Skip to main content

यु. जी. कृष्णमूर्ती : एक नाकारण्यायोग्य 'तत्त्वज्ञ'

लेखक प्रास यांनी बुधवार, 16/11/2011 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखनाची प्रेरणा यु. जी. कृष्णमूर्तींच्या (युजी) विचारांवर आधारीत उपरोल्लेखित लेखासंदर्भात एकूणच यशवंतराव कुलकर्णींच्या माझ्याबरोबर आणि इतरत्र प्रतिसादप्रपंचादरम्यान झालेल्या वक्तव्यांचा विचार करता त्यांनी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात काही लेखन आवश्यक वाटलं.

मासे ३५) सुरमई

लेखक जागु यांनी मंगळवार, 15/11/2011 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
सुरमई ही मत्स्यप्रेमींची लाडकीच. त्यामुळे ही अर्थात कोळणींचीही लाडकीच. स्वस्त भावात सोडायला त्या तयार नसतात. हिची एक तुकडीच जवळ जवळ ५० रुपयाला मिळते. सुरमई खात्री पुर्वक घ्यावी. कारण सुरमईच्या नावाखाली कुपा हा मासाही कोळणी खपवतात. कुपा माश्याला सुरमईची चव नसते. फक्त दिसायला साधारण तसाच असतो. सुरमई ही चकचकीत असुन छोट्या सुरमईच्या कातडीवर काळपट ठिपके असतात बाजुने तर मोठया सुरमई फोटोत दाखवल्या प्रमाणे.

यू.पी चे विभाजन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 15/11/2011 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
मायावतीने यू.पी चे विभाजन ४ भागात करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. उत्तर प्रदेश हे आकाराने आणि खरेतर लोकसंख्येने अगडबंब असलेले राज्य. सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य. .. प्रदेश लहान असेल तर त्याचा विकास.. व व्यवस्थापन प्रभावी पणे करता येते असा सिद्धांत मांडला गेला आहे... हा प्रस्ताव यू.पी विधान सभेत मांडला जाईल... आता उत्तर प्रदेशाचे विभाजन झाल्यावर त्याचा सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य हा बिरूद राहणार नाही. तो मुकुट महाराष्ट्राकडे येईल. महाराष्ट्रात असा विभजनाचा प्रयोग होऊ शकतो का? विदर्भाची मागणी जुनीच आहे...

दुसर्‍या कुत्र्याच्या प्रतिक्षेत ( तिचा कुत्रा -१)

लेखक रामजोशी यांनी मंगळवार, 15/11/2011 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा कुत्रा - १ एक प्रयत्न. (विवेकरावांची क्षमा मागून) लहानपणापासुन ओळख होती आमची भेटत होते तसे रोजच. “मित्रच माझा” म्हणाली. 'हुषार आहे अगदी' हसले मी. 'कुत्रे असतातच हुषार' म्हणाले. 'नाही, पण हा. म्हणजे....' ती म्हणाली 'हुशार हो अगदी सकाळी बाहेर जातो न चुकता घरावर तर लक्ष फार सगळे दारूडे, चोर, अगदी “यांच्यावर” सुद्धा. माझ्याकडं बघताय ना? वाटते का तिशीची? याच्याशी खेळणे अगदी रोजच्या रोज रेग्युलर आहे तसा तो सगळ्यातच आणि पर्टिक्युलरही.

पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) स्कीम मधील बदल

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 15/11/2011 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्र सरकारने नुकतीच पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) स्कीम मधे काही बदल केल्याची घोषणा केली. हा निर्णय छोट्या गुंतवणूंकदारांमधे उत्साह आणण्यासाठी केला आहे असे सांगण्यात आले आहे. तर काय बदल उत्साहवर्धक बदल आहेत हे बघुयात: 1. 70,000 ही गुंतवणुकीची मर्यादा 100,000 वर नेण्यात आली आहे. - जे लोकं 'डेट' मधे गुंतवणूक करतात त्यांना 'डेट' प्रकारातील गुंतवणुक वाढवता येईल - जे लोकं 'इक्वीटी' मधेही गुंतवणूक करतात आणि पोर्ट्फोलिओ 'डेट' प्रकारातही डायव्हर्सीफाय आता करू ईच्छितात त्यांना 'डेट' प्रकारातील गुंतवणुक वाढवता येईल 2.

तिचा नवरा -१

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 15/11/2011 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
काही ओळख वगैरे नव्हती आमची. भेटला तसा अपघातानंच. 'बायको माझी...' म्हणाला 'हुषार आहे अगदी' हसलो मी. 'बायका असतातच हुषार' म्हणालो 'नाही, पण ही..' तो म्हणाला 'अ‍ॅक्टिव्ह हो अगदी सकाळी जिम. न चुकता घरी तर लक्ष इतकं सगळ्यांच्या तब्येती, मल्टिव्हिटॅमिन्सच्या गोळ्या, फळंबिळं.. माझ्याकडं बघताय ना?
काव्यरस

मी माझ्या छंदातच रमतो -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 15/11/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या छंदातच रमतो मी हा माझा छंदच म्हणतो ! शब्द वेचतो शब्द वाटतो आनंद लुटतो आनंद दाटतो जमेल त्याला भेटा म्हणतो स्वत:स बघतो इतरांना बघतो एकटा चालतो चाला म्हणतो झेपेल तेवढे खेटा म्हणतो आपण सुंदर जग हे सुंदर विचार जनांचे विचार मनाचे रुचेल त्याला मोठा म्हणतो मी माझ्या छंदातच रमतो मी हा माझा छंदच म्हणतो !

मन

लेखक गार्गी_नचिकेत यांनी मंगळवार, 15/11/2011 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
ह्रदयीच्या या भावनांचे शब्द नाही सोबती, काहुर हुरहुर मात्र माझ्या काळजाला घेरती. गुंतला गुंता सुटेना, बांध मनिचा ही फुटेना धाव घेइ मन कुठे मग, आठवांच्या मागुती...... ह्रदयीच्या या भावनांचे, शब्द नाही सोबती.