"टाईंम" साप्ताहीकातील लेख - थोडीशी वेगळ्या पण अखंड भारताची इच्छा...
टाईंम साप्ताहीकाचा संकेत स्थळावर "India's Muslims in Crisis" हा लेख वाचनात आला.
त्यात आत्ताच्या हल्ल्याचा उहापोह केला आहे. त्या प्रमाणे भारतातील मुस्लीम अल्पसंख्य समाज हा आर्थिक दृष्ट्या आणि सामाजीक दृष्ट्या मागासलेले आहेत ह्या अर्थी भाग आहे. तसेच पाकीस्तानी मुस्लीम हे झिया आणि एकंदरीतच राज्यकर्त्यांच्या कारभारामुळे मदरसांच्या हातात कसे गेले वगैरे लिहीले आहे. हे दोन्ही भाग पटणारेच आहेत. कसे ते कळत नाही पण आजही मुस्लीम समाजाला "भारतीय" समाजाचा अविभाज्य भाग करण्याची गरज आहे. किंबहूना कालच्या पेक्षा अधिक.
मिसळपाव