Skip to main content

'मराठी बाण्या'च्या निमित्ताने....१

लेखक माझी दुनिया यांनी सोमवार, 14/01/2008 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
काल 'मराठी बाणा' पहाण्याचा योग आला. योगच म्हणायला हवा. कारण बोरिवलीत आमच्या ठाकरे नाट्यगृहात महीन्यातून ४ ते ५ वेळा हा कार्यक्रम होतो. म्हणजे साधारणत: आठवडयाला एकदा. या कार्यक्रमाच्या ऍडव्हान्स बुकिंगची सूचना २ दिवस आधीपासूनच वृत्तपत्रात झळकायला लागते. हा कार्यक्रम हाऊसफुल्ल जात असल्याने...ऍडव्हान्स बुकिंग सुरू होण्याच्या दिवशी सकाळी ८.३० ला खिडकी उघडल्यावर पहिले आपण असू याची यापुर्वी किमान ८ ते १० वेळा काळजी घेतली तरीही खिडकीवरचा माणूस खिडकी उघडल्या उघडल्या प्रयोग हाऊसफुल्ल असल्याचे सांगतो ?

शिघ्रकविता

लेखक बहुरंगी यांनी सोमवार, 14/01/2008 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेचा रचयीता(शिघ्रकवी) मी नाही, तसेच तो कोण आहे हे देखिल मला माहित नाही. चु.भु.द्या.घ्या. ... मि रानात ............... तु वनात मि वनात ............... तु झाडात मि झाडात ............... तु फ़ांद्यांत मि फ़ांद्यांत ............... तु पानांत मि पानांत ............... तु फ़ुलात मि फ़ुलात ............... तु कळ्यात मि कळ्यांत ............... तु .. . . . . . . . . . . *तु बुचकळ्यात ...* :))))))

आजच्या मुली

लेखक छत्रपति यांनी सोमवार, 14/01/2008 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
इश्श…" म्हणुन मान खाली घालतच नाहित, हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत "नविन ड्रेस का ग?" विचारले तर ह्यांना येतो संशय "नाहि रे जुनाच आहे", म्हणुन बदलतात विषय नकट्या नाकावर लटका राग दिसतच नाही हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत मी घा-या डोळ्यांचे कौतुक करावे मग तिनेही खुदकन हसावे कशाचे काय….आजकाल गालांना खळ्या कशा पडतच नाहि हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत उद्या घोड्यावर होऊन स्वार येईल एक उमदा तरूण होशिल का माझी राणी विचारेल हात हातात घेऊन गोड गॊड स्वप्ने यांना आता पडतच नाही हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत पोर लग्नाची झाली म्हणुन, घरी आई-बाप काळजीत "माझा नवरा मी कधीच शोधलाय" त्या डीक्लअर
Taxonomy upgrade extras

जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं

लेखक सनिल पांगे यांनी रविवार, 13/01/2008 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला घरं तू नीटनीटकं सजवलं होतं कुंपणा बाहेरचं जग चिखलानं बरबटलं होतं का पाहतेस स्वप्न सुखी संसाराचे कालचं माझं एकीशी नातं जुळलं होतं का निरुत्तर पत्र धाडतो मी त्या पत्यावर तीने तर केव्हांच घर बदललं होतं का स्वातंत्र्याला मी स्वातंत्र म्हणू इथे इवल्याश्या फुलांना कालचं कुणी खुडलं होतं जरा हळू बोल असं साऱ्याने बजावलं मला बजावताना ते किती मोठ्याने किंचाळलं होतं का जिवापार संभाळ केलास माझ्या हृदयाचा कालचं मी माझं शरीर भंगारात काढलं होतं का माझ्यासाठी जमलात तुम्ही स्मशानात वेड्यांनो जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं @सनिल पांगे

ओळखलं तिने मला जागच्या जागी ती स्तब्द झाली

लेखक सनिल पांगे यांनी शुक्रवार, 11/01/2008 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतास मी नदीवर जाऊन आलो डोळ्यात साठलेलं एक तळं अगदी थेंब थेंब पिळून आलो वेळ होती ती किर्र रात्रीची तरी नदीला भरती आली तिलाच कळले नाही कोणाची वेदना वरती आली बांध तोडून काठाचा ती गावभर फिरू लागली माझा शोध घेण्यासाठी हरेक घरात शिरू लागली तिला ही पहायचं होते कोणाचे इतके दु:खी घर होते मीही नित्य मिसळते सागराशी पण कुठे त्याची पातळी वर येते माझ्या घरापाशी ती येताच एक थेंब माझ्या डोळ्यातून गळाला मी वाहिलेल्या तळयातील अवशेषांशी माझा गळलेला थेंब जुळाला ओळखलं तिने मला जागच्या जागी ती स्तब्द झाली नजर माझ्याशी मिळताचं स्व:तास म्हणू लागली अभागी म्हणाली, आजवर माझा समज होता जगातली सर्वात दु:खी मीच आह

फिल्मी लफडी, कुलंगडी - अघळपघळ गप्पा!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 11/01/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मनुष्य म्हटला की त्यासोबत त्याचे गुणदोष हे आलेच. सर्वगुणसंपन्न कुणीच नसतो, तसेच सर्वस्वी दोषी, पापी, दुरचारीही कुणीच नसतो. स्त्रीपुरुष म्हटलं की त्यासोबत एकमेकांबद्दल प्रेमप्रकरणं, कुजबूज, कानगोष्टी, लफडी-कुलंगडी, या गोष्टीही येणं काही अस्वाभाविक म्हणता येणार नाही! तुम्हाआम्हाला (म्हणजे निदान मला तरी!), प्रथमपासूनच कुणाचं सूत कुणासोबत जमतंय, कुणाचं लफडं भलतंच रंगात आलं आहे, कुणाचं मेतकूट आहे, कुणाचं सध्या फाटलं आहे यासारख्या भानगडीत इंटरेस्ट अगदी चिक्कार! त्यातून आम्हा कोकणातल्या लोकांना तर यासारख्या गॉसिपिंगमध्ये भारीच रस! तर ते असो!

पुन्हा गंध आला...(गझल)

लेखक बहुरंगी यांनी शुक्रवार, 11/01/2008 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सकाळी सकाळी एक छान गझल वाचली ती तुम्हा सर्वांसाठी देत आहे .... या पूर्वी कुणी मिपा-कराने संपादित केली असल्यास कृपया पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, हि विनंति. ==================================== पुन्हा गंध आला...(गझल) पुन्हा गंध आला तुझ्या मोगर्‍याला, पुन्हा जाग आली इथे चांदण्याला... अशी रात्र जागी झाली पुन्हा की, पुन्हा जोर आला तुझ्या मागण्याला... न कळे कसा तोल गेलाच माझा, पुन्हा धुंदी आली तुझ्या वागण्याला... जरी संपलेली रात्र वादळांची, पुन्हा कोण आला तुझ्या आसर्‍याला... फूले ही पसरली शेजेवरी मी, पुन्हा अर्थ आला तुझ्या माळण्याला... मला जाणले तू असे छान राणी, पुन्ह
Taxonomy upgrade extras