Skip to main content

काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 20/07/2013 18:20 या दिवशी प्रकाशित केले.

नार्सिससचा स्वप्नदोष

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 20/07/2013 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काचेच्या भांड्यातल्या गोल्डफिशसारखा विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात अन् तापलेल्या सूर्याच्या तोंडावर मिटून कवाडं प्रतिबिंब पाहतो काचेत अ‍ॅनिमिक प्रकाशात बांधलेल्या आखीव मॅग्नेटिक रस्त्यांवर गुळगुळीत मॅगलेव्हने जाताना भर वेगात ऑटोपायलटवर टाकलेल्या आयुष्याला रस्ता सोडून जायचं येतच नाही मनात क्षणात रंग बदलणार्‍या बत्तीस बिटी भिंती अन् आकार बदलत्या नॅनो फर्निचरच्या गराड्यात कंटाळा भरून राहिलेला असतो मख्खपणे त्याच्या वेल इंजिनिअर्ड पिळदार शरीरात चौघांचं चौकोनी चतुरस्र कायदेशीर कुटुंब पसरलेलं जगभर ताणून एकेका कोपर्‍यात स्वतंत्र, स्वतःचा असतो तो संपूर्णपणे यंत्रांच्या आधाराने या एकविसाव्या श
काव्यरस

कविता, मीटर आणि मी

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 20/07/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी कोणी पाहुणे आल्या वर त्यांना अत्यंत आनंद होतो. हा आनंद पाहुणे आल्याचा की कविता ऐकायला एक बऱ्या पैकी बकरा सापडला याचा हे अद्यापही कळले नाही. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मला ही ‘आनंद’ झाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला, आजकाल आमी बी कविता करू लागलोआहे, असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर?

हायकू -

लेखक विदेश यांनी शनिवार, 20/07/2013 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
१) लहरी वारा पानांची सळसळ सशाचा छळ २) ढगांची हूल पावसाची चाहूल भुई निष्प्राण ३) वाऱ्याची गती निसर्गाची संगती मन बेभान ४ ) पाऊस गाणी धरतीची कहाणी ऐकते बीज ५) कावळा पाही चिमणीचं सदन खुनशी मन .
काव्यरस

दुनियादारी

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 20/07/2013 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
७०च्या दशकातला काळ.. स.प. महाविद्यालयाचा 'कट्टा', (कु?)प्रसिध्द कट्टा गँग, अतिशय जिवंत वाटाव्या अशा व्यक्तिरेखा, वेगवान, साचेबध्द कथा... सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' प्रचंड गाजली नसती तरच नवल होतं. वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या या दुनियादारीवर येऊ घातलेला चित्रपट, संजय जाधव सारखा दिग्दर्शक, झी ने केलेलं जोरदार प्रमोशन, यामुळे प्रचंड उत्सुकता असणं व त्याकडून प्रचंड अपेक्षा असणं हेही ओघानी आलंच. पण अशा अतिशय गाजलेल्या कलाकृतींना नीट प्रामाणीकपणे न हाताळल्यास चित्रपट किती फसू शकतो याची उदाहरणंही अगदी ताजीच आहेत (म्हैस, गोळाबेरीज, इत्या.).

अलिबाबा चाळीस चोर लेटेस्ट व्हर्जन !

लेखक चाफा यांनी शनिवार, 20/07/2013 02:19 या दिवशी प्रकाशित केले.
जुनी उचकापाचक करताना ही एक उचापत सापडली.. ********* ( फार पुढे कधीतरी भविष्यात मुलं आपल्या जुन्या इसापनीती, सिंदबादच्या सफरी, अरेबीयन नाइट्स चुकून कधी वाचतील तर त्यातून ते त्यांच्या मनासारखा अर्थ लावत जातील आणि मग काहीसं असं होईल ) कालच एक गोष्ट वाचली ओल्डेस्ट स्टोरी डॉट कॉम वर 'आलिबाबा आणि चाळीस चोर' एका गावात एक अलीबाबा राहत असतो खूपच गरीब असतो तो साधा नोकिया सी फाईव्ह नसतो त्याच्याकडे. तो रोज गाढवं घेऊन बाहेर जायचा, गाढव हा शब्द मी आजोबांकडून खूप वेळा ऐकलाय पण त्याचा फोटो काल पाहिला सेम आयशर गाडीवर लोगो असतो ना!

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०४ : आफ्रिकेतल्या सफरी आणि आफ्रिकेबाहेरचे पहिले पाऊल (२ लाख ते १३५,००० वर्षांपूर्वी)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 20/07/2013 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

अवनी

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 19/07/2013 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
भिजल्या उरात जखमा सजले नवीन गाणे वारा उतून वाहे गुंफीत गूढ कवने ओटीत सांडले जे अस्पर्श स्पर्श लेणे फुलल्या सयी पुन्हा त्या झाले सुरेल जगणे अंकूर सुप्ततेचे बिलगूनसे अडाणे वेडात धुंदलेले नि:शब्द मन शहाणे आजन्म भुक्त जैसी आसक्त ओल माती ओढाळल्या गतांचे शब्दाविना तराणे पवनासवे वराती मेघात सकल पाणी सहवास लाघवाचा स्वच्छंद मूक वाणी सुखनैव वेदनांची गर्भारली विराणी अवनीच की जणू ही दूजी नसे कहाणी ........................अज्ञात
काव्यरस