ती रात्र (भयकथा)
ती रात्र (भयकथा)
ते उपनगर हळूहळू पाण्याखाली येत होते. पाच दिवसांपासून संथपणे पडणारा पाऊस, आता मुसळधार बनला होता. सगळे उपनगर पावसाने झोडपले होते. जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले होते. रस्ते, मैदाने, इमारती, महामार्ग, हमरस्ते जलमय झाले होते. पाणी रस्त्यांच्या मर्यादा ओलांडून सखल भागाकडे वळू लागले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. चहाच्या रंगाचे ते पाणी सगळ्या मैदानात साचू लागले. हळूहळू मैदाने, सखल रस्ते, खोलगट जागा, इमारतींच्या खालचे मजले, तलाव, विहिरी पाण्याखाली येऊ लागल्या. एक एका भागात पावसाचे पाणी अतिक्रमण करू लागले.
मिसळपाव