Skip to main content

जयंती स्मरण - श्री श्री चार्ली चाप्लिन

लेखक टायबेरीअस यांनी गुरुवार, 16/04/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
१६ एप्रिल . चार्ली चाप्लिन यांची जयंती. पु. लं. चे दैवत याहून काही अधिक लिहिणे आहे काय? परंतु यानिमित्ताने चार्ली च्या कलाकृतींचा रसास्वाद मिपा वर व्हावा ही इच्छा!

अचानक पुणे-३० कट्टा

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 16/04/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या काही दिवसांपासून पुण्यनगरीत मुक्काम आहे. पुण्यात आलो तसे मिपाकर मित्रांचे फोन यायला सुरूवात झाली. "काय मग? कधी भेटताय?" "पुण्यात आलास, कळवत पण नाही. बघून घेऊ आम्ही पण." "या वेळी भेटायचंच बरं का, मागच्या वेळी टांग दिलीस." एक ना दोन. मलापण भेटायचंच होतं मिपावरच्या काही महान, थोर इ.इ. व्यक्तिमत्वांना. काल थोडा वेळ मिळाला म्हणून जरा फोनाफोनी केली दुपारी. परा, दाढे डॉक्टर आणि श्रावण मोडक एवढे मासे गळाला लागले. म्हणलं, आधी पराला भेटू. तिथून डॉक्टरकडे जाऊ आणि मग मिष्टर मोडकांना भेटू. थोडका आणि आटोपशीर कार्यक्रम ठरवून निघालो. पुण्याच्या जगप्रसिद्ध 'पुणे-३०' परिसरात पोचलो.

चैत्ररंग

लेखक स्नेहश्री यांनी गुरुवार, 16/04/2009 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्ररंग,२००९ स्थळः- गडकरी रंगायतन, ठाणे. तारिखः १८ एप्रिल २००९ वेळः ८.३० रात्रौ. कार्यक्रमः "कथक निलय" शांभवी वझे आणि समुह "सरीवर सरी: संवाद व काव्य" संदीप खरे. तिकीट विक्री: गडकरी रंगायतन, ठाणे. सर्वाना हर्दिक निमंत्रण. अधिक माहीती साठी: ९८२०४९५०८७ वा ९८२००६२१३३ संपर्क साधा.

लग्नाच्या "बाजार'गप्पा...(भाग 3)

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 16/04/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाच्या "बाजार'गप्पा...(भाग १) लग्नाच्या "बाजार'गप्पा...(भाग २) बिबवेवाडीतला पत्ता शोधत, भल्या पहाटे 11 वाजता एका "कार्यक्रमाला' गेलो जाण्याचा प्रसंग गुदरला होता. मुलगी एका संस्थेतून, कुणाच्या तरी ओळखीने सांगून आलेली. पदवीधर वगैरे असावी. (म्हणजे, आता आठवत नाही. सध्या अस्मादिकांचा "गजनी' झालाय!) फोनवरून प्राथमिक बोलणी (सॉरी..."बोलणी' नव्हे, बोलणं! "बोलणी' फक्त पैशांची असतात!) झाली होती. मी नेहमीप्रमाणे वेळेवर त्यांच्या दाराचं दार ठोठावलं.

हा कवी झाला कशाला....!

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 16/04/2009 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा खोडसाळ यांची रचना (शब्द मी आहे असा...! ) आणि प्रदीप कुलकर्णी यांची सुरेख कविता शब्द मी आहे असा....! ............................................ हा कवी झाला कशाला....! ............................................ अर्थ अमुच्या 'वाहवा'चा लावला भलताच केला! आणि हा आता बघा की, पुर्ण शेफारून गेला! हा कवी झाला कशाला, नेहमी वाटून जाते... शेवटी र्‍हासास याला याच कवितेनेच नेला! वाचकांचे या कवीने ऐकले नाही कधीही.... हा जरासुद्धा न थांबे वाटतो पुरता हटेला!

"गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 16/04/2009 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा, "गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान" (चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन) आता मुंबईहून अमेरिकेत जाणारी तिच होकाल मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते.
Taxonomy upgrade extras

फोन मेसेज

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 16/04/2009 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
फोन मेसेज !*****! अरे हलो - फोन नाहीस उचलत... म्हणजे कामात आहेस. अजून? उशीर झाला तरी जेवण गरम कर. नाहीतर खाशील तसंच नेहमीसारखा - खुडबुडीने माझी झोप मोडेल म्हणून... !*****!

निवडणूक आणि ड्राय डे

लेखक मिसळभोक्ता यांनी बुधवार, 15/04/2009 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या १६ एप्रिल. विदर्भात आणि इतरत्रही बर्‍याच मतदारसंघांत लोकसभेच्या निवडणुका आहेत. लोकशाहीमुळे जनतेला जे अधिकार मिळालेले आहेत, आणि जी कर्तव्ये हा महान देश उभा ठेवण्यासाठी जनतेला पार पाडावी लागतात, त्यातला "मतदान" हा अधिकार आणि कर्तव्य आहे. परंतु, निवडणूक आयोग, हा हिटलरच्या बापाचा अवतार आहे. टी एन शेषन पासून लोकशाहीवर गदा आणण्याचे काम निवडणूक आयोगाने केला आहे. लोकशाहीत, कुठलेही कायदे अस्तित्वात नसताना, निवडणूक आयोग दरवेळी आपली मनमानी करीत असतो.

बाललीला

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 15/04/2009 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
पोरगी सध्या तिच्या मधल्या मावशीकडे गेलेय. दोन दिवस मुक्कामाला. (आता राजा-राणीला रान मोकळं म्हणून चहाटळ कॉमेंट करू नका! रात्री साडेबाराला घरी जातोय रोज. नि सकाळी दोन तास फक्त राजा-राणीला मोकळे असतात. त्यातही स्वयंपाक, धुणीभांडी, केरवारे यातच जीव जातो. असो!) आज सहज फोन केला, तर तिच्या मावसभावाच्या उखाळ्यापाखाळ्या करत होती. ढकललं, मारलं, थुंकी उडवली वगैरे वगैरे. नेहमीचंच!