नंदादीप
नंदादीप..!!
सकाळपासून माझी गडबड सुरू होती. आठवेल तशी पूजेची तयारी, हार, माळ, एकेक नेऊन एकत्र ठेवत होते. खरतर देवीची कापसाची वस्त्रं करणं, भिजवलेल्या फुलवाती बघणं, पितळेची मोठी समई उजळून ठेवणं, असं काही ना काहीतरी गेल्या आठवड्यापासून उत्साहानं चालू होतंच. काही मनात आलं, आणि सासूबाईंना विचारायला गेले, की त्या म्हणत,.. गेली पंधरा वर्ष करतेस ना.. काळजी करू नकोस, देवी करून घेईल सगळं...!!
यांचा डबा भरून तयार होता. ते ऑफिसला गेले, की लगेच अंघोळीला जायचं, असा विचार मी करत असताना, बेल वाजली. दार उघडलं तर शेजारची प्रिया रडत उभी...!! आत ये. बस इथे. काय झालं ते सांग.. मी म्हणाले.
भाजे लेणी
सकाळी उठून दोन्ही मुली ऑफिसला जाण्याच्या आधी डबे तयार केले. शिल्लक राहिलेली भाजी पोळी बांधून घेतली. मोठीला रेल्वे स्टेशनला सोडले. आता दिवसभर विशेष असे काही काम नव्हते. नवऱ्यानेही सुटी घेतली होती.
कुठेतरी फिरायला जायचे मनात होते. गाडी लोणावळ्याच्या दिशेने वळवली. वाटेत वरद विनायकाचे दर्शन घेऊया असे वाटल्याने महडला गाडी थांबवली. अजिबात गर्दी नव्हती. पटकन दर्शन झाले.दहा-पंधरा मिनिट सभामंडपात बसलो. मन अतिशय प्रसन्न झाले.
तुझ्यासवे रूजताना...
तू पाणी द्यावंस अशी माझी अपेक्षा नव्हतीच कधी..
बाहेर फोफावून वाढणाऱ्या मला तू तुझ्या बागेत रूजवलंस तरी
आभाळातून पाणी येतं आणि त्यावर वाढत राहणं हेच माझ्या जगात मला ठाऊक होतं त्या आधीहि लाखो वर्ष..
पण तू....
माझं एखादं पान जरी वाळलं तरी कोमेजतेस
येता जाता पाहत असतेस मला काही होतंय का
उन्हं उतरतात त्या खिडकीतून माझ्याकडे बघत राहतेस
माझ्या अंगावर फुलणारी फुलं तुझ्या नजरेत हसू फुलवतात
माझ्या पानांवरुन हात फिरवत राहतेस
मला जणू वाटतं कोणीतरी बोलतंय माझ्याशी
खूप काही सांगावं वाटतं
पण नाही सांगू शकत मी
मी न्याहाळत राहतो तुला
इतकी कशी तू वेडी...
कुर्डुगड उर्फ विश्रामगड
रायगडाच्या घेर्यात" या मालिकेतील हा शेवटचा धागा.
(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ
शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा
खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा
सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध
धुंद संगीताचा मंद आवाज
"गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी"
बोला आणखी काय हवं?
काव्यरस
खुसखुशीत कोंबडी
आजचे जेवण
- दक्षिण अमेरिकन/ टेक्सास पद्धतीची खुसखुशीत कोंबडी
चांगले आंबट ताक , काली मिरी, मीठ यात थोडा मैदा + थोडे मक्याचे पीठ कालवावे आवरणासाठी पाहिजे असल्यास लसूण
- कोंबडी चे तुकडे ( त्वचेसकट) वरील आवरणात घोळवून घावी
- ओव्हन १८० अंश सेल्सियस ला तापवून चांगले खुसखुशीत होई पर्यंत हे तुकडे भाजून घयावे
- सोबतीला , पालक, रॉकेट अशी थोडी तुरट सलाड त्यात ग्रीक किंवा फ्रेंच ड्रेससिंग ( किंवा नुसते पांढरे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस + मीठ + ऑलिव्ह तेल )
- वरती सार क्रीम ( आंबटसर लोणी )
आणि भारतीय वळण म्हणून त्याबरोबर आज कोमट अशी मस्त सोलकढी ...
पाऊस...
आज अचानक आलास आणि
सगळं काही चिंब करुन टाकलंस
तु येशील याचा अंदाज होता खरंतर
पण तरीही अवचितच आलास
खिडकीच्या काचेतून पलीकडे बघत होते मी
तुला कोसळताना
आणि माझ्या लक्षात आलं
की मी तर फक्त पाहतेय
मी दुसरीकडे बघितलं तेव्हा
मला तो दिसला पावसात भिजताना
त्याला बघून माझ्याच डोळ्यात पाणी आल्याचं जाणवलं
कडा ओलावल्या आणि मन पुन्हा आठवणींपाशी गेलं
न भिजूनसुद्धा भिजवून टाकलंस तू
ते म्हणतात ना
बुंदे कुछ यूह गिरी की
कुछ खयाल भिग गये
पावसात भिजणारा तो आता दिसत नाहीये खाली मला
आणि मी मगाशी लावलेले पडदे बाजूला सारले
वीज चमकली आणि क्षणभर का होईना
पण प्रकाशुन गेलं सारं
YouTube वर स्वानंद किरकिरेंचं बावरा मन ला
काव्यरस
‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ च्या निमित्ताने
- डॉ. सुधीर रा. देवरे
(पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशनाकडून 25 सप्टेंबर 2020 रोजी ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्या निमित्ताने हा लेख):
‘ज्यांच्या चेहर्यासमोर प्रतिक्रिया मागणारे कॅमेरे नसतात!’ अशा ‘जगातील भल्या बुर्या घटनांची नोंद घेणार्या सर्व सहृदय माणसांना...’ हा ग्रंथ (‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’) अर्पण केला आहे. सर्वसामान्य माणसाच्या वेदना वेशीवर टांगून त्यांना न्याय मिळावा म्हणून 2012 साली ब्लॉग लिखाणाला सुरुवात केली. (आणि म्हणूनच या ग्रंथाचीही आज निर्मिती झाली.) ब्लॉगमधून लिखाण करताना साहित्यिकापेक्षा सामाजिक होण्यात जास्त आनंद मिळतो!
आणखी काय हवं?
मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ
वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने
कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा
पावसाचे पाणी व मातीचा सुगंध
बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज
गरम चहा बरोबर आवडते पुस्तक
बोला आणखी काय हवं?
मिसळपाव