मनःशांती
मनःशांतीचा शोध घेत होतो
खूप दिवसांपासून
याहूवर शोधले,
रेडीफवर आलो जाऊन
विकिपिडिया पाहिले
नेट काढले गूगलून
भाषा पाहिली बदलून
चित्रेही शोधत राहिलो
शब्द झाले फिरवून
ब्लॉग्जही वाचत फिरलो
निवांत क्षणी एका
उघडले डोळे, उजळली कांती
लॅपटॉप बंद झाला
सापडली मनःशांती
भारनियमनाचा मला कळलेला
हा एकमेव फायदा
बाकी तीच महागाई, तेच राजकारण
आणि तोच कायदा
-ॐकार
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
