Skip to main content

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १६: तोंडी- मल्लिपट्टिणम ७४ किमी

लेखक मार्गी यांनी रविवार, 31/05/2026 21:16 या दिवशी प्रकाशित केले.

✪ समुद्र, नौका आणि मंदिरांच्या प्रदेशातील राईड 

✪ सेतूभावछत्रमच्या ऐवजी मल्लिपट्टिणममध्ये मुक्काम 

✪ दूरच्या देशबांधवांसोबत जवळची भेट 

✪ अभिमन्युजींचे नावेवरचे थरारक अनुभव 

✪ रात्रीचा मल्लिपट्टिणम बंदराचा परिसर 

✪ लाटा, समुद्राची गाज, दूरवरच्या बोटींचे दिवे आणि आकाशातले व्याध- अगस्त्य 

५वे जनरेशन वॉर, बॉट नेटवर्क्स आणि नोएडा हिंसाचार

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 31/05/2026 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
भारत जसजसा आर्थिक आणि सामरिक महाशक्ती बनत आहे, तसतसा प्रस्थापित महाशक्तींना हे सहन होणे कठीण होत आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी आता थेट युद्धाऐवजी 'फिफ्थ जनरेशन वॉरफेअर' (5GW), म्हणजेच डिजिटल, मनोवैज्ञानिक आणि सामाजिक युद्धाचा वापर सुरू झाला आहे. हे युद्ध रणभूमीवर नाही, तर मानवी मनाच्या स्क्रीनवर लढले जाते.

पाभे की बात क्र. ९

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 30/05/2026 22:43 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात क्र. ९

जनगणना २०२६-२७ साठी सरकारने साहित्य दिलंय ते बघितलं का?

टोपी लहान मुलांच्या डोक्याची, मोठ्या शिक्षकांच्या डोक्यावर बसत नाही. पिशवी पहिल्या दिवशीच चेन तुटते. शार्पनर पेन्सिलला टोक लावायच्या आतच तुटतो. पेन आणि मार्कर उठतच नाहीत.  एरीयाच्या झेरॉक्स एकच मिळेल. आपसात झेरॉक्स करून घ्या. कार्यक्षेत्र २० किमी दूर असेल. दोन क्षेत्र असेल तर त्यात ६, ८ किमी अंतर असेल. सगळं सामान अशा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं.
----------------------------------------------------------------
मितरों,

“माझ्या प्रिय देशवासीयांनो,

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १५: मंडपम- तोंडी ८४ किमी

लेखक मार्गी यांनी शनिवार, 30/05/2026 15:23 या दिवशी प्रकाशित केले.

✪ पूर्व किनारी मार्गाने प्रवास 

✪ मध्य तमिळ नाडूमधील गावं 

✪ १५ दिवसांमध्ये १३८० किमी झाले 

✪ त्सुनामीच्या वेळच्या गावांची आठवण 

✪ तमिळ नाडूमध्ये प्रजासत्ताक दिवसाचं वेगळं स्वरूप 

✪ मनाला वर्तमानामध्ये ठेवणं! 

चीन:रेशीमगाठी आणि कषायपेयाचा देश - भाग १

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 30/05/2026 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
चीन हा देश आपल्या देशासारखाच अनेक हजार वर्षांची परंपरा असलेला देश आहे . एकेकाळी या देशाची ओळख पाश्चिमात्यांना रेशीम आणि कषायपेयाचा (म्हणजेच चहाचा) देश अशी होती. ५०० वर्षांपूर्वीपर्यंत या देशातील रेशीम आणि इतर अनेक पदार्थ वाळवंट, डोंगर, दऱ्या, समुद्र अशा हजारो मैलांचा प्रवास करून युरोप खंडात पोचताना वाटेवरच्या अनेक ठिकाणच्या व्यापाऱ्यांना धनवान करत आणखी  अनेकांनाही  या व्यापारांत हजारभर वर्षे आकर्षित करत होते.

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १४: मंडपम- रामेश्वरम- धनुषकोडी- मंडपम ८६ किमी!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 29/05/2026 22:42 या दिवशी प्रकाशित केले.

✪ पहाटेचा मंडपम बंदराचा परिसर 

✪ कोस्ट गार्डसोबत काम केलेले नागराजजी 

✪ अविस्मरणीय पंबन ब्रिज- God of headwinds! 

✪ बेटावरचे प्रचंड वारे 

✪ धनुषकोडी- Ghost town of India 

✪ आरीकल मुनाई- भारताचं टोक 

✪ कोदंड रामार मंदिराकडचा थरारक प्रवास! 

✪ रामेश्वरमचं अप्रतिम मंदिर 

✪ महान शिक्षक अब्दुल कलामांचं स्मारक नमस्कार. 

पॅरिसमधील मिपाकर आणि अपरिचित पॅरिसबद्दल आगामी लेखमाला.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 29/05/2026 07:30 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मित्रहो.

नुक्ताच पॅरिसमधे दाखल झालेलो  असून यावेळी दीर्घ मुक्काम करण्याचा विचार आहे. पॅरिस शहरात किंवा आसपास थोडेतरी मिपाकर असतील असे वाटते. तुम्ही जर यापैकी असाल किंवा तुमच्या माहितीत तसे कुणी असेल तर अवश्य कळवा. 

पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच गोष्टी पटकन आठवतात. परंतु अनेक ऐतिहासिक जागा, संग्रहालये, उद्याने, लेखक - कलावंत - शास्त्रज्ञ - तत्वचिंतक, राजे-राण्या इत्यादिकांची स्मारके, इमारती, पूल, भुयारे, दफनभूमी,  ग्रंथालये अशा अनेक  रोचक गोष्टी या शहरात सर्वत्र  विखुरलेल्या आहेत. 

कोर्टशिप

लेखक आजी यांनी गुरुवार, 28/05/2026 14:00 या दिवशी प्रकाशित केले.

मी वर दिलेल्या "कोर्टशिप" या शीर्षकाचा आणि कोर्टकचेरीचा काहीही संबंध नाही, हे तुमच्या सहज लक्षात येईल. त्यासाठी तुम्ही "चाणाक्ष वाचक" वगैरे असण्याची काहीच गरज नाही. कोर्टाची पायरी चढण्याची वेळ कुणावरही न येवो, पण कोर्टशिप करण्याची संधी मात्र प्रत्येकाला मिळावी. 

 

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १३: सायलकुडी ते मंडपम ८९ किमी

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 28/05/2026 12:23 या दिवशी प्रकाशित केले.

✪ नित्यानंदमजींकडचं इडियाअप्पम! 

✪ छोट्या गावातल्या लोकांसोबत गप्पा 

✪ We meet people if we don’t get deceived by their backgrounds 

✪ तळ्यांचा प्रदेश आणि मोरांची सोबत 

✪ पावसासोबत सायकलिंगचा आनंद 

✪ मंडपमचं वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आणि प्रचंड वारे 

✪ सायकलिस्ट कथिरंगाजींच्या घरी मुक्काम नमस्कार.