Skip to main content

केरळ कढीलिंब झिंगे

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 08/08/2020 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
केरळ कढीलिंब झिंगे खुलासा: मी यात आळस केला आहे , तयार मदर्स रेसिपी ( देसाई बंधू पुणे किंवा "परंपरा ") या नावाचा "केरळ झिन्गा फ्राय" हा तयार मसाला वापरला आहे त्यामुळे १० पैकी मला २ च गुण. हा मसाला कोरडी पुड नसून मासात तेलात घोळलेला , कांडा परतून घातलेला असा असतो त्यामुळे खरे तर त्यात इतर काहीही अधिक घालण्याची जरुरी नसते परंतु मी एक दोन फरक केले - सोललेले झिंगे ( बिनसोललेल पण जगात वापरले जातात म्हणून हा खास उल्लेख) - कांदे बटाटे, लसूण मिरची चे वाटण ( केरळात यात बटाटे वापरात नसावेत, माझी बुंदेलखंडातील पाकृ आहे असे धरा हवेतर जिथे तिथे बटाटा !) - नारळाचे दूध ( नारळाचे दूध आणि क्रीम अश्या दोन वेगळल्या गोष्टी मिळतात तुम्ही दोन्ही वापरून बघूशक्ता ) - लोणी ( केरळात यात बहुतेक तेल आणि कदाचित नारळाचे तेल वापरात असावेत!, ) - भरपूर कढ़ीलिबची पाने कृती: झिंगे थोडा लिंबाचा रस आणि हळद आणि अर्धे पाकीट तयार केरळ मसाला लावून मुरत ठेवून दयावे ( अर्धा तास, जास्त नको) लोण्यावर थोडे लसूण मिरची वाटण परतावे , त्यावर मग कढीपत्त्याची पाने चांगली परतावी आणि मग कान्दा / बटाटा - कोरडे होऊ लागण्याआधी थोडे गरम पाणी घालावे - बटाटा अर्धा शिजला कि त्यात झिंगे सोडावे - थोडे परतून त्यात उरलेला केरळी मसाला घालावा - थोडे परतून त्यात गरम पाणी घालावे आणि झाकून ५-६ मिनिटे शिजवावे, जरुरी असल्यास मीठ घालावे - वाढणे: १> आहे तसे ( तांबड्या रश्याचे) २) नारळाचे दूध घालून सोबत भात - नारळाच्या दुधात शिजवलेले भात ( आंबेमोहोर असेल तर उत्तम ) आशय वफळलेलंय भाताचा आणि झिंग्यांचा एक मस्त सुगंध स्वयंपाक ग्रेट दरवळत असतं एकादी छान शेत वारुणी ची बाटली उघडावी ( गोडसर नको)

वाचने 3589
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया