मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२
राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 'मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२' आयोजित करण्यात येत आहे. त्यासंबंधीचे संस्थेचे निवेदन इथे दिले आहे.
--------------------------------------------------------------
संगणकावर मराठीतून माहितीचा देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे.
शिशिराची चाहूल
पाने गळू लागली आणि झाडांवर पक्षी दिसू लागले.
म्हणजे पाने कमी झाल्यामुळे ते झाडावर येत आहेत असे मला म्हणायचे नाही तर पाने कमी झाल्यामुळे ते दिसू लागले. फुले गळाल्यामुळे फुलातले किडे खाणारे छोटे पक्षी गायब झाले आणि त्याची जागा घेतली झाडांच्या टणक शेंगा खाणार्या पक्षांनी. मैनांनी, आणि पोपटांनी. अर्थात एकदा त्यात एक हळद्याही घुसला होता. त्याचा सुंदर पिवळा रंग बघताना भान हरपते. त्याचाही फोटो टाकला आहे.
पोपटांना चेहरा असतो आणि त्यावर भाव उमटतात हे आपल्याला हे फोटो बघितलेत तर उमगेल.
आला दिवस गेला दिवस ...!!
आला दिवस गेला दिवस
कसा दिवस निघून जातो
घरी बसलो म्हणून
दिवस काही थांबत नसतो
एके दिवशी म्हणालो त्याला
थांब जरासा
थोड्याशा गप्पा मारू
जरा माझे-तुझे जुने दिवस
आठवीत बसू
हलकेच म्हणालो त्याला
तिच्यावर माझे प्रेम होते
हे तुला माहित होते
तुझे सगळे भन्नाट होते
माझे मन झुलत होते
ती तर बोलूच नको
काळजाचे गाणे होते
हसला दिवस
लाजला थोडासां
अरे थांबरे जरासा
कटाळलास कारे बाबा ..?
तिला आठवताना किती बरे वाटते
तिला आठवताना शप्पत
तुझी आठवण मात्र नक्की असते
उदासला दिवस
हलकेच निघाला
म्हणालो
जरा फ्रेश होण्यासाठी
तुझ्यासाठी चहां टाकतो
मग जराश्या गप्पा मारू
जरा जुने दिवस आठवीत बसू
त्याला थां
काव्यरस
एक शंका
प्रा. यनावाला यांची निरिश्वरवादी मते ते नेहमीच पोटतिडीकेने मांडत असतात. स्वखुशीने बुडणार्या लोकांना वाचवावयाचे प्रयत्न करणार्या अशा लोकांबद्दल मला नेहमीच कुतूहल (व आदरही ) वाटत असतो. आमची वर्गवारी निराळी. माझ्याकडे कधीही पूजा नसते पण कोणी बोलावलेच तर आनंदाने जातो, रुपया टाकतो, "प्रसाद छान झाला आहे" असे म्हणून परत एकदा मागून खातो ( घरी आल्यावर बायकोची बोलणीही!) पण कोणाला सुधारावे असे कधीच वाटले नाही. तर सांगत काय होतो यनावालांनी उपक्रमवर असाच एक लेख टाकला व त्या ललित लेखाला चांगले ९७ प्रतिसाद लाभले.
तुम्ही पी एम बनणारच ..
एकदा आमचे युवराज वदून गेलेत
.......त्याला कोणीही रोखू शकणार नाही
तेव्हा आम्हा झाला साक्षात्कार
खरेच.....
चोऱ्या, दरोडे, खून, बलत्कार, जुगार
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही.
भेसळ, साठेबाजी, नफेखोरी, कर बुडविणे
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही.
भ्रष्टाचार, स्वीस बँकेतील काळा पैसा,
पैसे, दारू वाटून निवडून येणे
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही
गावात अमंळ लोड शेडींग
कचरा, घाण,रस्त्याचे कडे वरील ....विधी
या गोष्टी चालूच राहणार
त्याला कोणीही रोखू शकणार नाही
शहरात चार दिवसाआड पाणी, पुतळ्यांची गर्दी
रस्त्यांवरील खड्डे,....निष्पापा
युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले
युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले
तो:
ओठ गुलाबी काय नकळत बोलले
ती:
अं हं
तुझ्यासाठीच ते रे नकळत विलगले
तो:
संध्या आज का फुलूनी आली
रंग तांबडे सोनेरी ल्याली
ती:
दिवसा रातीच्या मिलनवेळी
संध्या असली फुलूनी आली
लाजलाजूनी बघ झाली वेडी
त्या लाजेने गाल तिचे आरक्त रंगले
तो:
पाण्यावरचे तरंग का हालती डुलती
तरंगातूनी काय कोणता संदेश वदती
ती:
शांत पाण्याला जीवन देण्या
तरंग असले आले जन्मा
जळात ते जवळी राहून
लडीवाळ काही गोड गुपीत बोलले
तो:
फुले माळलीस तू या वेणी
गंध तयांचा गेला रानी
ती:
भ्रमर झाला बघ तो वेडा
जवळी आला रस घेण्या चुंबूनी
भ्रमर कुणी का त
काव्यरस
मुलाखत
माननिय शिवसेना प्रमुखांची मुलाखत वाचताना या हे मुद्दे लक्ष वेधुन घेतात ....
प्रश्णास उत्तर देताना ते म्हणतात...
दूषित? दूषित हवेमुळे सगळेच त्रस्त आहेत.
- इतर सगळे त्रस्त आहेत. पण मी त्रस्त नाही, तर व्यस्त आहे. या सगळ्यांचं काय
होणार? शेवट काय होणार? इतका हा देश नासवलाय सगळ्यांनी. विशेष करून कॉंग्रेसने.
भयानक केलंय. म्हणजे त्याला काही अर्थच नाही. म्हणून मी नेहमीच सांगत असतो
की, आपण अराजकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. केव्हाही काही तोंड फुटेल. मग हे
सारं निस्तरणार कोण? हा प्रश्न तुमच्यासमोर येईल.
- असं का वाटतं?
- का वाटतं म्हणजे? तुम्हीच पहा काय चाललंय.
मिसळपाव