Skip to main content

(अताशा कसे हे मला काव्य होते?)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 06/03/2008 03:38 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरे यांचे 'अताशा असे हे मला काय होते?' ही आमची प्रेरणा. अताशा कसे हे मला काव्य होते? कुण्या कवीच्या पाणी डोळ्यात देते बरा वागता वागता फीट येते विडंबून शब्दात ते काव्य येते जरी वाचता हा पसारा कवींचा कसा हर्षतो चोर माझ्या मनीचा असे हालते आत जोरात काही मिळे माल कच्चा तरी तो मलाही नसे ती दयाही, अनवधान नाही कसे ते विडंबू, असे भान तेही जसा चोर निघतो धनाच्या भिलाषा सगळे नकाशे, अनुमान नाही जसा ऐकू येतो कवींचा इशारा क्षणी दूर होतो मनींचा पिसारा विडंबून ज्या रोज जातो पळूनी कवींनाच त्या मागू जातो सहारा कशी ही अवस्था कवी

(नसतेस घरी तू जेव्हा )

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 06/03/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा संदिप खरे यांची अप्रतिम कविता नसतेस घरी तू जेव्हा नसतेस घरी तू जेव्हा जीव हलका हलका होतो पीण्याला जमती सारे अन्‌ एकच गलका होतो नभ फाटून वीज पडावी जल्लोश तसा मी करतो ही शुद्ध जरा क्षीण होते अन्‌ पती बोलका होतो येताच विड्या ओठांशी मी दचकून बघतो मागे खिडकीशी थांबून ओढा मग गंध तयांचा जातो तव घरात अवतरण्याच्या मज स्मरती घातकवेळा घर भरभर अवरून सगळे मी पुन्हा सात्त्विक होतो तू सांग सख्या मज काय तू केले मी नसताना ? माझा मग जीव उगाच भात्यासम धडधड करतो ना अजून झालो चालू ना ह

मन चांदण्याचे तळे

लेखक सुवर्णमयी यांनी गुरुवार, 06/03/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
मन अंधाराचा काठ मन चांदण्यांचे तळे मन आभाळ उंचसे मन धुळीची पावले मन आवर्त फिरते मन हळवे कोवळे मन एक सूर्यफूल त्याला सुखाचाच ध्यास किती सोसून झळांना होते शेवटी उदास मन बेट हे वेळूचे असे मोत्यांनी भरले परी मिटते नयन जसे फुलले फुलले मन सतारीची तार मन इवला तुषार मन कुणाला कळेना असा मोहक झंकार

(मनसुबे)

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 05/03/2008 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा पुलस्ति यांची अप्रतिम गझल मनसुबे गंध हा कसला कळेना श्वास गुदमरतोच आहे रेशमी सदरा जरी हा रोज मी धूतोच आहे मज किती हुसकावले, दुर्लक्ष केले, टाळलेही मी तरी दारी तिच्या हा नित्य घुटमळतोच आहे लपवलेले तोंड जाताना तिच्या खोलीवरी मी हाय बापाला तिच्या मम मनसुबा कळतोच आहे! नेमका आलाच तो ही आज सामोरा मला अन बोलला काहीच नाही पण मिळाली पोच आहे काल अंधारात त्याने एवढे समजावले मज कान डावा आज माझा हा जरा दुखतोच आहे! उघड रे डोळे अता तू - शुद्ध तुज असलीच जर का कोण हे कानात माझ्या आज ओरडतोच आहे? या टुकार विडंबनाची फारशी मज खंत

बसा दोस्तहो या दारूवर* बोलू काही !

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 05/03/2008 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
जरा चुकीचे, खूप बरोबर बोलू काही ! बसा दोस्तहो या दारूवर* बोलू काही ! खच्चून घुटके मद्याचे हे घेत रहा तू मिटले नाहीत डोळे तोवर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! उभाच पाहून ताठ मला कुजबुजले सारे पाठ लागू दे भूईस नंतर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! मिळेल तितके मद्य तुला तर हवेच आहे साकी लावे खिशास कातर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! उद्या-उद्याची कशास पर्वा ड्राय डे जरी खोल बुडूया! तरंगल्यावर बोलू काही बसा दोस्तहो या दारूवर बोलू काही ! `ग्लास' धरी बा डोळ्यावरती चष्मा म्हणूनी वाट आंधळी!

आमची कविता

लेखक धनंजय यांनी बुधवार, 05/03/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
स्फूर्तीस्थान अविनाश ओगले यांची अप्रतिम कविता माझी कविता आमची कविता आमची कविता इतक्या सहज भेटणार नाही तुला तुझ्या बोलण्याने तुझ्या हसण्याने फसणार नाही तुला. रोज आंगणात वाळवत असते पिळून अखंड धूणी इतक्या जवळ जाऊ नकोस ...तिचा राग सोसणार नाही तुला

माझी कविता.

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 05/03/2008 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझी कविता इतक्या सहज भेटणार नाही तुला. माझ्या बोलण्यात माझ्या हसण्यात दिसणार नाही तुला. खोल मनात जळत असते एक अखंड धूनी... इतक्या जवळ येऊ नकोस ..तिची धग सोसणार नाही तुला. -अविनाश ओगले

"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 05/03/2008 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
काय हो , तुम्ही कधी कुठल्या मुलीला "मागणी घातली " आहे का ? मागणी म्हणजे जी 'चहा-पोह्याच्या' ऑफेशियल कार्यक्रमात घालतात तसली नाही तर स्वताच काही तरी "टाका भिडवून" म्हणतो मी. कसा वाटला तो अनुभव ?

आयुर्वेद

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 05/03/2008 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात नारायणपेठेत पत्र्या मारुतीजवळ वैद्य शेंडेशास्त्रींचा दवाखाना आहे. पूर्वी तिथे मोठी शेंडी कार्यरत होती पण आता तेथे बाळासाहेब नावाची छोटी शेंडी काम करते. हे बाळासाहेब सुद्धा तेव्हढ्याच कमालीचे कुशल कारागिर आहेत. आजही ते काही नसा दाबून स्थानिक भूल न देता सहजतेने दात काढतात. पण त्यांचा भर दात न काढता शक्यतो ते टिकविण्यावर असतो. ते दर शनिवारी सकाळी १०.०० वाजता मुंबईत दादर स्थानकाबाहेर माधववाडीत येतात आणि आम्ही केवळ दातांवरच नव्हे तर सर्वच आजारांवर त्यांचा सल्ला घेतो. असो. लेखाचा मुद्दा की आयुर्वेद हे एक अजब, गुढ, गहन ज्ञान आहे. मी फार पूर्वी वाचले होते.