Skip to main content

चाललो मी....

लेखक स्वानंद मारुलकर यांनी बुधवार, 01/09/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
व्याकूळसे उसासे टाकीत चाललो मी आवेग आसवांनी झाकीत चाललो मी माथ्यावरील जाचे ओझे युगायुगांचे हा भार सोसवेना वाकीत चाललो मी हा देह दग्ध होतो वणव्यात अंतरीच्या वाटेवरी निखारे फेकीत चललो मी मद्यास पूर येतो डोळ्यात आज माझ्या प्याले उदासवाणे झोकीत चाललो मी नाही कुणीच आले वाटेवरी पुसाया का कोरडे खुलासे ऐकीत चाललो मी ? हा क्रूर जीवघेणा रस्ता मला हवासा होऊन पूर्ण त्याच्या अंकीत चाललो मी -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/
काव्यरस

रान संपत्ती

लेखक जागु यांनी बुधवार, 01/09/2010 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
पावसांच्या सरी चालू झाल्या की निसर्ग आपली ही संपत्ती उधळायला सुरुवात करतो. त्या संपत्तीपैकीच ही काही रान फुले व झाडे. निसर्गाकडू आपल्याला ही संपत्ती विनामुल्य, विनाकष्ट मिळत असते. ही छोटी मोठी रानफुले, झाडे आपल्या नजरेला, मनाला अगदी गारवा देउन जातात. मनाचा, शरीराचा थकवा ह्यांच्या सहवासाने कुठे दुर पळतो त्याचा पत्ता लागत नाही. फक्त आपण त्यांच्याकडे डोळसपणे पाहील पाहीजे. निसर्गाने दिलेल्या ह्या संपत्तीची नजरेने लूट करुन पहा.

लव्ह युवर जॉब. डु यु?

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 01/09/2010 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आजकालच्या शक्यतो तरुण मंडळींच्या गप्पांमधे एक सर्रास आढळणारा विषय. आमीर खानच्या थ्री ईडीयट्स मधे सुद्धा हाच संदेश दिला आहे. जे आवडते ते मन लावुन करा, यशस्वी आणि आनंदी व्हाल. उगाच पैसे कमवायचे म्हणुन एखादे काम करु नका, त्यातुन पैसा मिळेल पण जीवनाचा आनंद नाही. ह्या विषयावर मी/तुम्ही सुद्धा कित्येक जणांशी चर्चा केली असेल. पण याच खरं उत्तर एखादा सामान्यवर्गीय (सामान्यवर्गीयांची व्याख्या व्यक्तीसापेक्ष) देऊ शकेल?

सही

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 01/09/2010 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यात न्हालेलं ते रंगमंदिर आणि तो पूर्ण चंद्र अत्तराचा सुवास फुलांचे रंग नि सनईचे सूर मंद्र शिफॉन साड्या मलमली कुर्ते अभिजनांची गर्दी तिला पाहायला आलेले प्रेक्षक चाहते आणि दर्दी कोपर्‍यात तो उभा गुलाबांतल्या निवडुंगासारखा दखल घ्यायला अपात्र नि एका नजरेसही पारखा हातात एक पत्र अन् प्रतीक्षा त्या स्वप्नसुंदरीची जरी स्थिर उभा तरी उघड व्याकुळता अंतरीची स्मरतील का तिला दिवस मुग्ध किशोरवयातले तासनतास गप्पा ती गाणी ते क्षण पावसातले जरी आज ती श्रीमती अन् विख्यात अभिनेत्री जपली असेल का तिने ती बालपणीची मैत्री 'आल्या आल्या'चा गलका अन चाहत्यांचा गराडा धावला तोही ओढीने आणि घुसला तोडून वेढा उभा क्षणभ
काव्यरस

कोर्टावरील ताण कमी करण्यासाठी - ’प्रत्येक विलंबासाठी तात्काळ भरपाई’

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 01/09/2010 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील न्यायव्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी खटल्यांचे अनावश्यक रेंगाळणे कमी करता आले तर लोकांचा न्यायव्यवस्थे वरील विश्वास वाढण्यास मदत होईल. हे कसे करता येईल याचा विचार गेले कित्येक दिवस माझ्या डोक्यात रेगांळत आहेत. भारताबाहेर प्रगत देशांमध्ये हे रेंगाळणे किती प्रमाणात आहे याची मला कल्पना नाही. न्यायव्यवस्था सर्वात संथपणे नव्या पद्धती, तंत्रे यांचा स्वीकार करते असे माझे निरिक्षण आहे. या विषयावर जेव्हा सार्वजनिक चर्चा होते तेव्हा फक्त वकीलांच्या नैतिकतेला आवाहन केले जाते ( जे सर्वार्थाने निरर्थक असते ). जनतेच्या दबावाशिवाय यात कोणतीही सुधारणा होईल असे वाटत नाही.

कॉफी केक

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 01/09/2010 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २५० ग्राम बटर/मार्गारिन २०० ग्राम साखर ४ अंडी १५० ग्राम मैदा + १५० ग्राम स्पाइझं स्टेर्क/ आरारुट ३ चमचे बेकिंग पावडर १ चमचा वॅनिला अर्क ४ चहाचे चमचे कॉफी २ चहाचे चमचे कोको २ चमचे रम (ऑप्शनल) २ मोठे चमचे दूध गार्निशिंगसाठी २ चमचे किसलेले व्हाइट चॉकलेट हँडमिक्सी, केकमोल्ड व अवन कृती- बटर फेटून घेणे, साखर घालून भरपूर फेटणे. अंडी घालून भरपूर फेटणे.

प्रिय राहूल देशपांडे,

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 01/09/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय राहुल देशपांडे, (केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद, मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही.

काही बाही - २

लेखक अवलिया यांनी बुधवार, 01/09/2010 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ एकदा वाचुन झाल्यावर कधीही कुठुनही वाचता येतो, त्यातील कुठलेही पान काढून वाचता येते, त्यावर मनन वा चिंतन करता येते असा ग्रंथ म्हणजे दासबोध. दासबोधातील मराठी खुपच सुलभ आहे. फार कमी ठिकाणी शब्दकोशाचे सहाय्य घ्यावे लागते. रोजच्या जीवनातील घटनांमधे प्रचिती येणारे रोकडे पुस्तक असं म्हटलं तरी चालेल. ब्रह्मचारी माणसाने प्रापंचिक माणसाला केलेला उपदेश असला तरी समर्थांच्या तळागाळातील लोकांना असलेल्या समस्यांचे भान थक्क करुन सोडते. पहिल्याच दशकातील पहिला समास. ग्रंथारंभलक्षण.