Skip to main content

कंदील

लेखक आंबोळी यांनी बुधवार, 09/04/2008 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण 4 वर्षापूर्वीची कथा आहे. माझे आई-वडील कोकण दर्शनला गेले होते. तीकडून येताना सावंतवाडीवरुन एक लाकडाचा नक्षीदार कंदील घेऊन आले. त्या कन्दीलात बल्ब लावायची सोय आहे. मी लगेच त्यात बल्ब लावून बघितला. सगळ्या घरातल्यानी त्या कंदिलाचे कौतुक केले. मग तो कंदील शोकेसमधे ठेऊन सगळेजण आपापल्या उद्योगाला लागले. पण दुसर्या दिवशी सकाळी आमच्या बाबांचे एक मित्र वारल्याची खबर आली. नंतर साधारण 2-3 महिने तो कंदील शोकेस मधे होता. दिवाळीच्या आगोदर 15 दिवस घरात अशी कल्पना मांडली गेली की नवीन आकाश-कंदील आणायच्या ऐवजी हाच कंदील आत लाइट लावून वापरावा.

एप्रिल फळ (३)

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 09/04/2008 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारी मीठ मेतकुट वापरुन केलीली कैर्‍यांची आंबोळी आता थोडी रस्सेदार झालेली असते.....पानापानात ती पंचपक्वनाच्या दिमाखात स्थानापन्न होते.....बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो. कैरी चे लाड इथेच संपत नाहीत.

कुमार गंधर्व जयंती - चांगला लेख

लेखक मानस यांनी बुधवार, 09/04/2008 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स - एप्रिल ८, २००८ कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले...

(...लवकर ये!)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 08/04/2008 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
कवि प्रदीप यांची सुंदर कविता '....लवकर ये' ही आमची प्रेरणा:) (ग्लासातला बर्फाचा तुकडा मदिरेला विनवतोय अशी कल्पना! म्हणजे शुध्द मराठीत 'ऑन दि रॉक्स!;) रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये ! हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये ! थंडगार एकटाच खणखणतो... देहाची वाफ किती दवडवितो... किणकिणतो, डुचमळतो अन् म्हणतो - -`सोड सोड तू बाटली; लवकर ये `! तेच भक्त; तूच मदिरा त्यांची! पेग 'विसावा' पुन्हा 'पेटली' त्यांची! ऐक जरा; ऐक आरोळी त्यांची! पेग तो आता भर...लवकर ये ! सांग त्यांना वाट किती दावू मी? का सांग; त्यांची वाट अशी लावू मी ? वाट बघत कोरडा का राहू मी ?
Taxonomy upgrade extras

असम्भव

लेखक आंबोळी यांनी मंगळवार, 08/04/2008 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
हि मालीका सुरवातीला त्यातील गूढतेमुळे बरी होती. पण आता विषय खुप ताणायला लागलेत. सासू-सुनेच्य मालिकेतील मधले २-४ भाग बुडले तरी जसा काही फरक पडत नाही तसे आता या मालिकेचे झाले आहे. त्यातील चान्गली लोके फारच बावळट आहेत. सुलेखाची आई , बाळ,शुभ्रा, प्रिया,इन्स्पेकटर भोसले, डोक्तोर , आदी,आजोबा हे एकमेकाशी या प्रोब्लेम विषयी अजिबात बोलत नाहित. (दुर्दैवाने यातले बरेचसे एकाच घरात रहातात किन्वा दिवसातून किमान एकदा तरी भेटतात.) या उलट सुलेखा लोकान्समोर रडारडी करुन त्याना सहज गन्डवते..... हे फारच बालिश आहे.

माझी फजिती....

लेखक धमाल मुलगा यांनी मंगळवार, 08/04/2008 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी ! काय मोठ्या हौसेने आलात ना वाचायला, धमाल्याची कशी फजिती झाली ते? हं...असा नाही सोडणार तुम्हाला! इथे आपण आपापली झालेली फजिती एकमेका॑ना सा॑गूया! तेव्हढीच मजा! काय? पटत॑य का? चला, सुरुवात मी करतो. इयत्ता ११वी. टवाळपणाला नुकतेच नवे धुमारे फुटलेले. सकाळी कॉलेजमध्ये गेल्यापासून एकही लेक्चर न करता, माझ्या ल॑गोटीयारसोबत आख्ख॑ कॉलेजभर ऊतमात घालत फिरत होतो. जरा क॑टाळा आला की कुठं चहाच पी, कुठं वडापाव खा असा सुखनैव दिनक्रम चालू होता. साधारणतः दुपारचे ४ - ४:३० झाले असावेत.चहाची तल्लफ आली म्हणून कॅंटीनमध्ये शिरलो.

चैत्र शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 08/04/2008 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, चैत्र शके १९३० हा महिना विविध ग्रहराशीप्रवेशांनी गाजणारा महिना आहे. मंगळ आणि राहू असे दोन तापदायक ग्रह या महिन्यात राशी बदलत आहेत. नेपच्यून कुंभेत जातोय. मिथुनेत गेले अनेक महिने ठाण मांडून बसलेला मंगळ आता कर्केत जाईल. मिथुनराशीवाल्यांनी बिचार्‍यांनी खूप सोसले आहे. खरेतर साडेसाती संपल्यावर मधुमास येतो. पण शनीमहाराज गेले तरी मंगळमहाराज मिथुन राशीत ठाण मांडून होते. त्यात ते वक्री झाले, स्तंभी झाले आणि आता ३१ जानेवारीपासून मार्गी लागले आहेत. हा कुजस्तंभ फार वाईट असतो. गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले.

मॅडोनाला हवंय भारतीय मुल - येक बातमि

लेखक शरुबाबा यांनी मंगळवार, 08/04/2008 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
'मटेरिअल गर्ल' मॅडोनाला भारताच्या संस्कृतीची भूरळ पडली आहे. तिने भारतातिल एक मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे . दुवा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2933868.cms