Skip to main content

केळ्याच्या पूर्‍या

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 03/04/2013 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी झाल काय की सहज फिरायला म्हणुन २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात आलो होतो. आता सहकुटुंब अस बाहेर फिरणं काही सोप्प नसत हो. त्यात मुलबाळं बरोबर. मग अस फिरताना बरोबर थोडी फळ ठेवणं साहजिकच आहे नाहे का? तर ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टला मी अशीच एका सुपर मार्केट मध्ये शिरले. कुठं काय, कुठं काय, घेत घेत, आपल नेहमीचं, "गरिबांच फळ" केळी उचलली. आता केळी घेताना आपण ती कायमच घडाने घेतो ना? निदान डझनावर तरी! तशीच आपली उचलली अन चालले कॅश काउंटरकडे . तिथल्या एका हेल्परने मला मध्येच हटकलं अन विचारल, " हे! बाइंग सो मेनी बनानाज? हॅव यु चेक्ड द प्राइस?" च्यामारी! मी मनातल्या मनात त्याच्या सात पिढ्या उद्धरल्या.

अ‍ॅन्ड्रोईड: संस्थापक आणि स्थापना

लेखक लंबूटांग यांनी बुधवार, 03/04/2013 04:00 या दिवशी प्रकाशित केले.
टीपः माझा विडंबनाशिवाय काहीही लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सुधारणा अवश्य सुचवा. २००३ च्या शेवटी शेवटी असाच एक दिवस. स्टीव्ह पर्लमन -एक हुशार, यशस्वी अभियंता आणि भांडवल पुरवठा/ गुंतवणूकदार - याचा दूरध्वनी खणखणला, पलीकडे होता जुना मित्र आणि सहकारी अ‍ॅन्डी रुबीन जो तिथून जवळच्याच एका भाड्याच्या जागेत आपली कंपनी चालवत होता. अ‍ॅन्डी: मी कफल्लक झालोय, पैशाची गरज आहे. स्टीव्ह: कधी पाहिजेत? अ‍ॅन्डी: आत्ताच्या आत्ता! स्टीव्हने जवळच्याच बँकेत जाऊन १०० डॉलरच्या १०० नोटा काढल्या. ते १०,००० डॉलर एका साध्या पाकिटात घालून तो अ‍ॅन्डीच्या ऑफिसात गेला आणि त्याच्या टेबलावर ते पाकीट ठेवले.

गालिर्क सुप इन ब्रेड बाउल

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 03/04/2013 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
सहित्यः राऊंड ब्रेड - १ लसुण पाकळ्या - ८-१० बटाटा - १ चिकन स्टॉक - ३ कप ब्रेड स्लाईस - २ काळि मिरी पावडर - १/२ चमचा बेसिल - १/४ चमचा ओरेगानो - १/४ चमचा चीज - २ चमचे बटर - २ चमचे मिठ चवीनुसार कृती: १. लसुण पाकळ्या सोलुन बारीक चिरुन घ्याव्या. बटाट्याचे देखिल काप करुन घ्यावेत. २. कढईत butter गरम करावे. त्यात चिरलेला लसुण व बटाटा टाकुन परतुन घ्यावे. ३. ते थोडे परतल्यावर त्यात चिकन स्टॉक टाकुन, १०-१५ मिनिटे किंवा बटाटे शिजे पर्यंत सुप उकळु द्यावे. ४. सुपला उकळी आल्यावर त्यात २ ब्रेडच्या स्लाईसचे तुकडे करुन टाकावेत. ५.

नोव्हार्टीस - संशोधन आणि अनुकरण

लेखक विकास यांनी बुधवार, 03/04/2013 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या सुप्रिम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. खटला होता तो नोव्हार्टीस ही नवीन औषधे तयार करणारी कंपनी, त्यांनी लावलेल्या एका महत्वाच्या औषधाचे पेटंट आणि त्याचे भारतात चालू असलेले अनुकरण. वरकरणी विषय कुठल्याही बाजूने सोपा वाटू शकतो, पण तितका तो सोपा नाही असे वाटते. तर झाले असे: ९० च्या दशकात (९३ साली) नोव्हार्टीस या स्विस कंपनीने ल्युकेमियाच्या विशिष्ठ प्रकारांवर चमत्कार वाटावा असा उपाय ठरणारे औषध शोधून काढले. त्याला जगभरातून पेटंट मिळाले. भारतात २००५ साला पर्यंत औषधांसाठी पेंटंट हा प्रकारच नव्हता. २००५ साली भारताने तसे पेटंट देणे मान्य केले पण ते केवळ १९९५ सालानंतरच्या औषधांसाठीच.

दुष्काळावर मात

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 02/04/2013 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळावर मात असेच एक गाव होते. त्या गावाजवळून जाणारा एक नदी होती. नदीकाठी मोठ्ठी आंबराई होती. आंब्यांच्या मोसमात त्या आंब्यांच्या झाडांना रसदार आंबे येत. त्या आंबेराईमुळेच त्या गावाचे नाव आंबेवन पडले होते. ती आंब्याची बाग कुणा एकाची नव्हती. ती त्या गावच्या मालकीची होती. संपुर्ण गाव त्या आंबेराईचे मालक होते. गावची पंचायत त्या झाडांची निगा राखे. पंचायतीने गावातल्या प्रत्येक घरातल्या स्त्री किंवा पुरूषाला कामे नेमून दिली होती.

डॉ खरे आणि माझे जुनेच कन्फ्युजन

लेखक मन यांनी मंगळवार, 02/04/2013 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. खरे ह्यांचे मिसळपावावरील लिखाण वाचून पदवीदरम्यान असलेल्या principles of ethics and cyber laws ह्या विषयाची आठवण झाली. त्यात चित्रविचित्र किस्से, निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न असत. त्यातली आमची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलत. आम्ही उत्तरे काहीही दिली तरी चालत; पण योग्य ते जस्टिफिकेशन आम्हाला देता येते आहे की नाही; हे पाहिले जात.(वाद विवाद स्पर्धेप्रमाणे; कुठलीही बाजू मांडा; बक्षीस मिळू शकेल; पण तुमचा त्यातला अभ्यास दिसायला हवा.) . त्यासंदर्भात टेक्स्टबुक बाह्य वाचन करताना पडलेला प्रश्न. "ग्रामर्थं कुटुंबम् त्यजेत् | राष्ट्रार्थम् ग्रामम् त्यजेत ||" असे म्हणे चाणक्य म्हणून गेलाय.

सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २--पुढे

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 02/04/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
त्या स्त्रीला ३/४ (तीन चतुर्थांश) योनी नव्हतीच. त्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे चालू होते हे त्या स्त्रीला विचारले तर ती म्हणाली व्यवस्थित चालू आहे. त्या नवर्याला सम्भोगाबद्दल अज्ञान असावे किंवा ती स्त्री खोटे बोलत होती. त्या स्त्री कडून हे तत्वज्ञान ऐकून घेतले माझा रिपोर्ट लिहिला आणी तिच्या हातात ठेवला. दार उघडले तर तिचा नवरा बाहेर उभा होता आणि त्याने लगेच विचारले कि साहेब मुल होईल ना? त्या गरीब माणसाकडे पाहून मला कसेसेच झाले. त्याची दुहेरी फसवणूक झाली होती आणि त्यातून त्याला तुला मुल होणे फार कठीण आहे हे सांगण्याचा मला तेंव्हा तरी धीर झाला नाही.

शोध....... माझा

लेखक ढंप्या यांनी मंगळवार, 02/04/2013 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळीनो, हा माझा मिपावर टंकण्याचा पहीलाच प्रयत्न आहे..... गोड मानून घ्या एवढीच विनंती.... हा रस्ता दूर जातसे, परत न येण्यासाठी...... सोबतीला कोणी नसे, साथ देण्यासाठी...... पण, मला चालावेच लागणार, काहीतरी शोधण्यासाठी...... मनात आहेत दुर्दम्य आकांक्षा, माझ्यातल्या मी साठी...... कोणी साथ द्या, अगर नका देउ...... मला चालावेच लागणार, काहीतरी शोधण्यासाठी...... माझ्यातल्या मी साठी......

संकल्प

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 02/04/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यु हा अंतिम नाही ,नंतरही करता येते बरेच काही, करोनी डोळे दान अंधांची वाढवावी शान, कुणा द्यावे चाम ,जळलेल्या चे होईल काम, किडनी द्यावी कुणा,आयुष्य जगेल दुणा, दान करोनी वेगवेगळे भाग,वाचवावे जिवलग, करोनी शरीर दान मेल्यावरही व्हावे महान , करा मनाचा कायाकल्प ,धरा मनी देह दाना चा संकल्प.
काव्यरस

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.