मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अलिबाबा चाळीस चोर लेटेस्ट व्हर्जन !

चाफा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जुनी उचकापाचक करताना ही एक उचापत सापडली.. ********* ( फार पुढे कधीतरी भविष्यात मुलं आपल्या जुन्या इसापनीती, सिंदबादच्या सफरी, अरेबीयन नाइट्स चुकून कधी वाचतील तर त्यातून ते त्यांच्या मनासारखा अर्थ लावत जातील आणि मग काहीसं असं होईल ) कालच एक गोष्ट वाचली ओल्डेस्ट स्टोरी डॉट कॉम वर 'आलिबाबा आणि चाळीस चोर' एका गावात एक अलीबाबा राहत असतो खूपच गरीब असतो तो साधा नोकिया सी फाईव्ह नसतो त्याच्याकडे. तो रोज गाढवं घेऊन बाहेर जायचा, गाढव हा शब्द मी आजोबांकडून खूप वेळा ऐकलाय पण त्याचा फोटो काल पाहिला सेम आयशर गाडीवर लोगो असतो ना! तसा दिसतो तर हा अलीबाबा एक दिवस असाच बाहेर पायी जात असतो, काय करणार गरीब असतो ना तो! त्याच्याकडे कुठून येणार एखादी मर्स? तर तो जात असताना त्याला घोड्याच्या थापांचा आवाज येतो, घोडे थापा का मारत असतात हे काही त्या पुस्तकात दिलं नव्हतं. घोडे थापा मारताना ऐकतो म्हणून तो लपून पाहतो तर समोर काय? तर चाळीस चोर म्हणजे थीव्ह्ज असतात ते थीव्ह्ज पण बहुतेक गरीब असतात कारण त्यांना लोकांकडे जाऊन चोरी करायला लागते नुसता पासवर्ड क्रॅक करून चोरी करायला त्यांच्याकडे लॅपटॉपच नसतात. त्यांचा एक हेड असतो, तो एका डोंगरासमोर उभा राहून म्हणतो 'तिळा तिळा दार उघड' त्यानं व्हाईसकमांड दिलेली असते त्यामुळे दरवाजा उघडतो आणि चोर आत जातात. इकडे अलीबाबानं नेमका तो पासवर्ड हॅक केलेला असतो, जसे चोर बाहेर जातात तसा तो त्या डोंगरासमोर उभं राहून म्हणतो 'तिळा तिळा दार उघड' आणि दार उघडतं बहुतेक एक्सक्युझीव्ह व्हाईस पासवर्ड नसतो तो. अलीबाबा आत जातो आणि पाहतो तर काय? आत सगळीकडे सोनं चांदी असते, बहुतेक त्या चोरांची मायक्रोचीप बनवायची कंपनी असावी हिरे असतात. अलीबाबा त्यातलं जमेल तितकं घेतो आणि घरी जातो. घरी आल्यावर त्याला ते सोनं मोजायचं असतं पण तो पडला गरीब त्याच्याकडे काउंटींग मशीन कुठे असणार? मग तो आपल्या भावाकडे ते मागतो त्याला ते लोक माप असंच काहीसं म्हणतात. त्याचा भाऊही फारसा श्रीमंत नसतो कारण त्याच्याकडेही मोबाईल नसतोच पण तो ते मशीन देतो पण काहीतरी चलाखी करून तो अलीबाबाकडे खूप सोनं असल्याची माहिती मिळवतो, बहुतेक त्या माप नावाच्या मशीन मध्ये हिडन कॅमेरा असावा. तर तो भाऊ अलीबाबाला सोनं मिळवायची जागा विचारतो आणि तिकडे जातो. आत जाताना पासवर्ड बरोबर देतो पण बाहेर येताना नेमका विसरतो आणि चुकीचा पासवर्ड दिल्यानं बहुतेक तिथला अलार्म ट्रिगर होतो. अलीबाबाचा हा भाऊ रोबोट असल्याचं आधी लिहिलेलं नाही पण मग सगळे चोर येतात आणि त्याला डिसमेंटल करतात तेव्हा ते लक्षात येतं. मग अलीबाबा येतो आणि दोन्ही वेळेस बरोब्बर पासवर्ड देऊन त्याचे सगळे पार्ट घरी नेऊन जोडतो पण बहुतेक त्याच्या भावाची हार्डडीस्क खराब झालेली असते म्हणून तो त्याला लगेच स्क्रॅप करून टाकतो. हे सगळं त्या चोरांना कळतं आणि मग त्यांचा सरदार आपल्या चाळीस चोरांना अलीबाबाला शोधायला पाठवतो, ते त्याला शोधतात आणि त्याच्या घरावर मार्किंग करून येतात पण नेमकं त्याच्या घरावरच्या सिक्युरिटी कॅमेऱ्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि त्यांनी केलेलं मार्किंग अलीबाबाच्या मेडला मर्जिनाला दिसतं. मर्जिना सगळ्याच घरांवर सेम मार्किंग करते. तिच्याकडेही बहुतेक बारकोड मार्कर असतो. मग चोरांचा सरदार चिडतो आणि सगळ्या चोरांना झीप करून एक एक बुधले नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये अटॅच करून अलीबाबाच्या घरी पाठवतो आणि स्वतः: अरब म्हणून जातो, म्हणजे तिथे तेलाचा होलसेल डीलर लिहिलेय पण हे होलसेल ऑइल फक्त यु ए ई मध्येच मिळतं म्हणून मी सोपं करून सांगितलं. पण अलीबाबाची मेड मर्जिना असते हुश्शार तिला या अटॅचमेंटचा संशय येतो म्हणून ती बहुतेक अँटीव्हायरसने स्कॅनिंग करते, तर तिला सरदाराने पाठवलेले सगळे चाळीस व्हायरस सापडतात. पण एक अटॅचमेंट सेफ असते म्हणून ती ओपन करून ती त्यातलं तेल आपल्या अकाउंटला ट्रान्स्फर करून घेते आणि मग उकळतं तेल नावाचा अँटीव्हायरस सगळ्या अटॅचमेंटना वापरून ती ते सगळे चाळीस व्हायरस डिलिट करून टाकते. इकडे सरदार अलीबाबाला नुकसान करणार असं दिसताच ती त्या सरदाराचंही अकाउंट कायमचं डिलीट करून टाकते. मग अलीबाबा आणि मर्जिना कायम रिलेशनशिपमध्ये राहतात.

वाचने 4268 वाचनखूण प्रतिक्रिया 18

'.....लेटेस्ट व्हर्जीन.' शिर्षक वाचून जरा जिभल्याचाटत धागा उघडला पण 'तसं' कांही न आढळल्याने निराशा झाली. हल्लीच्या 'अरूण' पिढीला सांगण्यासाठी गोष्ट चांगली आहे.

स्रुजा 20/07/2013 - 04:54
तर तो जात असताना त्याला घोड्याच्या थापांचा आवाज येतो, घोडे थापा का मारत असतात हे काही त्या पुस्तकात दिलं नव्हतं. :) :) :) मजा आली वाचताना..

निवांत पोपट 20/07/2013 - 10:44
आबडलं.एकदम धमाल आहे.पण एक शंका आहे. पण चोर अलिबाबाचे घर कसे शोधतात ते नाही लिहिलंत ?गुगल मॅपच्या सहाय्याने? की त्या मुस्तफाकडे G.P.S नेव्हिगेटर सारखं काही काही असतं? ;)

तिमा 20/07/2013 - 13:11
पण काही कच्चे दुवे वाटले. उदा. अलिबाबा गरीब असतो तर त्या मेडकडे अँटीव्हायरस कुठून आलं ? अजून कल्पनाविस्तार व्हावा. अलिबाबाशी लिव इन रिलेशनशिप होईपर्यंत ती मेडही व्हर्जिनच असावी.

मी-सौरभ 20/07/2013 - 15:51
मला ही लॅटेस्ट कथा आवडली अन नस्त्या शंका काढायची गरजही वाटली नाही ;)

विजुभाऊ 20/07/2013 - 20:26
ही लेटेष्ट कथा लैच्च भारी. मज्जा आली. अलीबाबाला हिंदी चित्रपटानी इतकी वर्शन्स दिली आहेत की हे आणखी एक वर्शन चालून जाईल. इंअ‍ॅजीन करा. अक्शय कुमार अ‍ॅज अलीबाबा / कॅतरीना अ‍ॅज मर्जीना / परेश रावळ अ‍ॅज चोरांचा बॉस. हीमेस रेसमिया गातोय..." ज्जा ज्जा ज्जा कुलजा रे ज्जा ज्जा ज्जा खुलजारे खुलजारे खुलजारे सिमसिम अलीबाबाच्या भावाला एह गाणे नाकात न गाता आल्याने तो गुहेत अडकतो. अलीबाबाचा अड्डा तिथे एक आयटम सोंग.

In reply to by बॅटमॅन

रमताराम 22/07/2013 - 13:54
सौथ आफ्रिकेतले शिकरण फारच खंग्री असावे असा एक अंदाज वर्तविल्या गेला आहे.>> _/\_ बॅट्या लेका मारशिला की रं. हापिसातून लागिन न करण्याचा नियम मोडून पेश्शल दाद दिल्या गेली आहे.

कवितानागेश 20/07/2013 - 20:57
आत सगळीकडे सोनं चांदी असते, बहुतेक त्या चोरांची मायक्रोचीप बनवायची कंपनी असावी>> हे भारी आहे! :)

In reply to by आतिवास

अभ्या.. 21/07/2013 - 01:35
हम्म. होऊ शकेल. अलिबाबा अन सरदार ऑनलाईन गेमिंगमधून हे सगळं करतात असही दाखवता येईल. नाहीतर ते चोरं झिप होऊनच येतात ना. आणि व्हीएफएक्स करायला बराच वाव आहे.