Skip to main content

महामानवाचं महानिर्वाण

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 06/12/2013 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपिता श्री. नेल्सन मॅन्डेला यांचं निधन झालं.... परमेश्वर मृतात्म्यास सद्गती देवो.... नेल्सन मॅन्डेला यांची महानता मी वर्णन करावी इतकी माझी योग्यता नाही याची मला पुरेपूर जाणीव आहे.... आणि नेल्सन मॅन्डेला यांची योग्यता ठाऊक नाही असा कुणी सुशिक्षित मनुष्यही भेटणं कठीण आहे... आणि जर खरंच कुणी तसा असेल तर त्याच्यासाठी विकिपिडिया आहेच!!!! आमच्या पिढीला गांधी, नेहरू, पटेल बघायला मिळाले नाहीत. आमचं दुर्दैव, दुसरं काय!!! आमचे नेते म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी आणि श्री.

नेताजींचे सहवासात

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 06/12/2013 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
नेताजींचे सहवासात 1 कै. पुरुषोत्तम. ना. ओकांच्या ४ डिसेंबर (२००७) ला पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो. कै. काकांनी ह्या पुस्तकांतून त्यांच्या व नेताजींच्या सहवासात घडलेल्या घटना आणि त्यातून नेताजींच्या स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातील मराठीबाजाने केलेल्या लिखाणात पुनांच्या वैशिष्ठ्य़पूर्ण लेखनपद्धतीचा व शब्दसंचयाचा परिचय मिळतो.

मेरे सामनेवाली खिडकी में...

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 05/12/2013 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईला बागकामाची आवड आहे. पण आम्ही तिस-या माळ्यावर राहात असल्याने, तळमजल्यावर जी मंडळी राहतात त्यांनीच बिल्डींगच्या आजुबाजुच्या परिसरात त्यांची(कसं आहे ना लोक झाडांवरही हक्क सांगतात) झाडं लावलेली आहेत. त्यामुळे आईला तिची हौस घरच्या घरीच खिडक्यांत कुंड्या लाऊन भागवावी लागते. किचनमधल्या ('स्वयंपाकघरात' असं म्हणणं आणि लिहीणं दोन्ही वेळखाऊ) खिडकीत एक लांबलचक मोठ्ठी चौकोनी कुंडी आहे. याला आम्ही खख म्हणतो (खताचा खड्डा). इथे भाज्या-फळांची सालं, बिया, उरलेला भात, शिळी पोळी, नासका पाव - थोडक्यात जे जे काही टाकाऊ आणि विघटनशील आहे ते इथल्या मातीत टाकतो.

युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/12/2013 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-१ युद्धकथा १० - फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.......भाग-२ Simple, Free Image and File Hosting at MediaFire युद्धकथा -१० फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर. भाग - ३ हिमलरने त्याच्याकडे एकदा पाहिले व त्या कागदावरुन नजर फिरवली.

अजूनही मराठी लेखन अवघड आहे ?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 05/12/2013 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर युनिकोडात मराठी टाईप करण्याच्या आतापर्यंत खूप सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.तरीही मराठी विकिपीडियावरील आकडेवारी नुसार आजही ६०% लोकांना मराठी विकिपीडियावर मराठीत टाईपकरणे जमत नाही.दिवसाकाठी किमान २ ते ४ नवी रोमनलिपीतून मराठीत लिहीण्याचा प्रयत्न करणारी मंडळी थांबवावी लागते.विवीध पद्धतीने सहाय्य उपलब्ध करून देऊन सुद्धा आपण नेमके कुठे

ऐश्वर्य

लेखक सार्थबोध यांनी गुरुवार, 05/12/2013 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
एकत्रित असलेली काही नि:स्वार्थी नाती आणि काही वेळा काही मित्र/ मैत्रिणी ; काळागणिक संवेदना अन् नाते विसरून व्यवहारी बनतात, अशाच काही व्यवहारी लोकांच्यात; एकट्या पडलेल्या एका नि:स्वार्थी मनाचे चित्रण मांडण्याचा; प्रयत्न. दिवस आजवरले, असे रंगलेले नात्यांच्या गोडीतले, असे मौजलेले ll १ ll कळीकाळ बदललेले, सारेच बेरंगलेले व्यवहार मनी कोरलेले, ते नातेच निर्ढावलेले ll २ ll संस्कार उध्वस्तलेले, पैशास धास्तावलेले संवेदन मनातले, दिवसागणिक संपलेले ll ३ ll देह सुबत्ती हरवलेले, मन धुंदीत लपेटलेले त्यांच्या लेखी पटावरले, सारे गणित बदललेले ll ४ ll त्यांच्या गटात न बसलेले, मी मलाच पाहिलेले सारे

बाई'को' विकल्यावर

लेखक वाह्यात कार्ट यांनी गुरुवार, 05/12/2013 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न. आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली.

अरेरे, विक्रांत चालली भंगारात

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 05/12/2013 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, "The King is dead, Long live the King!" (आधीचा) राजा मरण पावला, (नवा) राजा चिरायु होवो. "विक्रांत या विमानवाहू नौकेचा लवकरच भंगार म्हणून लिलाव होणार आहे" अशी बातमी आज नौदल दिनाच्या दिवशीच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर होती आणि नव्याने तयार होत असलेल्या विक्रांत या महाकाय जहाजाचा उल्लेख नौदल दिवसाच्या खास पुरवणींध्ये होता.

"यमाची वरात"

लेखक वैभवकुमारन यांनी गुरुवार, 05/12/2013 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
"यमाची वरात" पाहिला मी तयास डोकावुनी दारात उंब-यापाशी होती यमाची वरात मंदावली मज बुबुळांची वळणे भयाची कळ आली हऴव्या उरात जरी शांतता होती चोहोबाजूंनी रेड्याचे हंबरने झाले कर्कश सुरात जाता कटाक्ष माझा देवघराकडे पणतीचे फडफडणे झाले उगी जोरात अजुनही उचलला नव्हत माझा देह त्याची पाऊले फिरत होती घराघरात आठवूनी आल्या मज मागच्या स्मृती पुरता वाहून गेलो मी अश्रूंच्या पुरात जाता शून्य नजर समोरच्या भिंतीकडे माझाच फोटो मज दिसला हारात येता समीप समय जाण्याचा तो यमाचे तांडव झाले मोठ्या भारात मंदावता आता हृदयाची धडधड शरीर लुळे पडले एका क्षणात गिळता कडवट आवंढा शेवटचा तो माझाच प्रा