Skip to main content

लग्नाच्या "बाजार'गप्पा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 28/02/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न हा "बाजार' म्हटला जातो. मनांचं मीलन बिलन खूपच दूर राहिलं. अनेकदा फक्त महत्त्वाचा असतो व्यवहार! "देहभान' नाटकात मुक्ता बर्वे म्हणते ना..."बुद्धिमत्ता वगैरे सगळं झूट आहे. शेवटी मुलग्याचा पगार आणि मुलीचं रूप, यावरच सगळं ठरतं!' आमच्याही "लग्नावळी'च्या अनुभवातले हे काही किस्से...अर्थातच, क्रमशः! (किस्से क्रमशः लिहिले नाहीत, तर तो "मिपा'वर फाऊल धरतात!) --- "हॅलो' ""हां. बोला.'' ""मी XYZ बोलतोय. तुमच्या मुलीची माहिती वाचली होती एका लग्नसंस्थेत.'' ""बरं.'' ""माहिती आवडली होती, म्हणून भेटायचं होतं.'' ""बरं. कोणत्या संस्थेत?'' ""दडूादूीदज या.'' ""बरं. आपण काय करता?'' ""मी XYZ शिकलोय. XYZ ध्ये नोकरी करतो.'' ""अच्छा.'' ""नाव काय आपलं?'' ""XYZ'' ""अच्छा अच्छा! पण XYZ (आडनाव) म्हणजे तुम्ही कऱ्हाडे ना?'' ""हो!'' ""मग आम्हाला नकोय कऱ्हाडे स्थळ. आम्हाला मुलगा "कोकणस्थ'च हवाय.'' ""हो क्का? पण तुमच्या मुलीने तिच्या अर्जातील अपेक्षांमध्ये तसं काही लिहिलं नाहीये!'' ""असं? बरं बरं!'' ""तिनं लिहिलंय...मुलगा मनमिळाऊ, मला समजून घेणारा, मला "करिअर' करू देणारा असावा.'' ""हो. मग?'' ""खरं म्हणजे असं लिहायला हवं होतं..."मनमिळाऊ, मला समजून घेणारा, मला "करिअर' करू देणारा असा "कोकणस्थ' मुलगा हवा!'' (खास लोकाग्रहास्तव) क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4934
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

""खरं म्हणजे असं लिहायला हवं होतं..."मनमिळाऊ, मला समजून घेणारा, मला "करिअर' करू देणारा असा "कोकणस्थ' मुलगा हवा!'' आमचे तिर्थरुप हे सांगुन सांगुन थकले !!! :) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

म्हणजे मुलीकडच्यांना XYZ नको होता, तर नुसता YZ मुलगा पाहीजे होता.

In reply to by नाना बेरके

नावाप्रमाणे बेरकी आहात नाना. . .. YZ =)) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

म्हणजे मुलीकडच्यांना XYZ नको होता, तर नुसता YZ मुलगा पाहीजे होता. हे बरीक बेस बरं का नाना! तुमचे नाव `नाना फडणवीस' असे हवे होते!!!

किती छोटेखानी लेखन केले आहेस रे अभिदा ? का फोन कॉल म्हणुन ६० सेकंदात संपवलास ? बाकी लिहिले आहे छान :) अवांतर :- अजुन एक झरझरती लेखणी क्रमशः च्या भुलाव्याला भुलली... कलियुग हो कलियुग ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

लग्न हा खरच बाजार आहे. मला तर परम्परागत कांदेपोहे म्हणजे, एकादी वस्तु बघायला जातो आहे असे वाटते. तरी हल्ली ते प्रमाण कमी झाले आहे, बर्‍यापैकी समानता आली आहे. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

In reply to by सखाराम_गटणे™

बोळा निघाला की नाही रे अजून गटण्या? :)

In reply to by सखाराम_गटणे™

तरी हल्ली ते प्रमाण कमी झाले आहे कशाचे प्रमाण ? कांद्यापोह्याचे का वस्तु बघायला जायचे ? शंकासुर ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

"देहभान' नाटकात मुक्ता बर्वे म्हणते ना..."बुद्धिमत्ता वगैरे सगळं झूट आहे. शेवटी मुलग्याचा पगार आणि मुलीचं रूप, यावरच सगळं ठरतं!' +१ ... अभिराम भडकमकरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हे बरीक बेस बरं का नाना! तुमचे नाव `नाना फडणवीस' असे हवे होते!!! - नावांत काय आहे ? - मलाच "आपला नाना YZ" समजा, म्हणजे झालं.

लिही रे आणि मग क्रमश: कर... इतक्या छोट्या लेखाला पण फाउल धरतात ;) -------- पुढचे लेख वाचण्यास उत्सुक आहे

खुप सत्य परिस्थिति