Skip to main content

शशक-फ्रिज

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 24/02/2023 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
ती-रोज रोज काय तेच तेच? तुला कंटाळा कसा येत नाही? मी-आलाय ना. मला तुझा कंटाळाच आलाय. तसेही आपल्याला एकत्र राहायला लागुन आता २ वर्षे होउन गेली आहेत. किती वेळा तेच तेच बघायचं? आणि तुझा ईंटरेस्ट आजकाल कमी झालाय फार. बाहेर काहीतरी चालु नाहीये ना? ती- मूर्ख आहेस का? एकच चूक माणुस पुन्हा पुन्हा कशाला करेल? आधीच डोक्याला ताप झालाय. उत्तराखंड ट्रिपवर गेलो होतो तिथेही तुझी कटकट होतीच. आणि तुला परत सांगते, माझ्या अंगावर हात उगारलास ना तर सरळ पोलिसात तक्रार करीन आणि तुझे घोडे लावीन. मग बस खडी फोडत तुरुंगात. मी- मला धमकी देतेस?

श्वान शीघ्रकोपी

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी शुक्रवार, 24/02/2023 03:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही भटकी कुत्री चार वर्षाच्या मुलाचे लचके तोडत असतानाचा एक व्हिडिओ कोणतीही पूर्वसूचना न देता कुणीतरी ग्रुपवर पाठवला. मला तो दहा सेकंदसुद्धा पाहण्याचे धाडस झाले नाही. पुढे काय असेल या कल्पनेनेच थरकाप उडाला, आणि मन प्रचंड उदास, अस्वस्थ झाले. इतकं की मला आज थेरापिस्ट कडे जावे लागले. कुत्रा नामक गोष्टीची भिती खूप लहानपणी बसली. मला कुत्रा लहानपणी चावला नाही, पण धाकट्या भावाला एक कुत्रा चावला. करंगळीच फाडली होती. तो धसका बसून मी कुत्र्यांपासून प्रचंड सावध वागू लागलो. नंतर एका बालमित्राला एक पिसाळलेला कुत्रा चावला. सुदैवाने त्याचा मोठा भाऊ दवाखान्यात काम करत असल्याने लगेच उपचार केले गेले.

शहरी माणूस.

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 23/02/2023 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवातीला गांगरलो, भोवळलो, घुसमटलो पण... आता रुळू लागलोय या वस्तीत. किती दिवसात नाही पाहिलं चांदणं काजव्यांच लुकलुकणं चंद्राच्या अस्तित्वाचीच आता येऊ लागलेय शंका सूर्याचं उगवणं, मावळणं देखील किती दिवसात अनुभवलेलं नाही. इथे व्यवहार चालतो घड्याळाच्या काट्यावर त्याच्या काट्यानुसार आमचं आयुष्य सरकत असतं पुढं पुढं माणसांच्या गर्दीत राहून सुद्धा असतो एकटा एकटा आसपासच्या माणसाचं अस्तित्वसुद्धा कळत नाही आतासं. किंवा... तशी गरजच भासत नाही कुणाला.
काव्यरस

Thrills on Wheels - चौथा टप्पा

लेखक मालविका यांनी गुरुवार, 23/02/2023 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
Thrills on Wheels ( Thane - Statue of Unity - Thane) चौथा टप्पा २६ जानेवारी. आजपासून परतीचा प्रवास सुरू. येताना जेव्हढे रिलॅक्स होतो त्यापेक्षा जरा काळजीत होतो. काळजी एवढ्याचसाठी की आलो तेव्हा कुठे थांबणार हे पक्क होत, हॉटेल बुक केलेली होती. आता आम्ही आमचा अंदाज घेवून त्यातल्या त्यात मोठ्या शहरात जाऊन मग तिथे हॉटेल बघून राहणार होतो. त्यामुळे वेळेत निघणं, वेळेत पोहोचणं गरजेचं होत. सुरवातीला अंकलेश्र्वर नक्कीच होत. निघालो आणि केवडियाचा परिसर सोडला नि मस्त टेल विंड्स लागले. इतके दिवस एकही BRM ला या टेल विंडस नी साथ दिली नव्हती.

हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा : भाग ९: खज्जियार आणि चंबा

लेखक गोरगावलेकर यांनी बुधवार, 22/02/2023 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ८ येथे वाचा खाज्जियार हे चंबा खोऱ्यातील ६५०० फूट उंचीवरील एक हिल स्टेशन . स्वित्झर्लंडशी उष्णकटिबंधीय साम्य असलेले हे ठिकाण म्हणजे सुमारे ५ किमीचा परीघ असलेले एका मोठ्या खोलगट बशीच्या आकाराचे हिरवेगार कुरण आणि मध्यभागात एक सुंदर तळे. कुरणात चरणारे प्राणी, कुराणाच्या पलीकडील बाजूस दिसणारे पर्वत व त्यावरील देवदार वृक्षांचे दाट जंगल याचे नेत्रसुखद दर्शन. कुरणाच्या एका कोपऱ्यात (रस्त्याच्या बाजूने) १२ व्या शतकातील खाज्जिनाथ मंदिर हे येथील आणखी एक आकर्षण.

आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:

लेखक Bhakti यांनी बुधवार, 22/02/2023 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
भागो यांच्या साय फार कथा वाचून अभ्यासाचे जुने दिवस आठवले.बरोबरीने कवितेचा ही अभ्यास जोरात असायचा :).DNA replication शिकत होते तेव्हा लिहिली ही साय फाय कविता होती ;)....

कॅलेंडर

लेखक आजी यांनी मंगळवार, 21/02/2023 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कुठेही एखादा फाॅर्म भरायला गेलो तर त्यात तारखेचा रकाना असतोच. आपली स्मृती आपल्याला दगा देते आणि आपल्याला नेमकी त्यादिवशीची तारीख आठवत नाही. मग आपण समोर पाहतो. तिथं भिंतीवर कॅलेंडर असतं. ते पाहून आपल्या ला तारीख आठवते,आपण ती लिहितो. कॅलेंडर अर्थात् दिनदर्शिका अशी एक उपयुक्त वस्तू आहे. दिनदर्शिका ह्या विविध प्रकाशनसंस्थांच्या, विविध भाषांमध्ये उपलब्ध असतात.

(का या गळ्याच्या तळाशी...)

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 21/02/2023 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरर्णा काळजाच्या या तळाशी दिपक पवार साहेब याची कविता या वेळेस जरा हटके आहे. नेहमीच प्रेमरंगी रगंणारे, साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा शब्द तू,संगीत तू, म्हणणारे दिपक भौ आज वेगळ्याच मुड मधे आहेत का? पण काही असो छान लिहीतात. त्यांच्या आभासी रचनेत वास्तवाची झलक दिसते.

काळजाच्या या तळाशी राहशी तू.

लेखक Deepak Pawar यांनी सोमवार, 20/02/2023 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
काळजाच्या या तळाशी राहशी तू सारखी स्वप्नात माझ्या नांदशी तू. मागणे ते,"विसरुनी जावे मला तू!" काय सांगू? प्राण माझा मागशी तू. प्रेम ना माझे तुझ्यावर सांगताना का गं आता? या टिपाना ढाळशी तू? एवढी आता कशी ही बदलली तू वेचुनी काटे, फुलांशी भांडशी तू. आठवू मी का तुला? म्हणतेस आणिक चांदण्या मोजीत का या जागशी तू.
काव्यरस

चित्रपट परीचय-- फ्री गाय-

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 20/02/2023 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार् मंडळी!! सध्या मिपावर साय फाय ची चलती दिसते. तद्वत काल स्टार मुव्हीज वर एक मस्त चित्रपट बघितला आणि वाटले की मिपाकरांना त्याची ओळख करुन द्यावी. तर हा चित्रपट म्हणजे "फ्री गाय" चित्रपटाची गोष्ट साधारण्पणे अशी---- फ्री सिटी हा एक ऑनलाइन व्हिडिओ गेम आहे जो सुनामी गेम्स नावाच्या कंपनीने विकसित केला आहे. पण त्याचा सोर्स कोड वॉल्टर "कीज" मॅकी आणि मिली रस्क यांनी विकसित केलेल्या लाइफ सेल्फ नावाच्या अप्रकाशित गेममधून चोरला गेला आहे. सुनामीचा मुख्य डेव्हलपर अँटवान होवाचेलिकने फ्री सिटी तयार करण्यासाठी तो कोड वापरला आहे.