Skip to main content

हेल्प हवि आहे

लेखक कार्लोस यांनी मंगळवार, 03/08/2010 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोटिंग सर्फ्से ला ब्लिस्टर का येतात जरा कलेल का मी खुप पैसे खर्चून भिंत पैंट केलि पण अजुन ब्लिस्टर येतात कही तरी उपाय सुचवा आपल्या पैकी कोणी तरी तदन्य असेल कृपया मदत करा

मँगो तिरामिसु

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 03/08/2010 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ आंबे किवा २ वाट्या आमरस+ सजावटीसाठी आंब्याच्या फोडी. ५ ते ६ मोठे चमचे साखर, २ अंडी १८ ते २० लॉफेल बिस्किटे( तिरामिसु करताची स्पेशल बिस्किटे) ही मिळाली नाहीत तर मेरी बिस्किटे घ्या आणि साखर वाटीभर घ्या .लॉफेल बिस्किटात साखर असते त्यामुळे ५ ,६ चमचे साखर पुरते. २५० ग्राम मस्कार्पोन चीज , ते नसेल तर लो फॅट क्वार्कचीज फ्रूटी किवा ऑरेंज ज्यूस बिस्किटे भिजवण्यासाठी. एक चौकोनी किवा लंबगोल ट्रे. कृती- आंब्याचा रस काढून ब्लेंडरमधून घुसळून गुठळ्या मोडा. मस्कार्पोन चीज त्या मध्ये घालून एकत्र मिसळा. अंडी भरपूर फेटून घ्या.

माझ्या 'गोव्या'च्या पुडीत

लेखक अडगळ यांनी मंगळवार, 03/08/2010 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
(कै . कवी बोरकर आणि त्यांचे वाचक , मागितली तरी क्षमा करणार नाहीतच , म्हणुन मग क्षमा न मागताच लिहीतो.) माझ्या 'गोव्या'च्या पुडीत, गड्या, तुतारी वाजते, नसानसातून जणू , ब्रम्ह फुगडी खेळते. माझ्या संभाजी बिडीत, झाले केवड्याचे श्वास, फुले मेंदूत मोगरा, दिवेलागणीचे भास, माझ्या मनाच्या मातीत, फुले तंबाखूचे मळे, झाले आभाळ चुन्याचे, दाढेआड चंद्र खेळे. माझ्या रस्श्याच्या वाटीत, मटणाचा महामेरू, पोटा लागली तडस, चला फुलचंद मारु. माझ्या जगत्या कुडीत, आले माहेराला सारे, घ्यावा जीवाचा जोगवा, सारी उघडली दारे.
काव्यरस

जीवन म्हणजे मुशायरा

लेखक अजय जोशी यांनी सोमवार, 02/08/2010 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
बोचता गुलाबी गजरा फाटला मनाचा सदरा खळाळतो नेहमी जिथे असतो तेथे उथळ झरा र्‍हदय ओतले शेरातुन म्हणा बरा की म्हणा खरा शेर बनावे र्‍हदय र्‍हदय जीवन म्हणजे मुशायरा आयुष्याचा असे 'उला' नंतरचा 'सानी' मिसरा औषध घेऊ प्रेमाचे करू जरासा अहं बरा करू काळजी का तुमची? असे मरा की तसे मरा जितका हसतो मी, तितका- मनीं खोलवर असे चरा दु:ख दिलेस मला; असु दे .., तुझाच मी; नाही उपरा जरी आज ओळखते जग अजून थोडा धीर धरा - अजय जोशी, पुणे

जाहीर आभारप्रदर्शन सोहळा.....

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी सोमवार, 02/08/2010 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
... मला माझ्या एका छान मित्राचे आभार मानायचे आहेत... .....कशाबद्दल?..... ....कारण त्याने माझं एकटेपण दूर केलं... ....मला व्यक्त होण्यासाठी...... माझ्यातल्या impulsive जाई ला मुक्तपणे व्यक्त व्हायला एक स्थान दिलं.... ... अनेक प्रकारचे....वेगवेगळ्या विचारसरणीचे.....खुप छान मित्र दिले.... ....जे काही थोडंसं लिहावंसं वाटतं ते लिहायला संधी.....

<घागरा>

लेखक अवलिया यांनी सोमवार, 02/08/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा... मोगरा... आणि आमचे परममित्र .. होय तोच तो ... निवासी लांडगा ;) आज भल्या दुपारी , कुठुन हा घागरा कडमडला. कॅफेमध्येच डोळ्यासमोर , तुझा मुखडा सुर्यासारखा अवतरला. मग त्या सोनेरी किरणात , मी सर्वांगी न्हाऊन निघालो. तुझ्या मदहोश हसण्यामध्ये , नकळत स्वत:ला हरवुन गेलो. जेंव्हा पुर्ण जाग आली , माझ्या गालावर खुलली होती लाली. खरं सांग बये , ही करामत आपोआप झाली , की दुपादुपारी तुझ्या हातांनी , बिन तोड गोलंदाजी केली .
काव्यरस

रावण पिठले......झणझणित.....

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी सोमवार, 02/08/2010 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ वाटी साधारण मध्यम आकारात चिरलेला कांदा / पात १ वाटी तेल १ वाटी तिखट (कोल्हापुरी मसाला वाले तिखट (कांदा लसुण मसाला तिखट) असेल तर उत्तम १ वाटी डाळिचे पीठ २ वाट्या गरम पाणी (कांदा चिरताना पाणी तापवायला ठेवावे..म्हणजे ऐन वेळी उकळते मिळेल) कोथिंबीर १ वाटी फोडणीचे साहित्य मीठ : चवीपुरते (नाहीतर बाकी सगळं १ वाटी आहे म्हणुन..

दयाळू

लेखक सौरभ परांजपे यांनी सोमवार, 02/08/2010 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मनाला कसा उमजून टाळू? मोग-याचा गजरा कोणत्या केसात माळू? कोणत्या युगात जन्म घेतला मी येथला हर एक पापी कनवाळू माझ्या पवित्रतेचे का मांगता पुरावे? सीतेला तुम्हीच दिलेत चितेत जळू मला भोगणारा, माझाच सखा होता कोणत्या खांद्यावर विसावून अश्रू गाळू माझ्या सहिष्णूतेला त्यांचा आक्षॆप होता त्यांतला कोणीच नव्हता इतका दयाळू

प्रश्न

लेखक सौरभ परांजपे यांनी सोमवार, 02/08/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
जीवंतपणी जीवाला का जाळतात प्रश्न? तिरडीवर ही मेले छळतात प्रश्न दिवसभर उत्तरे शोधून थकलो मी थडग्यात देखील साले डसतात प्रश्न चितेवर सुटकेचा निश्वास घेतला मी प्रेत जळले तरी राहतात प्रश्न माझ्या चितेची सोय मीच केली घट्ट नात्याची वीण उसवतात प्रश्न पतनाचा माझ्या ’आगाज’ मीच केला बरेचवेळा माणसाला घडवतात प्रश्न मी न केला कधी कोणास प्रश्न उगाच केविलवाणे करतात प्रश्न निरंतन संघर्षाचा ’यल्गार’ मीच केला जन्मभर पुरुन परत उरतात प्रश्न आर्थिक, कौंटुंबिक, राजकिय, सामाजिक प्रश्न सामान्य माणसाला फक्त नाडतात प्रश्न एक-एक करुन सोडवायला सारे घेतले भूमितिय पद्धतिने अचानक वाढतात प्रश्न
काव्यरस