सुरमई ही मत्स्यप्रेमींची लाडकीच. त्यामुळे ही अर्थात कोळणींचीही लाडकीच. स्वस्त भावात सोडायला त्या तयार नसतात. हिची एक तुकडीच जवळ जवळ ५० रुपयाला मिळते.
सुरमई खात्री पुर्वक घ्यावी. कारण सुरमईच्या नावाखाली कुपा हा मासाही कोळणी खपवतात. कुपा माश्याला सुरमईची चव नसते. फक्त दिसायला साधारण तसाच असतो. सुरमई ही चकचकीत असुन छोट्या सुरमईच्या कातडीवर काळपट ठिपके असतात बाजुने तर मोठया सुरमई फोटोत दाखवल्या प्रमाणे.
ही आहे सुरमई
साहित्यः
सुरमईच्या ४-५ तुकड्या
चिमुटभर हिंग
हळद अर्धा चमचा चमचा
मसाला १ ते २ चमचे (तिखटाच्या आवडीवर)
मिठ अंदाजे
पाककृती:
१) सुरमईच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या.
२) तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या.
३) पॅन गरम करुन त्यात तेल चांगले गरम करा. गॅस मिडीयम ठेवा व त्यात तुकड्या सोडून द्या.
४) तुकड्या पातळ असतील तर ३-४ मिनीटे आणि जर जाड्या असतील तर मंद पेक्षा थोडा मोठा गॅस ठेउन ५-६ मिनीटे एक बाजु शिजवुन पलटून तेवढाच वेळ ठेवून गॅस बंद करावा. अगदीच रहावले नाही तर एक तुकडा जेवायच्या अधी मोडून खायला सुरमईची काहीच हरकत नसते :स्मित:
महत्वाची सुचना : हा फोटो पाहुन कोणी जळू नये आणि जळल्यास मी जबाबदार नाही. :हाहा:
अधिक टिपा:
सुरमईचे कालवण इतर कालवणांसारखेच करतात.
तळताना तुमच्या आवडीनुसार आल-लसुण वाटण, लिंबु पिळून लावू शकता.

वाचने
17261
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहाहाहा.... तोंडाला पाणी
वा..... मी तरी जळाले...आणि
खतरनाक
आता मात्र मी मत्स्याहारी
.............................
सुरमई
आहा.नेहमीप्रमाणेच
आहा. नेहमीप्रमाणेच
मस्त दिसत आहे फोटो
झकास तोँपासु
व्वा क्या बात !!!
अप्रतिम
तोंडाला पाणी सुटले...!!!!
मस्त पाकृ
कोणता जास्त टेस्टी हे
In reply to मस्त पाकृ by प्रचेतस
..पापलेट हापूस तर सुरमई पायरी
In reply to कोणता जास्त टेस्टी हे by गवि
आपापली आवड!
In reply to ..पापलेट हापूस तर सुरमई पायरी by यकु
एक्झॅक्टली.. म्हणून अगदी
In reply to आपापली आवड! by पैसा
अहो गवि, आजवर हजारो वेळा
In reply to एक्झॅक्टली.. म्हणून अगदी by गवि
जागुताई _/\_ तोपासु, मस्त,
झक्कास. तोंपासु.
जागुताईचा विजय असो !!
सगळ्यांचे धन्यवाद.
'सुरमई' शाम
+१
In reply to 'सुरमई' शाम by संदीप चित्रे
झकास
अहो जागु ताई, मदत करता का जरा....
उम्म्म्म
प्रत्येकाची आवड कोणाला सुरमई
हिंग
ओ राहीताई, प्रांतोप्रांतीच्या
In reply to हिंग by राही
राही हिंग अगदी पाव चमचा तोही
अप्रतिम ..
!!!!!!!!!!
अहाहा!