मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"टाईंम" साप्ताहीकातील लेख - थोडीशी वेगळ्या पण अखंड भारताची इच्छा...

विकास · · काथ्याकूट
टाईंम साप्ताहीकाचा संकेत स्थळावर "India's Muslims in Crisis" हा लेख वाचनात आला. त्यात आत्ताच्या हल्ल्याचा उहापोह केला आहे. त्या प्रमाणे भारतातील मुस्लीम अल्पसंख्य समाज हा आर्थिक दृष्ट्या आणि सामाजीक दृष्ट्या मागासलेले आहेत ह्या अर्थी भाग आहे. तसेच पाकीस्तानी मुस्लीम हे झिया आणि एकंदरीतच राज्यकर्त्यांच्या कारभारामुळे मदरसांच्या हातात कसे गेले वगैरे लिहीले आहे. हे दोन्ही भाग पटणारेच आहेत. कसे ते कळत नाही पण आजही मुस्लीम समाजाला "भारतीय" समाजाचा अविभाज्य भाग करण्याची गरज आहे. किंबहूना कालच्या पेक्षा अधिक. मात्र ते होत असताना मला वाटते त्या प्रमाणे कायद-सुव्यवस्थेचा वापर समान आणि राजकारणविरहीत होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, "जगात एका धर्मातपण लोकं सुखाने राहू शकत नाहीत... अर्थात अनेक धर्म असले म्हणून काही बिघडत नाही, कोणीही कमी नाही आणि कोणीही जास्त नाही अथवा जास्त पवित्र नाही," हे देखील समजणे महत्वाचे वाटते. असो. पण या लेखाच्या शेवटी असलेले दोन परीच्छेद मी जसेच्या तसे खाली देत आहे. जर वरच्या दुव्यावर गेलात, तर ते परीच्छेद पहाण्यासाठी तुम्हाला दुसर्‍या पानावर जायला लागेल. तर Aryn Baker हा या लेखाचा लेखक शेवटी लिहीत आहे: (डोके शांत ठेवून वाचा)
Still, many South Asian Muslims insist Islam is the one and only force that can bring the subcontinent together and return it to pre-eminence as a single whole. "We [Muslims] were the legal rulers of India, and in 1857 the British took that away from us," says Tarik Jan, a gentle-mannered scholar at Islamabad's Institute of Policy Studies. "In 1947 they should have given that back to the Muslims." Jan is no militant, but he pines for the golden era of the Mughal period in the 1700s and has a fervent desire to see India, Pakistan and Bangladesh reunited under Islamic rule. That sense of injustice is at the root of Muslim identity today. It has permeated every aspect of society and forms the basis of rising Islamic radicalism on the subcontinent. "People are hungry for justice," says Ahmed Rashid, a Pakistani journalist and author of the new book Descent into Chaos. "It is perceived to be the fundamental promise of the Koran." These twin phenomena — the longing many Muslims feel to see their religion restored as the subcontinent's core, and the marks of both piety and extremism Islam bears — reflect the lack of strong political and civic institutions in the region for people to have faith in. If the subcontinent's governments can't provide those institutions, then terrorists like the Trident's mysterious caller will continue asking questions. And providing their own answers.
तर हे वाचल्यावर आपल्याला काय वाटते? विशेष करून जेंव्हा तारीक जन जो लेखकाच्या मते मिलीटंट नाही त्याला देखील असे म्हणावेसे वाटते की, " भारत, पाक, बांग्लादेश हा इस्लामीक राजवटीखाली एकत्र येण्याची गरज आहे"

वाचन 7356 प्रतिक्रिया 0