आत्मक्लेश४
निवार्यासाठी पावसानं
माझंच घर शोधलं,
मग स्वागतासाठी त्याच्या
मी अंथरलं पातेलं.
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.
ढगाच्या सावलीला
डोंगर समजला डाग,
पेटून उठला वणवा जेव्हां
ढग म्हणाला फुलतेय बाग.
मिसळपाव