Skip to main content

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ४

लेखक स्टार्क यांनी रविवार, 17/05/2020 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - १ कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - २ कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ३ दादाजानना जाऊन आता हप्ता होत आला होता. त्यांचा जनाजा निघाला तेव्हा सारा मुहल्ला जनाज्याच्या मागून कब्रस्तानपर्यंत चालत गेला. त्या दुपारी पाहिला तसा आजिबात चहलपहल नसलेला सुनसान मुहल्ला मी कधीच पाहिला नव्हता.

कोण जमूरा कोण मदारी..

लेखक सेफ्टीपिन यांनी रविवार, 17/05/2020 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
कोण जमूरा कोण मदारी तीन पायांची शर्यत न्यारी कोण जमूरा कोण मदारी बुद्धिबळाच्या या पटावर इथे नांदते घराणेशाही लोकशाही टांगून खुंटीवर प्रजेस बोलायची चोरी लोण्यावरती ठेवूनि डोळा इमानाच्या खोट्या शपथा सरड्यासंही वाटावा हेवा वजीराची तर बातचं न्यारी हत्ती, घोडे आणि उंटही फिरता वारे चाल बदलती मोह-मायेचे हे पुजारी कसली निष्ठा अन कसली भक्ती प्याद्यांची पण कथा निराळी निसुगपणाची दाट काजळी 'संकटाच्या' तव्यावर देखील शेकती स्वार्थाची पोळी कोरड्या घोषणा भाबडी आशा प्रजा बिचारी केविलवाणी सावळ्यासंही गहिवर येई सावळा गोंधळ दरबारी स्वतःभोवती गिरक्या घेत राजा सांगे प्रजेस कहाणी 'मी', 'माझे', 'पूर्वज माझे'
काव्यरस
Taxonomy upgrade extras

HTML आणि CSS कोड वापरून लेखन सादर करणे.

लेखक कंजूस यांनी रविवार, 17/05/2020 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
लेखन सादर करताना ते जरा आकर्षक दिसावे यासाठी हे कोड आहेत. मी काही नेटवरचे लेख वाचून हे जमवले आहेत. करून पाहा. HTML आणि CSS कोड वापरून लेखन सादर करणे.
HTML FORMATTING



अनुक्रमणिका

१ ) गाभा

२ ) परिच्छेदाची पहिली ओळ पुढे सुरू करणे

३ ) रंगीत परिच्छेद

४ ) उभा फोटो आणि बाजूला लेखन

५ ) आडवा फोटो आणि बाजूला लेखन

पाऊस सांजवेळी डोळ्यांत दाटलेला (आनंदकंद वृत्त)

लेखक कौस्तुभ भोसले यांनी रविवार, 17/05/2020 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला, वाराच काळजाच्या, ओघात साठलेला. पाळीव हस्तकांनी, मागून वार केले, त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला. माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले, त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला. प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी, रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला. आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली, झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला. -कौस्तुभ वृत्त -आनंदकंद

जातं

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 17/05/2020 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस जात्यात पडतो किंवा टाकला जातो. जातं फिरत राहतं निरंतर स्वत:च किंवा नियंत्याकडून. दोन भागांच्या मध्ये तितकीशी जागा नसते ऐसपैस आणि नसते अगदीच कमी सुद्धा. कुणी सहज सामावून जातो किंवा कुणी अडून बसतो. जातं अडत नाही, फिरत राहतं. स्थिरावलेल्यांची सोलतं कातडी आणि हिसकावून घेतं जास्तीची जागा. फटीतली जागा बदलत राहते आणि बदलतात सोबती, सुख-दु:ख दोन्हींतले. जातं तेच राहतं. मार्ग तोच राहतो पण बदलते गती. दिशा एकच असते नेहमी, वळणं ओळखीची नसतात. जात्याला असतात खाचाखोचा घडवलेल्या किंवा घडलेल्या. त्या अवघड जागा आकार देतात जीवनाला चांगला‌ किंवा वाईट, पण‌ नवा.

ब्लूबेरी ,रास्पबेरी ,ब्लॅकबेरी आणि चेरी उलटा केक

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 17/05/2020 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लूबेरी ,रास्पबेरी ,ब्लॅकबेरी आणि चेरी उलटा केक साहित्य: - वरील फळे फ्रोझन किंवा ताजी (फ्रोझन असतील तर ती तशीच वापरावी आधी फ्रीझर मधून बाहेर काढून ठेवू नयेत) १.५ कप - १.५ कप सेल्फ रेझिंग फ्लावर ( किंवा मैदा + बेकिंग सोडा+ बेकिंग पावडर ) - १२० ग्राम लोणी ( कोमट झालेले ) -२ अंडी - ३/४ कप दूध - ३/४ कप कॅस्टर शुगर कृती लोणी आणि कॅस्टर शुगर इलेकट्रीक बिटर ने फेसून घयावीत त्यात अंडी एक एक करून घालावीत .. वेग कमी करून मैदा आणि दूध हळू हळू घालावे ३० सेकंड अजून फेटावे - केक पात्रात खाली बटर पेपर घालून त्यावर थिजलेल्या बेरी पसराव्या आणि त्यावर मैद्याचे मिश्रण पसरावे १८०° अंश से .

हॅलो

लेखक मित्रहो यांनी रविवार, 17/05/2020 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
[या कथेला ग्रंथाली वाचक दिन स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला होता.] "अरे आईंचा फोन आला होता." आकाश घरी येताच आकृतीने निरोप दिला. तसे आकाश आणि आकृती एकाच कंपनीत कामाला होते पण मुलगा घरी एकटा असतो म्हणून आकृती नेहमी लवकर घरी येते. आकाशला उशीर होतो. "उशीर झाला आज" "ट्रॅफिक. एकदा चंद्रावर मनुष्यवस्ती होईल पण बंगलोरचे ट्रॅफिक सुधारणार नाही. आई काही बोलली का?" "नाही, सहजच. आल्यावर फोन कर. येवढच." "बाळूमामासाठी असेल." "कोण बाळूमामा?" "जाऊ दे ग. आई आणि तिचे नातेवाईक न संपणार प्रकरण आहे. तिकडे बुऱ्हानपुरला असतात. आजारी आहेत. वय झालेले आहे.

रुमाल

लेखक mindsriot यांनी रविवार, 17/05/2020 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
Man without handkerchief is a naked man. रुमाल, कापडाचा एक तुकडा, अनेक आकार, रंग, उपयोग. शाळेतल्या बच्चेकंपनीचे रंगीबेरंगी, छोटे छोटे, मऊमऊ, शर्टवर सेफ्टी पिनने अडकवलेले. कधीकधी आवश्यकता म्हणून तर कधीकधी त्या दाग अच्छे है सारख्या जाहिरातीतल्या पुरुषी आवाजाच्या मम्म्यांसारख आव आणण्यासाठी. जरा कळती शाळकरी मंडळी, त्याच्या/तिच्या नावाचं इंग्रजी आद्याक्षर पेनानं/एंब्रायडरी, रुमालाच्या एका कोपऱ्यावर. कधीकधी रुमालाच्या घडीत पावडर किंवा अत्तराचा शिडकावा सुगंध, मटकने, टाईमपास. काॅलेजमध्ये जाणारी मंडळी, टुकारपणा मिरवायला कुठल्याशा देशाच्या झेंड्याचा लाल-काळा, तर कुठे पुन्हा रंगीबेरंगी, छोटे छोटे, मऊमऊ.

लॉकडाऊन सुरु आहे.

लेखक श्रीकांतहरणे यांनी रविवार, 17/05/2020 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
माया सारख्या कमीत कमी नव्वद टक्के लोकांचा, वर्क फ्रॉम होम म्हजे घरून ऑफिसच काम अन घरच काम अस नवीन कार्येक्रम सुरु झाला हाय. तोसंपून, किंवा त्यातून थोडा का होईना, चोरटा वेळ काढून, जर म्या वॉट्सअँप मेसेजेस वाचला नाय, त मंग माया दिवस कामी कसा लागण भाऊ? हेच त एक सोशल मीडिया, म्या सध्या पकळून ठेवल हाय. अलग अलग ग्रुप मध्ये ही पोस्ट अलाऊड नाही, ती पोस्ट अलाऊड नाही असे म्यासेज वाचले, की कितीही होबासक्या करून, ग्रुप अडमिन (गट प्रमुख) झालेला मी मला, कायची तरी भीती वाटण ना बे! मग काय पाठवू, काय नाय पाठवू, काय वाचू, काय नाय वाचू नुस्ती मनात भीती!

अल्टर्ड कार्बन- वेबसिरीज ओळख

लेखक कपिलमुनी यांनी रविवार, 17/05/2020 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मा अमर आहे, माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आत्मा हे शरीररुपी वस्त्र सोडून नवे रूप धारण करतो असे तत्वज्ञान आपण बऱ्याच वेळी ऐकलेले असते. पण नवे शरीर असले तरी आत्मा फॉरमॅट झालेला असतो, त्यामुळे गतजन्माची काहीही आठवण नसते. ते नवा गडी नवे राज्य असा प्रकार आहे. पण ...... पण जर नवे शरीर आणि तोच आत्मा असेल तर ? अर्थात पन्नाशीचा आत्मा लहान शरिरात राहून बोअर होईल, त्यामुळे शरीर सुद्धा योग्य वयाचे हवे. त्यातही सिलेक्शन असेल तर उत्तम ! जन्मत: केआरके असेल तरी नंतर एसआरके चे शरीर मिळेल . अल्टर्ड कार्बन ही याच कल्पनेवर आधारित वेब सीरिज आहे.