आजोबा आज्जी .. मावश्या तीन !!

आनंदयात्री's picture
Login or registerto access quick links.

हरवलेलं सुख शोधता शोधता मी एकदा अवचित एका जुन्या लाकडी दारावर येउन थांबलो. त्या दाराची भिंत स्वच्छ चुन्याने रंगवलेली होती, दाराच्या उजवीकडे डावीकडे गेरुच्या रंगाने भालदार चोपदार काढलेले होते, दारावर एक छोटासा कोनाडा होता, आणी त्यात एक सुंदर, टप्पोर्‍या डोळ्यांची बाल गणेशाची मुर्ती होती. आजोबा पहाटे पहाटे देवपुजा झाली की या गणपती पुढेही जास्वंदाचे फुल ठेवत. दाराकडे चेहरा केला तर उजव्या बाजुला एक दगडी सोपा बांधलेला होता. दारामधे आणी सोप्यामधे एक खिडकी होती, सोप्यावरुन त्या खिडकीत सहज चढता येई. खिडकीत चढुन गणपतीसमोर ठेवलेला प्रसाद उचलतांना कित्येक वेळा घसरुन पडायचो मी. अन मग रडायला लागलो की मावश्या बदाफळ म्हणुन चिडवायच्या. त्या गणेशाच्याही वर सुंदर वेलबुट्टीने मढवलेले गेरुनेच लिहलेले नाव होते 'परिमल'.

घर जुने होते, मातीचे होते. आत शिरले की उबदार वाटायचे. समोरच्या खोलीत माझे आवडते पुस्तकांचे कपाट होते. आजोबा शाळेचे मुख्याध्यापक होते, त्यांना वाचनाची आवड होती. त्या कपाटातच एक जाडजुड लाकडी रुळ होता, त्याला मात्र मी जाम घाबरत असे. मला त्यांनी कधी तो दाखवला नव्हता पण मावश्या त्याला ज्या पद्धतीने घाबरत ते पाहुन मी पण त्याला घाबरत असे. सकाळी देवपुजा झाली की आजोबा मला पाढे लिहायला बसवत, "सुट्ट्यात कसले हो पाढे ? " असे म्हटले की कधी कधी आज्जीच्या अपरोक्ष मला हळुच सुटही देत.

त्या माझ्या आजोळच्या घराच्या मागे अंगण होते. तिथे मी त्या वयात पाहिलेला सगळ्यात मोठा हौद होता. तो हौद धुवायचाही कधे मधे कार्यक्रम असे. हौदाच्या खालचे आउटलेट मोकळे करुन आजोबा सगळे पाणी सोडुन देत, मोठ्ठी धार सुटे. मला त्या वेगवान धारेशी खेळायला मौज वाटे. हौद अर्धा अधिक मोकळा झाला की आजोबा मला त्यात सोडत. त्या क्षणाची वाट मी त्या काळी अगदी प्राण कंठाशी आणुन करे. त्या पाण्यात खेळुन झाले की मग मात्र मला काम करायचे असे, आजोबा पुन्हा उरलेले पाणी सोडुन देत आणी मग मी सगळा हौद साफ करायचा असे. हौदाच्या तळाशी मउ मउ स्वच्छ वाळु सापडे. ती सगळी वाळु मी जमा करुन आज्जीकडे देत असे, घुडघा शेकायला आज्जी ती वाळु वापरे.

त्या मागच्या अंगणात हौदासमोर वेगवेगळी झाडे लावलेली होती, त्यांच्याबुंध्यापाशी नीटस आळी केलेली असत. त्या आळ्यातल्या मातीशी खेळणे, तिथे हरबरा, तीळ वैगेरे पेरणे हा माझ्या अत्यंत आवडता उद्योग होता. मी त्या आळ्यांना माझी शेती म्हणत असे. मी सकाळी उठल्या उठल्या आधी माझी शेती बघायला जाई. एकेदिवशी खरेच अगदी इवलुस्से पाते उगवुन आले होते, मला तर आभाळच ठेंगणे राहिले होते. आजोबांना माझ्या घरी पाठवुन आईला बोलावुन आणले होते. दिवसभर त्या पात्याशेजारी बसुन राहिलो होतो. त्याचा कोवळा पोपटी रंग नंतर मी कितीतरी चित्रात वापरायचो असे आई सांगते (मला काही तशी एक्झ्याक्ट शेट कालवता यायची नाही, मग आईच तसा रंग बनवुन द्यायची). दुपारभर माझे असेच काहीतरी त्या झाडांजवळ उद्योग चालायचे. मग नंतर मी ४ वाजायची वाट पहात राही. कारण ४ वाजेपर्यंत माझ्या तीनही मावश्या घरी आलेल्या असत. मग काय लाडोबाची मजा असायची. खुप हट्ट केला तर दुधाएवजी कधीतरी चहाही चाखायला मिळे (गंधाच्या वाटीत). क्रिमचे बिस्किट म्हणजे पर्वणी.

अंगणाच्या शेवटी छतावर जायला जिना होता, त्याच्या पायर्‍या उंच उंच असल्याने मला चढता येत नसत. मग मी, आजोबा आज्जी आणी मावश्या तीन वर छतावर जात असु. वर गेल्या गेल्या मी आज्जीच्या कडेवरुन सुटका करुन घेण्यासाठी धडपडत असे. कारण बाजुचे मोठ्ठे लिंबाचे झाड आणी त्याच्या फांद्या अगदी माझ्या उंचीला आलेल्या दिसत. गच्चीवर लिंबाचा पाला पाचोळा असे, त्यावरुन धावतांना वाळलेली पाने पायानी चुरतांना मोठी मौज येई. माझी मजा संपते न संपते तोच मावशी खराटा घेउन गच्ची झाडायला लागे. एक मावशी बादलीभर पाणी आणुन हलकासा सडा शिंपडे, दुसरी मावशी चटई अंथरे. चुरमुर्‍यांना तिखट मीठ तेल लावुन आणलेले असे. गच्चीवरुन औरंगबादेतले प्रसिद्ध सलिम अली सरोवर दिसे. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या त्या गार हवेने मन प्रफुल्लीत होई. मीही खेळुन खेळुन थकायला येई. आम्ही सगळे खाली घरात यायचो. सातच्या मराठी बातम्या लागायच्या.

जेवणात माझी आवडती शेवयांची खीर असे. मी झोपायला आलो की आज्जी मला अंगाई गाउन झोपवी, काही ओळी मला अजुन ऐकु येतात,

खबडक खबडक घोडोबा
घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करतंय कोण?
आजोबाआजी मावशा दोन (तीन)

आनंदयात्र

आनंदयात्रीसर, तुम्ही लिहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावेत आम्ही... प्रतिसादाबद्दल तुम्ही आम्हाला धन्यवाद द्यायचे नाहीत... सहज, सुंदर... अजून बरंच काही.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

+१

आंद्या तु लिहिलेस यातच सर्व आले, एकदम सर्व चित्रासारखे डोळ्यासमोर उभे केलेस.

--टुकुल

++++

सहमत.

मी टोळ. Smile

मी टोळ. Smile

वा...

वा...!

मस्त

लेख

मस्त

लेख

मस्त लेख.

मस्त लेख. Smile

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

मदनबाण.....
कॄष्यति आकर्षयति इति कॄष्ण:

सुरेख

जुन्या अनेक आठवणी हौदातल्या वाळूसारख्या तळाशी जाऊन बसल्या होत्या, तुझा लेख वाचून त्यांची आठवण पुन्हा जागी झाली.

अवांतर - बदाफळ =)) =))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

+१ असेच म्हणतो!

मऊ मऊ वाळूतून शंख-शिंपले हुडकून काढल्याचा आनंद झाला. लिहिता रहा रे बाबा!

चतुरंग

यात्रीजी,

यात्रीजी, एक सुंदर लेख,
असेच लिहीत रहा

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

आहाहा

मस्त रे आंद्या. अगदी ते मालगुडी डेज वगैरे निरागस दिवसांच्या आठवणी जाग्या झाल्या....

आंद्याचा अजुन एक अंमळ हळवा लेख!

धन्यवाद

एक नंबर लेख मालक, म्हणुन तर आम्ही तुम्हाला नेहमी आग्रह करत असतो की लिहीत जावा म्हणुन.

टिपीकल आंद्यायात्री लेख, खुप आवडला. असेच लिहीत रहा बे !

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

+१

अगदी आनंदयात्री लेख; हा लेख वाचून तुला आंद्या म्हणवत नाही!!

खूपच छान लिहीलं आहेस रे!

अदिती

अदिती

+१

सुंदर लेख.

+२

असेच म्हणतो.

यात्रीसेठ, बर्‍याच दिवसांनी लिहिलंत..चांगलं लिहिलंत.

+३

असेच म्हणते. मालगुडी डेजसारखेच निरागस दिवस आठवले, अजुन वाचायला नक्कीच आवडेल.

+४

छान लिहिले आहे. Smile

बेष्टच!!!

बेष्टच!!!
लेख मस्त! आवडला

-ऋषिकेश

ऋषिकेश
------------------
तुम्ही शब्दांचा प्रतिकार अपशब्दांनी करत नाही? छ्या! स्वाभिमानी कसे म्हणवते तुम्हाला?

मस्त!

मस्त!

मजा आलि

मजा आलि वाचुन..

सुखाचा शोध-

हरवलेल्या सुखाचा छान शोध घेतलाय ! संपला तो 'बाळपणीचा काळ सुखाचा ' असे म्हणण्याऐवजी, सापडला तो 'बाळपणीचा काळ सुखाचा 'असे म्हणावेसे वाटते!

आंद्या ..

आंद्या .. आंद्या ..... कंटिन्यु ... कंटिन्यु ... प्लिज Smile
व्हाट अ प्रकटन !!

- टारानंदयात्री

मस्त रे आंद्या

खुप छान लिहीलं आहेस रे. आवडलं !

मस्तच

मस्तच भौ..सगळे म्हणतात तर लिहीत रहा... Smile

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

सुंदर प्रकटन

श्री यात्री, चित्रदर्शी पकटन अतिशय आवडले. अतिशय सुरेख.

खूप

खूप दिवसांनी लिहिलंत यात्री भाऊ.
अभिनंदन! लेख चांगला आहे. मात्र, नेहमीचा आनंदयात्री ट्च नाही जाणवला. निबंध लिहिल्यासारखं लिहिलंस असं वाटलं.
प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल राग मानू नये, तुझं लेखन आधीही वाचलं आहे. आणि ते आवडल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे.. म्हणून हे सांगायचं धाडस केलं इतकंच!.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

व्वा.. सुंदर

यात्री,
किती दिवसांनी प्रकटलास बाबा.. आणि काय सुरेख लिहिलं आहेस.. चित्रदर्शी !
खूप आवडले, वाचताना अलगद जुन्या दिवसात गेले.
स्वाती

नितांत सुंदर लेख

आंद्याशेठ एक नितांत सुंदर लेख..

तक्रार : फार कमी लिहिता तुम्ही.
आग्रहाची विनंती : असेच लिहिते रहा. आम्ही 'लुत्फ' उठवत राहु.
खुलासा : 'लुत्फ' हा शब्द उधार खात्यावर आणलेला है.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

आंदोबा

आंदोबा उच्च लेखन हो. एकदम भावले मनाला.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

आंदुशेठ....

बालपणात मस्त रमवलंत!
डोळ्यासमोर गुटगुटीत 'बाल' आंदू तरळून गेला. Smile

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

आठवणी जाग्या करणारा लेख

आमच्या घराच्या गच्चीवरची पाण्याची टाकी साफ करणं म्हणजे असाच आनंद असायचा.

लेख आवडला.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

दारामधे

दारामधे आणी सोप्यामधे एक खिडकी होती, सोप्यावरुन त्या खिडकीत सहज चढता येई. खिडकीत चढुन गणपतीसमोर ठेवलेला प्रसाद उचलतांना कित्येक वेळा घसरुन पडायचो मी. अन मग रडायला लागलो की मावश्या बदाफळ म्हणुन चिडवायच्या.

शो$$$$$$$$$ श्वी SSSSSट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट!!!!!!! Wink

खूऊऊउप सुन्दर!!!

आजोळच्या आठवणी दुधावरच्या सायीसारख्या असतात!!!!

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

तव भक्ती लागी तनु ही झिजू दे| तव चरणकमली मन हे निजू दे |
तव स्मरणी ठेवी ही वाचा रिझाया | नमस्कार माझा तुला गुरुराया ||

मस्त

मस्त लेखन

रम्य बालपण

रम्य बाल्पणाचे सुन्दर शब्दचित्र.
>>गच्चीवरुन औरंगबादेतले प्रसिद्ध सलिम अली सरोवर दिसे. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या त्या गार हवेने मन प्रफुल्लीत हो>>>>
या वाक्यानंतर का कोणास ठाऊक पण बंद, हीटर लावलेल्या खोलीत मला वार्‍याची पाण्यावरून आलेली आलेली झुळूक स्पर्शून गेली. खरच सांगते!!

जादूगार आहात की काय?

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी

© 2011 Misalpav.com, All rights reserved. Disclaimer | Privacy policy
Scroll to Top