाद..

आजी ·
लेखनप्रकार
ब्रेक या विषयावर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. ब्रेक म्हणजे सिरीयल मधले ब्रेक बरं का! मध्ये मध्ये गॅप असते ना ती! या गॅपमध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मालिका दहा मिनिटे असते आणि ब्रेक वीस मिनिटांचा असतो. या ब्रेक मध्ये खूप गोष्टी काही काही जण करून घेतात. म्हणजे नॅचरल कॉल्स उरकून घेणे ,गाद्या घालणे , झोपण्यापूर्वी दात घासणे. माझ्या सासूबाई तर म्हणायच्या", मी पटकन देवाचं म्हणून घेते. आणि देवापुढे दिवा लावायच्या .दोन स्तोत्रंही त्या म्हणायच्या. तरीही ब्रेक सुरूच असायचा. जेवणाचे ताट घेऊन खूप जण ब्रेकच्या वेळात जेवायला बसतात.

धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.” तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.” ऋषीने मधमाश्यांच्या पोळ्याचं मध मागितलं. धूम्राक्षने धूर निर्माण केला, मधमाश्या निघून गेल्या. ऋषीला खोकला आला, पण मधुर मध चाखायला मिळाला.

अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"

गणेशा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जवळजवळ आता एक आठवडा होत आला आहे दादा गेल्यानंतर. एका राजकारणी माणसाचा अंत मनाला इतका चटका लावून जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं. त्या दिवशी सकाळी मी जिममध्ये होतो. तेवढ्यात आमच्या दादाचा फोन आला— “तुमचे अजित दादा गेले.” पहिल्यांदा मला काहीच कळलं नाही. “दादा गेले म्हणजे कुठं गेले?” असा उलट प्रश्न मी विचारला. दादांच्या विमानाला अपघात झाला हे ऐकल्यावर मात्र मन सुन्न झालं. लगेच मोबाईल पाहिला. यात दादा नसावेत, किंवा यातून ते वाचले असावेत, अशी एखादी बातमी पुढे यावी असं मनोमन वाटत राहिलं; पण नियतीचा फास उलटाच पडला होता. घरी गेल्यावरही कशातच मन लागलं नाही.