Skip to main content

"आमचे ध्यान"

लेखक पर्नल नेने मराठे यांनी बुधवार, 17/06/2009 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीचे दिवस होते. हा लवकर म्हणजे ११ वाज़ता अन्घोळ करुन देवळात जातो म्हणुन नविन कपडे घालुन बाहेर पड्ला होता. आद्ल्या दिवशीच जाउन सगळी खरेदी करुन झाली होती. मी अन्घोळ करुन बाहेर आले, डस्टबिनमधे कहितरी टाकायला गेले तर एक किमतीचे लेबल दिसले, मी ते उचलुन पहिले त्यावर रु. ७५०/- लिहिले होते. मी खुप विचार केला कि खादीभान्डार मधुन ७५०/- चे तर काल काही घेतले नाही. मग ह्याचे कपाट उघडून पाहिले. तर आजच्याच तारखेचे बिल असलेली खादीभान्डारची पिशवी दिसली, आत एक सुन्द्रर झब्बा होता. काय ते लक्शात आले. हा घरी आला, मी काही न बोलता झब्बा समोर टाकला. चेहरा पाहाण्य़ासारखा झाला होता.

ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -१

लेखक दशानन यांनी बुधवार, 17/06/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कोण आपलं वाटेल व कधी कोणी आपल्या मनातील अंधा-या जागे मध्ये ज्योत घेऊन येईल हे समजणे खुपच अवघड... प्रेमाची रुपेच निराळी.. प्रत्येक नजरेने वेगळी दिसणारी... प्रेमाची अवस्थाच निराळी, प्रेम कुठे व कसे भेटेल हे त्या कामदेवाला देखील माहीत नसावे.. तो मोका साधतो व तीर चालवतो.. नजरेला नजर भिडते व प्रेम होते... ही सर्वमान्य अवस्था.. पण जगात सर्व काही एवढं सोपं नसत की दोन ओळी मध्ये कथा समाप्त... खुप संघर्ष असतो.. काही युध्द लढावी लागतात मनाशी... जनाशी.. तेव्हा कुठे यशस्वी प्रेम भेटतं.. अशीच एक छोटी कहानी... त्या दोघांची !

तू असता तर..

लेखक पद्मश्री चित्रे यांनी बुधवार, 17/06/2009 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
तू असता तर झाले असते जीवन सारे मंद सुगंधित क्षणा-क्षणाला फुलला असता ओला श्रावण नवीन धुंदीत तु असता तर झाले असते पायतळीचे काटे तृणवत उदासलेल्या धुक्यामधुनी उब तुझी ही असती घेरत तु असता तर मी ही असते- अशीच, तरीही वाटत रहाते तू नाही तर मी ही आता अशीच असते, कुठेच नसते
Taxonomy upgrade extras

शहरात लागलेली वाट

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 17/06/2009 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
धन्याशेठची 'शहरात धावणारी रानवाट' ही वेगळीच कविता वाचली, आवडली. आता वेगळं काही वाचलं, आवडलं किंवा नाही आवडलं तरी आमचं चक्र चालू होतंच त्याप्रमाणे ते झालं!

शहरात धावणारी रानवाट

लेखक धनंजय यांनी बुधवार, 17/06/2009 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
शहरात धावणारी रानवाट ------------------------- धावायचे बूट घालून टोलेजंग इमारतीतून पडतो मी लगेच बाहेर एका पायवाटेवर. उजवीकडे, डावीकडे विराट वृक्षराज ऊन झळा झाकोळतात. धसमुसळी जनावरे दृष्टीआड धावतात, धुसफुसतात, खिंकाळतात. एक खारोटी आडवी जाते. हळूहळू हलणार्‍या रंगीबेरंगी फुललेल्या मादक रानटी वासांच्या झाडीजाळीमधून वाट काढतो, न थांबता. मग अचानक थबकतो. दत्त समोर वाटेत दोन झुडपे असतात दरवळत शनेल नंबर फाइव्ह आणि ओल्ड स्पाईस. त्या अरुंद फुटपाथवर तंद्रीतच मी म्हणतो - "अहो ताई, अहो दादा - देता का जरा जागा?" -------------------------

रंग-रंगिले छैल-छबिले!!

लेखक भाग्यश्री यांनी बुधवार, 17/06/2009 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
मला व्यसन लागलंय लिहायचे.. कुठेही गेले फिरायला की डोक्यात संवाद सुरू .. अरे हे मस्त ठिकाण आहे.. लिहीता येईल याच्यावर..फोटोज काढले की हा चांगलाय.. असला मॅक्रो कोणीच काढला नसेल.. टाकूया उद्या ब्लॉग/मायबोली/मिपावर वगैरेवर.. किंवा चक्क जोक झाला तरी मला तो पटकन ब्लॉगवर टाकावासा वाटतो.. तसं प्रत्येक वेळेला करता येत नाही, आणि होत नाही तेच बरं.. नाहीतर प्रत्येक महीन्याची मे सारखी परिस्थिती व्हायची!पण काल हाईट झाली! म्हणजे खरंच हाईट.. मला मानसोपचारतद्न्याकडे जावं लागेल..

अगं अगं बशी..! - (अंतिम)

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/06/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीणींचं नशिब चांगलं .. त्यांच्यामुळे मला बस मिळायची. मी एकटी मैत्रीणींशिवाय उभी असले स्टॉपवर तर आजूबाजूच्या लोकांना माझ्यामुळे बस मिळायची नाही. आमचं वाकडंच ना!! म्हणजेच काय.. तर आम्हा दोन समांतर रेषांना जोडणारी तिसरी रेषा कंपल्सरी हवीच!! *** *** *** *** *** *** एकदा कोणीतरी सांगत होतं की, एका मुजोर कंडेक्टरने कुठल्यातरी स्टॉपवर बस खूप वेळ थांबवून ठेवली . लवकर घंटी मारेना.. त्यामुळे इंजिनियरिंगच्या मुलांनी, ती घंटीची दोरी हळूच सोडवून, पुढे पुढे सरकवत ती ओवलेली घंटी बसच्या बाहेर फेकून दिली.

पावसाला विनंती

लेखक राजा यांनी मंगळवार, 16/06/2009 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाला विनंती
अरे अरे पावसा, तू पड भसाभसा तू पड भसाभसा वेडा झाला बळी राजा नको देऊ त्याला सजा वर पहाता पहाता, जीव झाला रड्कासा तू पड भसाभसा का रुसला आम्हावरी ? तुझ्याविना कोण तारी सा~या सजिवांचा देव, तुझ्यावरच भरवसा तू पड भसाभसा पुर्वी तानसेन राग म्हणायचा धो धो पाऊस पडायचा तु नाही पडला तर, सुर गवसेल कसा तू पड भसाभसा नद्या नालेही ओसरली तळे सुध्दा खाली झाली गुरं ढोरं वेडी झाली, जसा पाण्याविणा मासा तू पड भसाभसा तुझ्या विणा शेती नाही शेती विणा काम नाही पाण्याच्या
Taxonomy upgrade extras