Skip to main content

"यमाची वरात"

लेखक वैभवकुमारन यांनी गुरुवार, 05/12/2013 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
"यमाची वरात" पाहिला मी तयास डोकावुनी दारात उंब-यापाशी होती यमाची वरात मंदावली मज बुबुळांची वळणे भयाची कळ आली हऴव्या उरात जरी शांतता होती चोहोबाजूंनी रेड्याचे हंबरने झाले कर्कश सुरात जाता कटाक्ष माझा देवघराकडे पणतीचे फडफडणे झाले उगी जोरात अजुनही उचलला नव्हत माझा देह त्याची पाऊले फिरत होती घराघरात आठवूनी आल्या मज मागच्या स्मृती पुरता वाहून गेलो मी अश्रूंच्या पुरात जाता शून्य नजर समोरच्या भिंतीकडे माझाच फोटो मज दिसला हारात येता समीप समय जाण्याचा तो यमाचे तांडव झाले मोठ्या भारात मंदावता आता हृदयाची धडधड शरीर लुळे पडले एका क्षणात गिळता कडवट आवंढा शेवटचा तो माझाच प्राण गेला माझ्या घरात
लेखनविषय:

वाचने 1853
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by वैभवकुमारन

आणि बाय द वे, रोज "कविता केल्याशिवाय अंघोळ करणार नाही" असं व्रत घेतलायं का?

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर - तसही चालेल / कसही चालेल....

(लिलाध्रा.. ये रे ये.. तुझा मर्मबांधव आहे बघ हा! =)) ) वरात उरात सुरात जोरात घराघरात पुरात हारात भारात क्षणात घरात .................. इतके एकाच रंगाचे झेंडू घेऊन,आपण सदर काव्य ओवले आहे! =)) तस्मात आंम्हाला त्याचा परत एक "यमकारी हार" ओवावा,अशी "कळ" मघापासून येत आहे! =))

घरातल्या नातेवैकाचे काय ते प्रेम हो. अजुन रेड्याचे आगमन नाही तोपर्यंत एक फ़ोटो काढुन फ्रेम करून हार बीर घालून ठेवलाय. वा वा. भलतीच घाइ पोहोचवायाची.

हाहाहा मस्त कल्पना. पण असल्या कल्पना जगता तुम्हि ? :ऑ