लग्नाच्या `बाजार'गप्पा (भाग १)
स्थळ ः सिंधुदुर्गातील कुडाळमधील एक छोटेखानी घर.
वेळ ः दुपारी चारची.
पात्रे ः अस्मादिक व मातुःश्री.
-----------
पार्श्वभूमी ः
कोकणातील व्यवस्थित घर, मुलगी साधीसुधी, आज्ञाधारक, गृहकृत्यदक्ष वगैरे. त्यामुळे मातुःश्रींच्या एकदम सर्वाधिक प्राधान्यातली. "नाकारण्याचा प्रश्नच नाही!' या गटातली. त्यामुळे भेटून "पारखण्यासाठी' स्वतः मातुःश्री हजर. पण मुलगी मुंबईला काही कामासाठी गेलेली. आम्ही गोव्याहून मावशीकडून थेट कुडाळात दुपारी दाखल. आमची संभाव्य सहधर्मचारिणी संध्याकाळी उशिरापर्यंत येणार, अशी अटकळ. आत्ता येईल, मग येईल, करत संध्याकाळकडे काटा सरकलेला.
मुलीच्या आई-वडिलांशी चर्चा करून, घर-बिर बघून मातुःश्री भलत्याच खूश. आता मुलगी ही रूढ अर्थाने "मुलगी' असली, झालीच पसंती, असं एकूण वातावरण. पण रत्नागिरीला रात्रीपर्यंत पोचायचं असल्याने मातुःश्रींची चुळबूळ. मग शेवटी कंटाळून, नाइलाजानं संध्याकाळच्या गाडीनं रत्नागिरीकडे रवाना. एकट्या मुलग्यावर मुलीची "पारख' करण्याची अवघड जबाबदारी सोपविण्याचा धोका पत्करून. ("धोका' अशासाठी, की धडाधड मुली नाकारण्यात पटाईत असलेला आपला "दिवटा' ही मुलगीसुद्धा कुठल्यातरी "फालतू' कारणासाठी नाकारेल, अशी शंका!)
घटना आणि घडामोडी ः मातुःश्री निघून गेल्यानंतर संभाव्य सासुरवाडीत बिच्चारा उपवर मुलगा एकटाच. मग त्याची सरबराई करण्यासाठी संभाव्य सासू-सासऱ्यांची धावपळ. शेवटी एकदा त्या बहुप्रतीक्षित मुलीचं संध्याकाळी उशिरा आगमन. एवढा वेळ ताटकळून, जिच्यासाठी वाट पाहिली, तिच्याशी भरपूर बोलण्याची अपेक्षा.
प्राथमिक औपचारिक बोलण्यानंतर चर्चेचा भर मुंबई-कोकण प्रवासातली गर्दी, रिझर्वेशन मिळण्यातल्या अडचणी, कोकणातल्या समस्या, उकाड्याचा त्रास, घुसखोरांची मुजोरी, रेल्वे स्टेशनवरच्या असुविधा इत्यादी इत्यादी. अस्मादिकांकडून मुलीला बोलण्याची, चर्चेची मोकळीक जाहीर केलेली असतानाही, तिचा भर सामाजिक समस्यांवरच.
आपला होऊ घातलेला हा नवरा पुण्यात कुठे काशी घालतो, कुठेकुठे तडमडतो, फावल्या वेळेत कुठे उकिरडे फुंकतो, कुठे शेण खायला जातो की नाही...कश्शाकश्शाची म्हणून उत्सुकता नाही पठ्ठीला! पुण्यात, कुटुंबीयांपासून लांब, होस्टेलवर एकट्या राहणाऱ्या या आपल्या संभाव्य नवरदेवामध्ये मवाली, टपोरी, दारूड्या, व्यसनी, लबाड, फसवा तरुण लपलेला नाही ना, याविषयीही (तो कोणत्याही प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार असतानाही) जाणून घेण्याची उत्सुकता नाही.
हताश होऊन मग त्याचाही मग प्राथमिक गप्पांनंतर "कटण्या'कडे भर. "नंतर कळवतो' वगैरे औपचारिक संकेतांचीही गरज नाही. सगळे "शब्दावाचून कळले सारे'च्या पातळीवरचे. रात्रीची बस पकडून मग थेट पुणे.
मातुःश्रींशी संवाद झाल्यावर "केलास ना घात!'चाच सूर. मग विसंवाद, रुसवे-फुगवे, समजूत वगैरे. काही दिवसांनी उपवर वधूच्या पित्याशी संवाद. "काय निर्णय' वगैरे. "एका भेटीत निर्णय नाही सांगता येणार,' असा अस्मादिकांचा आग्रह. त्यावर पलीकडून "तुमच्याकडून होकार असेल, तर पुढे जाऊ' अशी निर्वाणीची भाषा. ही एक गंमतच हं! म्हणजे, "होकार' आधीच ठरवून, मग एकमेकांच्या आवडीनिवडी, सूर जुळतात की नाही, वगैरे अंदाज घ्यायचा. म्हणजे निवडणुकीचा निकाल आधीच ठरवून मग प्रचारात कुठले मुद्दे मांडायचे, हे ठरवण्यासारखंच! अखेर "नाही'वर शिक्कामोर्तब.
एकूणात काय, आणखी एक निष्फळ प्रयत्न! कुडाळची अर्ध्या दिवसाची उडत-उडत सफर, एवढंच काय ते हाती!
(क्रमश:) (घ्या लेको!!)
वाचने
4133
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपला होऊ
असेच म्हणतो
In reply to आपला होऊ by अनामिक
सहमत..
In reply to असेच म्हणतो by संदीप चित्रे
गप्पा
लग्न
ते होकार
हीहीही... मस
अरे वा
मजा आली
अगदीच
मस्त रे
>>>दुसर्या
In reply to मस्त रे by परिकथेतील राजकुमार
याला म्हणतात विश्वास !!!
In reply to मस्त रे by परिकथेतील राजकुमार
लै वाईट्ट...
In reply to याला म्हणतात विश्वास !!! by संदीप चित्रे
अजुन एकटा
In reply to लै वाईट्ट... by प्राजु
अभिजीत, लेख
In reply to मस्त रे by परिकथेतील राजकुमार
वाचतो आहे