बुवांचा न्याय
एका गावात एक बुवा राहत होते. लोक त्यांना बाबा म्हणत. बाबांवर गावाचं प्रेम होतं. वय तरूणच होतं. पण कुठल्याही गोष्टीचं तार्किक विश्लेषण, न्यायबुद्धी यामुळं गावातच काय पंचक्रोशीत त्यांचं नाव झालेलं होतं. त्यांच्या न्यायप्रियतेमुळे कोर्टाची पायरी चढणंच बंद झालं होतं.
गावाला बुवांचा अभिमान होता. त्यांना रहायला घर बांधून दिलं होतं. शेतजमीन दिली होती. लोक स्वतःहून ती जमीन कसत आणि उत्पन्न बुवांच्या चरणी आणून ठेवत. बुवा नको नको म्हणत असताना त्यांचं बँकेत खातं उघडलं होतं. त्यात पैसे जमा होत होते. अन्नधान्य, दूधदुभतं ..कशाचीच कमी नव्हती.
मिसळपाव
![Img00033[1]](http://farm6.static.flickr.com/5069/5757465576_6b30e7630f_z.jpg)