Skip to main content

ऐश्वर्य

लेखक सार्थबोध यांनी गुरुवार, 05/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
एकत्रित असलेली काही नि:स्वार्थी नाती आणि काही वेळा काही मित्र/ मैत्रिणी ; काळागणिक संवेदना अन् नाते विसरून व्यवहारी बनतात, अशाच काही व्यवहारी लोकांच्यात; एकट्या पडलेल्या एका नि:स्वार्थी मनाचे चित्रण मांडण्याचा; प्रयत्न. दिवस आजवरले, असे रंगलेले नात्यांच्या गोडीतले, असे मौजलेले ll १ ll कळीकाळ बदललेले, सारेच बेरंगलेले व्यवहार मनी कोरलेले, ते नातेच निर्ढावलेले ll २ ll संस्कार उध्वस्तलेले, पैशास धास्तावलेले संवेदन मनातले, दिवसागणिक संपलेले ll ३ ll देह सुबत्ती हरवलेले, मन धुंदीत लपेटलेले त्यांच्या लेखी पटावरले, सारे गणित बदललेले ll ४ ll त्यांच्या गटात न बसलेले, मी मलाच पाहिलेले सारे पैशात तोललेले, नाते असे दुरावलेले ll ५ ll जुने चित्र स्मृतीतले, या घटकेस बदललेले काळानेच मला वाटले, फासे असे फेकलेले ll ६ ll क्षण जिव्हारी लागलेले, मनावरी फार बेतलेले त्यांच्या नजरेत पाहिले, फक्त ऐश्वर्य दाटलेले ll ७ ll www.saarthbodh.com
लेखनविषय:

वाचने 856
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया