बारा-तेरा वर्षांची ती..
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
बारा-तेरा वर्षांची ती..
============================
लयदार वळणाची, उफाड्या देहाची
यौवनानं मुसमुसलेली
तारुण्यानं सळसळणारी
बारा-तेरा वर्षांची ती..
बाल्य आणि तारुण्यामधल्या
अवघड झुल्यात हेंदकळत
पाय पोटाशीधरून बसलेली
अवखळ, निरागस भावली..!
हस म्हटलं की हसायची
नाच म्हटलं की नाचायची..
खुलवलं की फुलायची
चिडवलं की रुसायची..
नजरेत दुखरी ,शब्दात बोचरी
हसता-बोलता मध्येच थांबायची
मोजून मापून वागणारी ती
जरा प्रौढाचं वाटायची..!
तिच्यावर रोखलेल्या नजरांची
अगोचारी भोसकता झेलत
टस्स का मस्स न होता
मुर्दाडासारखी ढिम्म राहायची..
इथे कधी कशी आलीस विचारताच
चरचरत मुकीच व्हायची..जणू
चामडी रोज सोलली जाते
जीव सोलू नका! असच म्हणायची..
दुखऱ्या नजरेनं गळतागळता
दोन मोकळे श्वास मागायची..
मदत देऊ करणारी नजर मात्र
तिला तेवढंच नाकारायची.
============================
स्वाती फडणीस........................... २३-०९-२००८
वाचने
3819
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
कविता
वेगळा विषय
In reply to वेगळा विषय by धनंजय
भावली
ह्या ओळीतर खूपच आवडल्या
आभार!
कविता भावली
आभार
दाहक आणि वास्तववादी
In reply to दाहक आणि वास्तववादी by सुनील
+१
मनापासून आभार
दाहक कविता!
आभार..
आभार..