Skip to main content

बालपणीचा गाव

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
सहज वाटे धावत जावे गावाच्या आठवणीत क्षणभर थांबावे तो गाव मज आठवे सुर पारंब्या, मन जेथे झुलवे ती आंब्यांची न्याहारी त्या रात्रीच्या गप्पा धुंडाळला लपंडावात वाड्याचा हरेक कप्पा त्या संध्याकाळच्या वेळी गप्पा न् रानापर्यंत फेऱ्या रसाळ रानमेवा तो रानातल्या झाडावरील साऱ्या लाडिक हट्टाने घेतलेल्या त्या वाण्याकडील गोळ्या नव्या कोऱ्या लोणच्यासोबत त्या धबाडक्या पोळ्या त्या भुताखेतांच्या गोष्टी ते गोधडीसाठीचे भांडणे मिळता पांघराया गोधडी भावंडांना चिडवून रडवणे सारे हरवले आता हे, सर्व आहे मज ठावे तरीही मन पुन्हा पुन्हा गावाकडेच धावे
काव्यरस

वादळ

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज मला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून मनाची सुरु असलेली घालमेल संपली होती एकदाची !! गेले काही महिने जे आम्ही वेगळे राहत होतो त्याचं फलित आज एका कागदावर काळ्या अक्षरात माझ्याकडे आलं होतं. मला खरच हे हवं होतं का ? त्याने एकदा तरी मला विचारायला हवं होतं. पण तो त्याचा स्वभावच नव्हता. माझ्याही अंगवळणी पडलं होतं सगळं. मला नक्कीच नको होतं, हे असं अर्ध्यात डाव मोडून जाणं. पण डावच तो !! एकटी मी तरी कसा मांडू शकणार होते ? अन्यथा आत्ताच्या, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, मी त्याची वाट पहात राहिले नसते.

चाहूल

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
हुरहूर मनी दाटता चाहूल तुझी लागता क्षणात वाटे आला वारा अलवार केस उडवणारा तुझा तो तनगंध करे मज बेधुंद हळुवार तलम स्पर्श फुलवे मनी हर्ष कधी जातील विरह क्षण कधी संपतील हे वर्ष
काव्यरस

काकाच्या सासर्‍याला आजोबा म्हणावे का?

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 23/11/2011 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10831210.cms सध्या महाराष्ट्राच्या दोन राजघराण्याच्या पुतण्यांमधे शाळकरी पोरांना शोभेशी भांडणे चालू आहेत. अदापः ह्यांना शेतीतले काय कळते? कधी नांगर तरी पाहिलाय का? राठा: ह्यांना क्रिकेटमधले काय कळते? ह्यांचे बापजादे क्रिकेट खेळायचे का? अदापः होयच मुळी! माझे आजोबा भारताच्या टीममधे होते? राठा: साहेबांचे सासरे तुमचे आजोबा कसे? उद्या तुम्ही दारासिंगला आजोबा म्हणाल. अदापांचे उत्तर वाचायला उद्याचा मटा नक्की वाचा.

बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा

लेखक विदेश यांनी बुधवार, 23/11/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा दूर गेली फूल पाने एकटा मी हा असा जन्मता मी खूष झाले का बरे गणगोतही जीव होता पुरुष माझा नवस जन्माचा तसा देवही ना जाणतो तो मुकुटचोरी जाहली मी सदा डोकावतो झोळीत माझ्या का असा मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी लांब असताना भिकारी मीच बघतो का खिसा श्वानही वर मान करुनी आज भुंकेना मला राव असता मान होता आदबीचा या बसा

वीर शिवाजी - कलर्स

लेखक सचिन यांनी मंगळवार, 22/11/2011 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज चॅनेल सर्फिंग करता करता एक धक्कादायक अनुभव आला. मिपावाचकांना याविषयी सांगणे आवश्यक वाटले, किंबहुना सर्वांच्या नजरेस आणून द्यावेसे वाटले म्हणून........... कलर्स चॅनेलवर "वीर शिवाजी" नावाची एक मालिका चालू आहे.रोज ८.३० ते ९.०० सायंकाळी. महाराजांच्या बद्दल आजपर्यंत कधीही वाचण्यात / ऐकण्यात न आलेल्या अशा अतर्क्य घटना त्यात दाखविल्या आहेत. माझ्या मते शिवचरित्राला अक्षरशः विटंबित करण्यात आले आहे. या चॅनेल द्वारे ही मालिका जगभरात प्रसारित होत असणार... उदाहरणादाखल : (१) मियां रहीम नावाच्या कुठल्याश्या खानाच्या गोटातील एक बाई शिवाजी राजांना मारायचा कट करते आहे.