ब्रेथलेस
रस्त्यात अचानक खड्डा आल्यामुळे समजा आपण करकचून ब्रेक मारल्यानंतर पाठीमागचा एखादा आपल्यासारखाच मध्यमवर्गीय गाडीवाला आपल्यावर येऊन चढला असता सदर घटनेमध्ये नेमकी चूक कुणाची हे निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नसतो ह्याचं साधं कारण असं आहे की आपल्याकडे कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवताना फूटभर खोल खड्डा अकस्मातपणे समोर येतच असतो, हे जनरल नॉलेज अगदी लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडत असल्याने ते एव्हाना आपल्या एकूणच जगण्याचा भाग झालेलं असतं तरीही यामागचं खरं कारण म्हणजे जनतेचं ध्यान चालू क्षणावर तल्लखपणे टिकून रहावं ह्या उदात्त भूमिकेतून मायबाप सरकार, प्रशासन आणि कंत्राटदार वगैरे
झटपट मोदकाची आमटी
मोदकाची आमटी करण्यात माझा हात सफाईदारपणे बसला आहे .वेळेला कोणतीच भाजी नसेल तर २५-३० मिनिटांत ही आमटी तयार होते.ही आमटी खानदेशातली खासियत आहे .पण सुगरणीला कोठेही अगदी सहज शक्य आहे.
झटपट का ?
लेना होगा जनम हमें कई कई बार
वय वाढत जाते तसे काही प्रश्न हमखास विचारले जातात. त्यातून लग्नाची चाळिशी उलटून गेली असेल आणि पन्नाशी दोन तीन वर्षावर आली असेल तर तुमच्या सुखी संसाराचे रहस्य जाणून घेणे त्यांना हक्क वाटू लागतो. पण आज सकाळी __ _ते महान रहस्य सांगता येईल असा प्रश्न बायकोने विचारला. मी ८० त प्रवेश केला आणि दोन एक वर्षात लग्नही पन्नाशीचे होईल. गेली पाच सहा वर्षे रहस्य विचारले की मी हसून उत्तर टाळत होतो. माझ्या मनात बायकोबद्दल फार आदर आहे.
शब्दांची कर्णफुले
शब्दांची कर्णफुले
प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी
ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले
(मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.
पंचतत्व
पंचतत्व
अनंत आकाश पाहता
मन माझे मोठे झाले
तेच आकाश मनात कोंबले
क्षणात सुक्ष्म अती लघू झाले ||१||
विस्तीर्ण जलाशय तो सागर
त्यापुढती मी यकश्चित केवळ
नाव घडवली फळकुट घेवून
लिलया पार कराया मिळे बळ ||२||
डोंगरांचे पर्वत जाहले
लंघून जाण्या उर धपापले
विमानात मात्र बसता
गिरिशिखर भव्य भासले ||३||
संकटांची धग आली पेटून
शत्रूसमान खिंडीत गाठून
वारामागून वार करून
पराजीत केले त्यांना जिंकून ||४||
मार्ग समोरील नवीन अवघड
चरण थकले चालून चालून
उत्साहाचा झरा न थकला
ध्येय समोर आले चालून ||५||
- पाभे
२४/०९/२०२१
काव्यरस
पक्कीची पहिलीवहिली गोष्ट
गोष्ट आहे पक्कीची. आधी तुम्हाला पक्की कोण त्याची ओळख करून द्यायला पाहिजे. नाहीतर तुम्ही पण पक्कीला वेडा ठरवून त्याच्या गोष्टी वाचणार नाहीत. पक्कीची पक्की ओळख झाली की मग तुम्ही त्याचे फॅन व्हाल!
पक्की ऊर्फ पक्या ऊर्फ प्रकाश हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याचे वय किती? तो कितीवीत शिकत आहे? कुठल्या शाळेंत जातो? मला नका विचारू कारण त्याची उत्तरे मला माहीत नाहीत. कधी कधी तो इतका प्रगल्भ वागतो की त्याचे वय साठ+ असावे असे वाटावे. कधी कधी त्याच्या निरागस वागण्याने तुम्हाला वाटेल की तो पाच सहा वर्षांचा असावा. तुम्हीच ठरवा.
संभाव्याच्या अब्ज छटांतून
संभाव्याच्या अब्ज छटांतून
वर्तमान उजळतो कशाने?
कोण ठरविते? किंवा सारे,
यदृच्छयाच घडून जाते?
भूतभविष्यातील भासांचे
इंद्रजाल मायावी छेदून
काल-प्रवाहा स्तब्ध करोनी
ऐलपैल वर्तमान उरते
कालौघाची गाज अनाहत
चराचराला व्यापुनी उरते
"क्षण आत्ताचा क्षणजीवी नच"
क्षणोक्षणी वर्तमान म्हणते
काव्यरस
आजोळच्या आठवणी
खुप वर्षापुर्वीची गोष्ट, आम्ही तेव्हा अहमदनगर जिल्ह्यात एका गावात रहात होतो. माझ्या वडिलांची नोकरी तिथे होती. आमचं आजोळ चौल आणि आईच माहेर अलिबागच्या कुशीतील वरसोली. वर्षांतून एकदा मे महिन्यात शाळेच्या सुट्टीत आम्ही सगळे आजोळी जात असु, आगगाडी, लाल एष्टी असा आमचा आठ एक तासाचा प्रवास असे किंवा व्हाया मुंबई असा. मुबंईत, किंवा डोंबिवलीत एक थांबा आत्या, काकांकडे आणि मग कधी भाऊच्या धक्क्या वरून लाँच अथवा लाल एष्टी. त्यावेळी एष्टी वाटेतील सगळ्या गावात थांबे. एस्टी खचा खच प्रवाशांनी भरलेली असे. सामान, टोपल्या, माश्यांचा वास. कंडक्टर आणि प्रवाशांचा कलकलाट.
मर्कट वंश
कपिकुळाला सांगणारा तोच माझा वंश आहे,
माझ्यातही थोडासा त्या मर्कटाचा अंश आहे
संथ पाण्या पाहूनि, मोहुनि जाई कुणी,
खडे त्यात फेकण्याची का मला ही खोड आहे?
विचित्र या शब्दातही , चिवित्र काही शोधतो मी,
शोधल्यावरी सापडे काही , हे मात्र गूढ आहे
माणसे ठेवती जपूनी धीर वा गंभीर चेहरे
मुखवटयांच्या खालती त्या एक मंद स्मित आहे
तेच थोड़े ओठी येण्या, करो वाटे मग खट्याळ चाळा
खोल गेल्या वात्रटाला साद घालता मजा आहे
भली भली माणसे असती आतून व्रात्य मुलांपरी
या मुलांच्या हातावरी टाळी देण्याची खाज आहे
मी नव्हे हो त्यातला अन मी नाही त्यातली
हेच जन त्वरे उठती कड़ी लावण्या आतली
विसंगति त्यांच्या मनीची त्यांच्या पुढ
मिसळपाव