Skip to main content

मकाण्णाचे सोने - जलजला

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 13/12/2021 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान शंकराने आपला तिसरा नेत्र उघ्डला तर त्यातून निघणार्‍या अग्निज्वाळांनी संपूर्ण सृष्टी भस्मसात होईल हे लहानपणी वाचलेलं बहुतेकांना आठवत असेल. परंतु विनोद शहा आणि हरीश शहा या दोन महान विभूतींनी पूर्वापार चालत आलेली ही समजूत खोटी आहे आणि शंकराच्या तिसर्‍या डोळ्यातून अग्निज्वाला न निघता फक्त लेसरबीमच निघतो, या लेसरबीममुळे फक्त भूकंप होतो आणि त्यात फक्त खलप्रवृत्तीचे व्हिलन लोकच मरतात आणि सत्प्रवृत्तीचे हिरो लोक सुखरुप निसटून जातात हे सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं आहे! स्वत:च्या मूर्तीकडून करुन घेतलेले हे चमत्कार पाहून साक्षात शिवशंकरालाही संतापाने तांडव करावसं वाटलं असेल.

प्रेमअगन..!

लेखक पाटिल यांनी रविवार, 12/12/2021 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमअगन. इसवी सन १९९८. फरदीन खान- सूरज, मेघना कोठारी- सपना. राज बब्बर- सूरजचा बाप+ आर्मीमध्ये कॅप्टन. स्मिता जयकर- सूरजची आई. अनुपम खेर- सपनाचा बाप+ अब्जाधीश उद्योगपती वगैरे. बीना बॅनर्जी- सपनाची आई. समीर मल्होत्रा- विशाल (सपनाचा भाऊ). पहिल्याच सीनमध्ये भर रस्त्यात झोका बांधून त्यावर झुलत जीवन आणि मृत्यूसंबंधी जांभईदार चिवचिवाट करणारी सपना दिसते आणि आपल्याला कळतं की आपली कशाशी गाठ पडलेली आहे..! विशालभैय्या आणि सपना रोज वेगवेगळ्या स्पोर्ट्सकारमधून कॉलेजला जातात. कारण अनुपमपापा अब्जाधीश आहेत. कॉलेजात एअरोबिक्सची ट्रेनर किरकोळ रजेवर असल्याने सपनावर ट्रेनिंगची जबाबदारी पडतेय..

तुझे गाणे

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 12/12/2021 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी पाऊस झालो सखे तू माती होशील का? स्पर्शाने माझ्या अलगद तू सुगंध होशील ना? मी दरीत येऊन पडलो तू वारा होशील का? शीर्षासन करून मग मी जग पायाखाली घेईल ना. तू रात्र अबोली हो ना मी चंद्र सखा तुज भेटेल. तू पहाट होशील तेव्हा मी तुझ्याच कुशीत झोपेन. सुख बिंदू झेलायला तू गवताचे पाते हो ना. आयुष्याच्या धक्क्यांना मग मी अलगद सोशीत जाईल. जरी विस्कटली घडी जीवनाची तू अशीच हसरी राहशील? मी वचनाने मज बांधून घेतो हे गाणे तुझ्याच साठी गाईल.

आप मुझे अच्छे लगने लगे-२

लेखक पाटिल यांनी रविवार, 12/12/2021 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१: https://www.misalpav.com/node/49462 (पुढे चालू)... 'भाभी,असं कसं विसरून जाऊ सपनाला? माझा दिल दुखतो. मला आत्ताच सपनाला जाऊन भेटलं पाहिजे' रोहित-निशिगंधाभाभीचा होस्टेलच्या गेटवर संवाद चाललाय. ह्यावर भाभीचं म्हणणं असं पडतं की, 'तू सुरक्षित रहावास ह्या भूमिकेतूनच सपनाने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे..! ह्यामध्ये माझा काही विशेष रोल नाही. मी फक्त हा निरोप सांगण्याचं कर्तव्य करत आहे..! याउप्परही तुला तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती करायची असेल तर तू स्वतंत्र आहेस..!

अन्नोत्सव

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 12/12/2021 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
आमची सोसायटी म्हणजे एक छोटासा गाव. म्हणजे बघा कहाणीतल्या आटपाट नगरा सारखा. मुआँ करोना आला आणी गावात सन्नाटा करून गेला. बरेच दिवस गाव चिडीचूप्प,हळु हळू गावाला जाग येऊ लागली . पुढाऱ्यांची मादियाळी जमा झाली. काहितरी करुयात म्हणत दवंडी आली. हाकारे पिटारे डांगारे कळवण्यात येते की आन्नोत्सव आयोजित होत आहे. जनमानसात आनंद पसरला. हौशे, गवशे आणी नवशे सगळ्याचीच गर्दी झाली. उत्तम आयोजन, गावातले गावकरी तृप्त झाले. सकाळी सकाळी सुर्यवंशींचा फेरा आला. अन्नोत्सवाचे भग्नावशेष बघून गत सध्यांकाळच्या वैभवशाली खुणा पुन्हा जागवू लागला.

नवी दिल्ली @ 110

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 12/12/2021 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) आणि राणी मेरी यांचा भारताचे सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक सोहळा 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीतील निरंकारी सरोवराजवळच्या बुरारी मार्गावर पार पडला होता. त्यासाठी खास ‘दिल्ली दरबार’ भरवण्यात आला होता. ब्रिटनच्या राजा आणि राणीचा भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्लीत भरवण्यात आलेला हा तिसरा दरबार होता. राज्याभिषेकानंतर लगेचच सम्राट जॉर्ज (पंचम) याने ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले.

ऐसे ऐकिले आकाशी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 11/12/2021 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलक दाहक त्वचेवरून देशील का काढून? मावळतीवर जेव्हा तारे- भल्या पहाटे फिक्कट होतील- तेव्हा त्यांना तेज त्यातले थोडे थोडे देईन वाटून"
काव्यरस

(चकणा जरा)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 11/12/2021 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620 मागवतो चकणा जरा नेक्स्ट पेग आधी घाल पाणी, घाल सोडा "कच्ची" पोटास बाधी || चालते व्हिस्की किंवा रम माँन्कच्या वतीने टाळतो आता बीयर ढेरी सुटायच्या भीतीने || संपवला चकणा पुन्हा न पिणार्‍या हातांनी अन पिणारे केव्हाच गेले उंच आकाशी विमानी || रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || - टल्ली * वैधानिक सुचना : मद्यपान शरीरास हानीकारक आहे , पण जास्त चकणा खाणे हे त्याहुन जास्त हानिकारक आहे.

२२ यार्ड

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 11/12/2021 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी नव्वदच्या दशकातही, आमच्या डोंगरपायथ्याला बिलगून असणाऱ्या छोट्याश्या गावात क्रिकेट हा लहान-थोर सर्वांचा आवडता खेळ. त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं असेलही पण उत्साह मात्र तोच, जो भारतात क्रिकेटसाठी इतरत्र कुठेही दिसेल. फळी (बॅट) विकत आणलेली बॅट त्यावेळी गल्ली क्रिकेटमधे तरी अपवादानेच सापडायची. एखादी लाकडी फळी शक्य असेल त्या पद्धतीने बॅट मधे रूपांतरीत केली जायची. त्या बॅटने खेळायची एवढी सवय व्हायची की कोणीतरी रेडिमेड बॅट आणली की रुळायला वेळ लागायचा. एकदा वाढदिवसाला हट्ट करून मिळालेल्या नवीन बॅटचा इतका आनंद झाला की मी भारतीय संघात खेळतोय अशी स्वप्न पडायला लागली.

वॉशिंग मशीन आणि लिपिस्टिक

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 11/12/2021 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
(एका फेसबुकी चरित्रापासून मिळालेली प्रेरणा) आमची छोटीसी फॅमिली. मी, माझा नवरा आणि एकुलता एक मुलगा, तो ही शिक्षणासाठी घरापासून दूर. घरात आम्ही दोघेच. एक दिवस नवरोबा वॉशिंग मशीन घेऊन आले. मी विचारले, ही कशासाठी. नवरोबा उतरले, धोब्याचा खर्च वाचेल आणि तुलाही जास्त कष्ट करावे लागणार नाही. मी मनात म्हंटले, अरे, खरे बोल की, मला कामावर जुंपण्यासाठीच ही मशीन तू घरी आणली आहे. माझे सुख-चैन पाहवत नाही तुला. मी पण काही कमी नाही, हातात आलेला असा मौका मी सोडणार थोडीच. नवर्‍याला चांगली अद्दल घडायचे ठरविले. मग काय, मी खरीदरी सुरू केली.