Skip to main content

लोकशाहीचा अभंग

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 14/08/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.

लोकशाहीचा अभंग

आपुलिया हिता । असे जो जागता ।
फक्त त्याची माता । लोकशाही ॥

कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र ।
वटारते नेत्र । लोकशाही ॥

पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥

संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे ।
ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥

मिळवुनी माया । जमविती धाक ।
त्यांची घेते हाक । लोकशाही ॥

वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
तालावरी नाचे । लोकशाही ॥

सत्तापिपासूंच्या । द्वारी मटकते ।
काव्यरस

'दु:स्वास'

लेखक psajid यांनी बुधवार, 14/08/2013 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
रंग उमलत्या मनकळीवर दारिद्र्याचा ठसा उमटतो, अळणी जीवन काय कामाचे सावलीकडूनही 'दु:स्वास' होतो !! मोहोरभरल्या अम्राला वाटसरुही पाईक होतो, भार ओसरता मग भूमीला पोटातील मुळ्यांचा 'त्रास' होतो !! उमंग , इर्षा , धडपड पाहता त्याचा सन्मान 'खास' होतो, थकून डोळ्यावर हात घेता आंबल्या स्वप्नांचा 'वास' येतो !! कूजट कुबट दारिद्र पाहून तापला जीव कासावीस होतो, मूडदुसलेली मान्स बघून हाती घेतला 'घास' राहतो !! कसं जागीवल आजपातुर बाप संघर्षाचा पुतळा वाटतो, वजनाच्या या दुनियेत मातुर शिकून आयुष्याचा 'नास' होतो !! काळोखात किरण दृष्टी पडता कुठेतरी अस्तित्वाचा भास होतो, झेप घेता अनंतामध्ये गुदमरतो, बंद 'श्वास' हो
काव्यरस

स्वातंत्र्य

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 14/08/2013 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
होत वसुमती अधीन परीहारील कोण विघ्न ज्ञेयज्ञे सारी निम्न आंग्लापुढती नम्न ll १ ll जातीस्मरे काय प्रयोजन संसृती होय प्रहीण हाची मुहूर्त प्राक्चिरम् पुनरपि प्रयत्न प्रसभम् ll २ ll संभूता अन्ये प्रबोधक सङ्कीर्ण करोनि पुष्कल ताडूनि तो स्पुत्कार उदग्र हो जयकार ll ३ ll करोनि युक्ति निश्चय साधोनि कृत्य सम्भूय न होय कर्म उपक्षय दृढ होणे विनिर्जय ll ४ ll - सार्थबोध विनंती: - संस्कृत आणि रचनेबद्दल सूचना आल्यास स्वागत आहे …

हुशार फोन ..

लेखक नि३ यांनी बुधवार, 14/08/2013 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
हो तर आजकाल सारेच हुशार होत चालले आहे तर मग आपला भ्रमनध्वनीच कसा मागे राहणार.... गेल्या २-३ वर्षात ह्या स्मार्ट्फोन्स चा बाजारात निव्व्ळ सुळ्सुळाट झालाय.... आधी आयफोन मग सॅमसंग गॅलक्सी ,नोकीया नंतर ईतर ईंटरनॅशनल ब्रॅड आणि आता तर बर्याच भारतीय कंपन्या पण ह्या मधे सामील झाल्या आहे.. मी ३.५ वर्षाआधी नोकीया ५८०० एक्सप्रेस म्युझीक फोन घेतला होता. फोन ४-५ वेळा खाली पडला आणि तसही ३.५ -४ वर्ष म्हणजे त्याच लाईफ सायकल संपल्यातच जमा आहे.

शिव श्रावण आणि आपण

लेखक अनिल तापकीर यांनी मंगळवार, 13/08/2013 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सज्जनहो, सध्या श्रावण महिना चालू आहे सर्व साधकांसाठी पर्वकालच जणू या महिन्यात कुठल्याही देवतेची केलेली साधना अधिक फलदायी असते. परंतु त्यातल्या त्यात हा श्रावण महिना भगवान शिवशंकरासाठी खूपच महत्वाचा मानला जातो . नेहमी म्हणजे रोजच्या जीवनात प्रत्येकजण 'जो आस्तिक आहे तो' सकाळी स्नानानंतर पूजा जमली नाही तर देवाला नुसता नमस्कार का होईना करूनच घराच्या बाहेर पडतो. परंतु श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या या कृतीत जास्त सुधारणा होत असते. म्हणजे उपवास किंवा ठराविक दिवशी देवाला जाऊन येणे आदी. जमले तर एखाद्या सद्ग्रंथाचे वाचन आणि दिवसातून जमेल तसे देवाचे नामस्मरण अश्या गोष्टी आपोआपच होतात.

मन म्हणते आहे !!

लेखक psajid यांनी मंगळवार, 13/08/2013 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या घावाने फरफटत जावे, धडपडून उठावे मन म्हणते आहे !! ती सोनेरी क्षणे जीवास ओलावे, डोळ्यात गुंतावे मन म्हणते आहे !! जे राहिले चित्र कोरे काही रंग भरावे, कुंचल्यास उचलावे मन म्हणते आहे !! तुला शौक सुगंधाचा विश्व गांधाळूनी यावे, चंदनासावे झिजावे मन म्हणते आहे !! भ्रमराचे ओठ अन कळीने खुलावे, गीत होऊन जगावे मन म्हणते आहे !! रात्रीस धास्तावले ते तुझ्या नजरेचे काजवे, पहाट बनून जावे मन म्हणते आहे !! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी जिल्हा - सांगली (महाराष्ट्र)

अशी वाहने येती - ( विडंबन )

लेखक विदेश यांनी मंगळवार, 13/08/2013 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल - अशी पाखरे येती - ) अशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती दोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ... खांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला जरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ... पुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले नव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ... हात एक तो पुढेच सरला- काठीवर खात्रीने फिरला- देवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ... पुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती त्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती ... .
काव्यरस

वेदना

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 13/08/2013 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
अस्त सूर्याचा पाहुनी मी किरणांसाठी झुरतो ll १ ll ती वेळ सुरु परतीची थवा घरट्यास उडतो ll २ ll सांजेचा दीप तोही एकलाच गाभारी जळतो ll ३ ll दिव्यास सोबत माझी तो वातीत काजळतो ll ४ ll भाव दाटला नयनी अलगद गाली ओघळतो ll ५ ll जणू सन्यस्त होऊनी मी ओठी दु:ख थोपवतो ll ६ ll गोठली वेदना एकांती मी स्मृतींमागे पळतो ll ७ ll झाकून दर्दभावना सारी मी मलाच रे सावरतो ll ८ ll आरशास पाहता फिरुनी तो नकळत काही सुचवतो ll ९ ll वाटे चेहराच मला माझा काय असा फसवतो ll १० ll - सार्थबोध

आव्हान

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 13/08/2013 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मांडलेला तेव्हा त्याचे खुळखुळे झाले, ललाटीच्या भग्न रेषा पायतळी ठसे ओले, इथे तिथे व्यर्थ व्यर्थ सारे सारे क्षुद्र झाले, नाही सुटले काहीही त्याने भलतेच केले, खोळ काही काळ पुन्हा मी टाकते गहाण, आता त्याच्या पुण्याईला उरे त्याचेच आव्हान!