Skip to main content

हॉट & सॉर सुप

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 15/01/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
इंडो चायनीजच्या पुढच्या भागात सर्वांच स्वागत. आपण बाहेर गेलो की मुख्य जेवणा आधी स्टार्टर म्हणुन सुप मागवतो. पण खर तर सुप म्हटल की ते एक संपुर्ण (complete food) अन्न आहे.

गल्ला

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 15/01/2010 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदयात्रींचा लहानपणावरचा लेख वाचला, आठवण आली गल्ल्याची. लहानपणी गल्ला हा प्रकार फार म्हणजे अगदी जिवाहून प्रिय. आजकालची पोरं याला पिगीबँक पण म्हणतात ब्बॉ. पहिला गल्ला बाबांनी घेउन दिला होता बालवाडीत छोट्या गटात असताना. मातीचा होता. कधी मधी मनात आलं तर आजी(बाबांची आई) आणी आजोबा (आईचे काका) चाराणे -आठाणे-बंदा देत. जास्त मागे लागलो तर आई एका धपाट्यासोबत दोन रुपयाची नोट देई. एक रुपयाची नोट एवढी आवडायची नाही. त्याचा बंदा आवडायचा.

सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 15/01/2010 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता? सुर्यग्रहण नुसत्या उघड्या डोळ्यांनी पाहू नये.

थरथरत्या ज्योतीला अंधाराचा भार

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 14/01/2010 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
थरथरत्या ज्योतीला अंधाराचा भार कवटाळल्या उजेडाला हाताचा आधार | थेम्ब थेम्ब ओघळून सारे मोती गेले वेदनेच्या सहवासाला सुख भुलले हाताचाच माझिया माझ्यावर वार थरथरत्या ज्योतीला अंधाराचा भार | किती क्षण सुने गेले किती फुलले अंतरात ओले कधी दंव भिजले प्रेमाचा तो क्षण नेई आयुष्याच्या पार थरथरत्या ज्योतीला अंधाराचा भार | -- सागर लहरी ०७-१-२०१०

मराठी ब्लॉगर्सचा रविवारी पुण्यात स्नेहमेळावा

लेखक कशिद यांनी गुरुवार, 14/01/2010 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी ब्लॉगर्सचा रविवारी पुण्यात स्नेहमेळावा सकाळ वृत्तसेवा Thursday, January 14, 2010 AT 08:54 PM (IST) Tags: blog, marathi, bloggers मराठीत नियमित लिहिणाऱया ब्लॉगर्सचा अनौपचारिक स्नेहमेळावा येत्या रविवारी (ता. १७ जानेवारी) पुण्यात होणार आहे. संध्याकाळी चार वाजता सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात हा मेळावा होईल. एकमेकांचा परिचय करून घेणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. मराठी ब्लॉगर्सनी एकत्रितपणे काही कार्यक्रम घेण्यासंदर्भातील रुपरेषाही मेळाव्यात ठरविता येणार आहे. आपापल्या ब्लॉग्ज् ची माहिती आणि इतर बाबींवरही मेळाव्यात चर्चा होईल.

[उन घे]

लेखक अमृतांजन यांनी गुरुवार, 14/01/2010 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
त्या तरल भावना, नाहीच आम्ही कधी पाहिल्या ज्या लिहिल्या आम्ही, विडंबितच डायरेक्ट झाल्या- ह्या तरल कवितेला मुजरा व हे त्याचे रुप- ती- शिजली कोबी सारी, पाणी ते टाकून दे जीवघेणा दर्प सारा, बंद नाक करुन घे... जेव नाही तर मुस्काडीत मारीन तुझिया घरचे खावे, तूच बोले, मुकाट्याने खाऊन घे.. उसळ नको तर हवे काय रे तुला गिळायला स्वैपाकाला आईला, तुझ्या बोलावून घे.. नेहमीचंच झालंय हे तुझे मी तरी काय करु? रात्रीचे शिळे न्याहरीला, खायची तयारी करुन घे.. तो- हात जोडूनी म्हणतो, असले हे बोलणे नको तुझे ते खाणारा नवरा नवा करुन घे.. तुझा तो तोरा, रोज ती, लाखोली मला क
काव्यरस

क- कवितेचा

लेखक बाबुराव यांनी गुरुवार, 14/01/2010 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमी येतो मिसळपाववर आन, चाळा म्हणून क्लिक करतो, लेख,कविता, आन पाककृतीवर. आवडलेल्या वळींवर फिरत राहतो कितीतरी येळ, आलटून-पालटून शांतपणे. आन बांधाबांध करतो मनातल्या प्रतिसादाची. असह्य कोंडमारा होऊन टाकता आला नाय प्रतिसाद तर, लॉगऑफ करुन, पाहत बसतो मॉनिटर कितीतरीवेळ अस्वस्थपणे.

(छंद दे)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 14/01/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूची सुरेख कविता 'छंद दे' वाचली आणि आमची संक्रांत आलीच!
काव्यरस

"Who killed Karkare?" by former IG, Maharashtra, S M Mushrif

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 14/01/2010 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा सभासदांनो, मी जेंव्हा "To the last bullet" या पुस्लिहिलेदोन लेख लिहिले तेंव्हा एका सभासदाने "Who killed Karakare या पुस्तकावरही लिहिणार का?" असा प्रश्न मला केला होता. मी कालच तेही पुस्तक मागवले, पण अनुक्रमणिका वाचल्यावर (खाली पहा) माझे असे मत झाले कीं हे पुस्तक हेमंत करकरे यांच्या हौतात्म्याबद्दल फारसे सांगत नाहीय् व इतर गोष्टींची चर्चाच जास्त आहे. या गोष्टीही वाचायला हव्यातच व म्हणून हे पुस्तक वाचणारही आहे, पण वाचण्याची priority कमी झाली. इतर कुणी हे पुस्तक वाचले आहे कां?